आले! आले!! आले!!!
यंदा परत एकदा 'मायबोली' टीशर्ट आले!
मधले एक वर्ष मायबोलीकरांना टी-शर्ट विना करायला लागलेल्या विरहाचे आनंदात रुपांतर करायला यंदा परत एकदा 'मायबोली टीशर्ट' आणि त्याबरोबरच 'मायबोली बॅग' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
ह्या वर्षाच्या सुरुवातीला गाजलेल्या मायबोली शीर्षक गीतातील दोन ओळी यंदा टी-शर्ट वर असणार आहेत.. आणि त्याचे सुलेखन केले आहे पल्लीने.
गेल्या काही वर्षातील वाढती मागणी लक्षात घेऊन यंदा तीन प्रकारात टी-शर्ट असणार आहेत.
१. खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट. (चारकोल रंग)
२. राऊंडनेक टी-शर्ट (चारकोल रंग)
३. महिलांसाठी व्ही-नेक टी-शर्ट (मोरपंखी रंग)
४. बॅग
बॅगचा आकार - ९ इंच X ७ इंच X ४ इंच. बॅग खांद्यावर घेता येईल अशा पाऊच सारखी आहे.
राऊंडनेक व व्हीनेक टी-शर्ट वर पुढे सुलेखन असेल, डाव्या बाहीवर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेबसाईट अॅड्रेस असेल.
खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट वर खिश्यावर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेब अॅड्रेस असेल.
लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे आणि व्ही-नेक मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.
लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज.
वय वर्षे १-२ साठी --> २२
वय ३-४ साठी --> २४
वय ५-६ साठी --> २६
वर ७-८ साठी --> २८
वय ९-१० साठी --> ३०
वय ११-१२ साठी --> ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)
खिश्यासहीत कॉलर टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.३५०/-
राऊंड नेक व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. २००/-
आणि बॅगची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)
यंदाची देणगी प्रगती प्रतिष्ठान, जव्हार ह्या संस्थेस देण्यात येणार आहे. प्रगती
प्रतिष्ठानबद्दल आधिक माहिती पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
टीशर्टांचे पैसे भरण्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण ४ जुलै, २०१३ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
ऑर्डर कशी नोंदवाल?-
इथे टिचकी मारुन
ऑर्डर फॉर्म मध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी वेगळा साईज असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टी-शर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात टोटल हवे असलेले टी-शर्ट लिहायची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या मेलबॉक्स मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंक मधे बघितल्यास बघता येईल.
महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे-मुंबई आणि नाशिक मधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे -
२. हिमांशु कुलकर्णी -
हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा.
टीशर्टचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना
पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.
टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकच्या मायबोलीकरांनी पैसे भरण्यासाठी मायबोली आयडी विदिपा म्हणजेच विजय दिनकर पाटील यांच्याशी ९८८१४९७१८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.
नोंदणी केलेल्यांचे पैसे ७ जुलैच्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
टी शर्टस मिळण्यासंदर्भातली सूचना:-
टी शर्टस मिळण्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.
ज्यांनी पोस्टाने टीशर्टस मागवले आहेत त्यांना पोस्टेज खर्चाची माहिती लवकरच मेलने पाठविण्यात येईल. आणि ७ जुलैच्या आत त्यांचे टी शर्ट+पोस्टेजचे पैसे आले असतील तर त्यांना २१ जुलै नंतर टीशर्टस पाठविले जातील. टी शर्ट पाठविल्यावर तशी त्यांना संयोजकांकडून मेलही करण्यात येईल.
लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
अत्यंत महत्त्वाची सूचना - ऑनलाईन पैसे भरणार्यांनी कृपया नवीन ऑर्डर्स करु नयेत. कारण योग्य वेळेत म्हणजेच ७ तारखेपर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही..
प्रत्यक्ष पैसे भरणारे अजूनही ऑर्डर बुक करु शकतात. त्यांच्यासाठी ऑर्डर नोंदविण्याची मुदत ६ जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
वॉव ! दोन्ही आवडले.
वॉव ! दोन्ही आवडले.
वा! वा! वा! टीशर्ट आणि बॅग
वा! वा! वा! टीशर्ट आणि बॅग दोन्ही सुंदर... खूपच सुंदर.
लेडिज टीशर्ट चित्रात जसा दिसतोय तसाच्या तसा शेपमधे असणार का?
मापात पाप नाही ना होणार यंदा?
आणि बॅग - स्लिंग बॅग आहे ना/ का? क्रॉस घेता येईल अशी? की सॅक आहे, पाठीवर घेता येण्यासारखी?
यंदा मायबोलीवरच ऑर्डरनोंदणीची सोय हे फार म्हणजे फारच उत्तम काम झालेले आहे.
वा.. छान आहेत टी-शर्ट कॉलर +
वा.. छान आहेत टी-शर्ट
कॉलर + खिसा असलेले टी-शर्ट आणुन लिंबुभाउ सह अनेकांची अनेक वर्षांपासुनची इच्छा पुर्ण झाली.
मंजू +१
मंजू +१
लेडिज टीशर्ट चित्रात जसा
लेडिज टीशर्ट चित्रात जसा दिसतोय तसाच्या तसा शेपमधे असणार का? -> हो
मापात पाप नाही ना होणार यंदा? -> नाही
बॅग खांद्यावर घेता येईल अशी आहे.. सॅक नाही.. बॅगचा आकार मूळ पोस्ट मधे अॅड केला आहे.
