आले! आले!! आले!!!
यंदा परत एकदा 'मायबोली' टीशर्ट आले!
मधले एक वर्ष मायबोलीकरांना टी-शर्ट विना करायला लागलेल्या विरहाचे आनंदात रुपांतर करायला यंदा परत एकदा 'मायबोली टीशर्ट' आणि त्याबरोबरच 'मायबोली बॅग' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
ह्या वर्षाच्या सुरुवातीला गाजलेल्या मायबोली शीर्षक गीतातील दोन ओळी यंदा टी-शर्ट वर असणार आहेत.. आणि त्याचे सुलेखन केले आहे पल्लीने.
गेल्या काही वर्षातील वाढती मागणी लक्षात घेऊन यंदा तीन प्रकारात टी-शर्ट असणार आहेत.
१. खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट. (चारकोल रंग)
२. राऊंडनेक टी-शर्ट (चारकोल रंग)
३. महिलांसाठी व्ही-नेक टी-शर्ट (मोरपंखी रंग)
४. बॅग
बॅगचा आकार - ९ इंच X ७ इंच X ४ इंच. बॅग खांद्यावर घेता येईल अशा पाऊच सारखी आहे.
राऊंडनेक व व्हीनेक टी-शर्ट वर पुढे सुलेखन असेल, डाव्या बाहीवर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेबसाईट अॅड्रेस असेल.
खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट वर खिश्यावर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेब अॅड्रेस असेल.
लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे आणि व्ही-नेक मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.
लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज.
वय वर्षे १-२ साठी --> २२
वय ३-४ साठी --> २४
वय ५-६ साठी --> २६
वर ७-८ साठी --> २८
वय ९-१० साठी --> ३०
वय ११-१२ साठी --> ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)
खिश्यासहीत कॉलर टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.३५०/-
राऊंड नेक व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. २००/-
आणि बॅगची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)
यंदाची देणगी प्रगती प्रतिष्ठान, जव्हार ह्या संस्थेस देण्यात येणार आहे. प्रगती
प्रतिष्ठानबद्दल आधिक माहिती पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
टीशर्टांचे पैसे भरण्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण ४ जुलै, २०१३ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
ऑर्डर कशी नोंदवाल?-
इथे टिचकी मारुन
ऑर्डर फॉर्म मध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी वेगळा साईज असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टी-शर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात टोटल हवे असलेले टी-शर्ट लिहायची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या मेलबॉक्स मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंक मधे बघितल्यास बघता येईल.
महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे-मुंबई आणि नाशिक मधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे -
२. हिमांशु कुलकर्णी -
हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा.
टीशर्टचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना
पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.
टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकच्या मायबोलीकरांनी पैसे भरण्यासाठी मायबोली आयडी विदिपा म्हणजेच विजय दिनकर पाटील यांच्याशी ९८८१४९७१८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.
नोंदणी केलेल्यांचे पैसे ७ जुलैच्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
टी शर्टस मिळण्यासंदर्भातली सूचना:-
टी शर्टस मिळण्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.
ज्यांनी पोस्टाने टीशर्टस मागवले आहेत त्यांना पोस्टेज खर्चाची माहिती लवकरच मेलने पाठविण्यात येईल. आणि ७ जुलैच्या आत त्यांचे टी शर्ट+पोस्टेजचे पैसे आले असतील तर त्यांना २१ जुलै नंतर टीशर्टस पाठविले जातील. टी शर्ट पाठविल्यावर तशी त्यांना संयोजकांकडून मेलही करण्यात येईल.
लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
अत्यंत महत्त्वाची सूचना - ऑनलाईन पैसे भरणार्यांनी कृपया नवीन ऑर्डर्स करु नयेत. कारण योग्य वेळेत म्हणजेच ७ तारखेपर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही..
प्रत्यक्ष पैसे भरणारे अजूनही ऑर्डर बुक करु शकतात. त्यांच्यासाठी ऑर्डर नोंदविण्याची मुदत ६ जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
ललिता, तू त्या लिंकवर
ललिता, तू त्या लिंकवर संपादनाच्या बट़नवर क्लिक करुन बदल कर, व्यवस्थित होतय.त्याच ऑर्डरमध्ये बदल करु शकतो.
टीशस, बदल करुन ऑर्डर सुपूर्त केली आहे
पुण्यात माझ्यासाठी कोणी
पुण्यात माझ्यासाठी कोणी टी-शर्ट घेऊ शकत असेल तर कृपया सांगा ? नळस्टॉपच्या जवळपास पिकअप करण्याची व्यवस्था करु शकेन...
थ्यांकू शैलजा, बदल केला आहे.
थ्यांकू शैलजा, बदल केला आहे.
ऑर्डर फॉर्ममध्ये लहान
ऑर्डर फॉर्ममध्ये लहान बालांच्या शर्टची यादी नाही. बाळंअना टी शर्ट हवा सेल तर नोंदणी कुठे करायची? मला २४ नंबरचे दोन शर्ट हवे आहेत. दोन्ही प्रकारचे एकेक. मुंबईत कुठे? शिवाजी म्हाराजांच्या घोड्याच्या खाली का?
२९ जुन ते १५ जुलै. मी मुंबईत
२९ जुन ते १५ जुलै. मी मुंबईत नाही. टी शर्ट याच काळात वाटले, तर मी काय करु? पोस्टाने पाठवणार का? पोस्टाने पाठवायचे असल्यास एक्स्ट्रा चार्जेस किती व कसे पे करायचे?
@ मिरा पाटील आपण विचारलेलेया
@ मिरा पाटील
आपण विचारलेलेया सर्व प्रष्नांची उत्तर वर बाफ वर आहेत, जर अजुन काही प्रष्न असतील तर वर दिलेल्या संयोजकांना फोन करुन माहिती घेउ शकता.
ए माझी ऑर्डर कनफर्म झाली की
ए माझी ऑर्डर कनफर्म झाली की नाही हे कसं कळेल मला ? कारण मला मायबोलीकडून अजून पोच मिळाली नाहीये माझ्या ऑर्डर ची.
धन्यवाद टीशर्ट_समिती , बदल
धन्यवाद टीशर्ट_समिती ,
बदल करुन ऑर्डर सुपूर्त केली आहे
अरे, मी एकदा ऑर्डर नोंदविली
अरे, मी एकदा ऑर्डर नोंदविली आणि त्यात बदल करायचा असेल तर काय करायचे?
ऑर्डर नोंदविली आहे
ऑर्डर नोंदविली आहे
एकदा ऑर्डर नोंदवली की पोच
एकदा ऑर्डर नोंदवली की पोच पावती म्हणून एक मेल येईल.
ऑर्दर मधे बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही. पण बदल नोंदवला जाईल.
वोक्के संयोजक
वोक्के संयोजक
कलरचं काही होणारेय का? तो
कलरचं काही होणारेय का?
तो वरचा कलर मला चांगला नाही दिसणार
एक टी शर्ट, २४ नंबरचा ऑर्डर
एक टी शर्ट, २४ नंबरचा ऑर्डर दिली आहे.
प्रत्यक्ष शर्ट घेताना आय डी
प्रत्यक्ष शर्ट घेताना आय डी प्रूफ दाखवावे लागेल का? वोटर आय डी, प्यान कार्ड, आधार .. काय लागेल?
लहान पोराना खिसे असलेले की
लहान पोराना खिसे असलेले की नसलेले शर्ट आहेत? ते कुठे स्पेसिफाय करायचे?
लहान मुलांसाठी राऊंडनेक
लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे आणि व्ही-नेक मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.>> असं लिहिलं आहे वर. राऊंडनेकला खिसा आहे का फोटोत?
धन्यवाद टीशर्ट_समिती , बदल
धन्यवाद टीशर्ट_समिती ,
बदल करुन ऑर्डर सुपूर्त केली आहे.
पोचपावती साधारण कधी येते? मला
पोचपावती साधारण कधी येते? मला वाटलं ऑटॉमेटेड रिस्पॉन्सने तत्काळ येईल
पोचपावती लगेचच येते की..
पोचपावती लगेचच येते की.. जास्तीत जास्त ५ मिनिटांत.. मायबोलीवर रजिस्टर्ड मेल आयडीवर येते..
पौर्णिमा , Spam mail चेक करा
पौर्णिमा ,
Spam mail चेक करा . मला जीमेल ला तिथे गेली होती .
मिळाली. स्पॅममध्ये गेली होती.
मिळाली. स्पॅममध्ये गेली होती. थँक्स केदार.
ज्यांना ज्यांना टीशर्ट चा
ज्यांना ज्यांना टीशर्ट चा फॉर्म पहिल्यांदा भरल्यावर पोचपावतीची मेल मिळालेली नाही त्यांनी स्पॅम फोल्डर चेक करा.
रिया, टी शर्ट हा मायबोलीचा उपक्रम आहे व्यवसाय नाही. तरी यावर्षी आपण लोकांना जास्तीत जास्त व्हरायटी द्यायचा प्रयत्न केलाय. पण प्रत्येकाने स्वतःची अशी डिमांड केली तर ती डिमांड पूर्ण करणं शक्य नाही. कृपया गैरसमज नसावा.
संयोजक , हरकत नाही आणि अगदी
संयोजक , हरकत नाही
आणि अगदी कबुल की प्रत्येकाच्या आवडी निवडी सांभाळत बसणं शक्य नाही
काही तक्रार नाहीये
नमस्कार, मी ऑर्डर केले आहेत
नमस्कार,
मी ऑर्डर केले आहेत टी शर्टस आणि एक बॅग. माझ्यावतीने श्यामली कलेक्ट करेल. क्रुपया तिला संपर्क कराल ़का?
धन्यवाद.
प्रगती प्रतिष्ठान बद्दल
प्रगती प्रतिष्ठान बद्दल माहिती तसेच पैसे भरण्यासंदर्भातील सूचना वरती दिल्या आहेत.
ए मला अजूनही पोच आलेली
ए मला अजूनही पोच आलेली नाहीये. स्पॅम मधे पण नाही
आली आली....... पोच मिळाली हो
आली आली....... पोच मिळाली हो ....धन्यवाद
माझा टी- शर्ट श्यामली कलेक्ट करेल.
राज | 21 June, 2013 -
राज | 21 June, 2013 - 12:06
ठाण्याचा पिकअप पॉइंट, तारीख्/वेळ प्लीज कळवा...
अरे इसका जवाब है किसि के पास?
हे टी-शर्ट कधी पर्यंत मिळणार
हे टी-शर्ट कधी पर्यंत मिळणार आहेत?
Pages