आयडू -> ऑर्डर देता येत नाहीये म्हणजे नक्की काय होतय?
खांद्यावर घेता येईल असा
खांद्यावर घेता येईल असा पाऊच>>> म्हणजे स्लिंग बॅगच ना?? पट्टा व्यवस्थित लांब आहे ना त्याचा?
डॅफो, ऑर्डर बुक कर.. निळा
डॅफो, ऑर्डर बुक कर.. निळा टी-शर्ट मिळेल लहान मुलींसाठी सुद्धा..
पट्टा व्यवस्थित लांब आहे ना
पट्टा व्यवस्थित लांब आहे ना त्याचा? हो.. हिम्सकूल पण नीट वापरू शकतो.
बरं, धन्यवाद!!
बरं, धन्यवाद!!
हिम्सकूल पण नीट वापरू
हिम्सकूल पण नीट वापरू शकतो....>>>
टी-शर्ट समितीला संपर्कातून
टी-शर्ट समितीला संपर्कातून मेल पाठवले आहे. कृपया पोचपावती देणे. धन्यवाद!
व्ही नेक टीशर्ट, त्याचा रंग
व्ही नेक टीशर्ट, त्याचा रंग आणि कॉलरचा टी शर्ट फार आवडले.
बॅगपण मस्तं आहे.
फॉर्ममधे पैसे स्वतः भरणार नसल्यास कोण भरेल आणि कोण टी-शर्ट पिक अप करेल याचे डीटेल्स द्यायला जागा नाही. ते नंतर कळवता येणार का?
धन्यवाद टीशर्ट समिती
धन्यवाद टीशर्ट समिती करते.
बॅग पण अॅड करा ना फॉर्म वर ... आणि ऑर्डर सब्मिट कशी करू ?
सुपुर्त करा चे बटन गायब होत आहे फॉर्म भरल्यावर
टीशर्ट मस्त आहेत. डॅफो : बॅग
टीशर्ट मस्त आहेत.
डॅफो : बॅग आहे ना त्यात.
====================
मायबोली हँडबॅग:
किती हव्यात?
===================
असे सर्वात शेवटी लिहीलेले दिसतेय मला तरी.
दिसले फायर्फॉक्स वर दिसतेय
दिसले फायर्फॉक्स वर दिसतेय IE10 वर नाही असो.
खरच छान आहे यंदा टीशर्ट ...
खरच छान आहे यंदा टीशर्ट ... मला पण आवडला.
पुण्यात पिक अप करणारे कोणी सापडले तर मी पण ऑर्डर करेन
छान. बायांसाठी पोलो नाहीत का?
छान.
बायांसाठी पोलो नाहीत का?
लोला, बायकाही पोलो टी-शर्ट
लोला, बायकाही पोलो टी-शर्ट घेऊ शकतात की, पण तो टी-शर्ट रेग्युलर पोलो असेल. त्याचा आकार लेडिज टी-शर्ट सारखा नसेल.
mast aahet colours. Nondani
mast aahet colours. Nondani keli aahe. Online details pls. kalava.
मस्त !!!
मस्त !!!
अरे वा. मस्तच. लहान मुलांचे
अरे वा. मस्तच.
लहान मुलांचे टिशर्ट कसे ऑर्डर करायचे? साइज मधे तो ऑप्शन नाही.
<<लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.>> म्हणजे व्हि नेक मोरपिशी उपलब्ध नाही का? प्रतिक्रियांमधे मात्र उपलब्ध आहे असे लिहिले आहे.
टी शर्ट समीती ... हा बाफ मेन
टी शर्ट समीती ... हा बाफ मेन मायबोली पेज वर घ्यायला हवा .... वर्षाविहार चा बाफ ही येथे लिं कर ता येइल
नोंदणी केली आहे .पोच कशी
नोंदणी केली आहे .पोच कशी मिळेल ?
नोंदणी केली आहे .पोच कशी
नोंदणी केली आहे .पोच कशी मिळेल ?
मस्त !! व्ही नेक खूप आवडला.
मस्त !!
व्ही नेक खूप आवडला.
अर्रे! व्ही-नेक टी-शर्ट!
अर्रे! व्ही-नेक टी-शर्ट! सह्हीच! नक्की घेणार यंदा...
(साईझ कुठली ते ठरवते आधी )
नोंदवले
नोंदवले
ग्रेट! कॉलर अन खिसावाला
ग्रेट!
कॉलर अन खिसावाला टीशर्ट आणल्याबद्दल धन्यवाद. ब्याग पण छान, माझ्या मुलिन्ना द्यायला छानेत.
तो फॉर्म पण छान!
लौकरच माझ्या खिशाचा अंदाज घेऊन ऑर्डर नोन्दवितो
टिशर्ट आवडले. लौकरच माझ्या
टिशर्ट आवडले.
लौकरच माझ्या खिशाचा अंदाज घेऊन ऑर्डर नोन्दवितो > लिंब्या... डझनभर ऑर्डर कर.. मागची कसर भरुन काढ.
स्वाती_आंबोळे.. विपु बघा.
ऑर्डर नोंदवलेली आहे.
ऑर्डर नोंदवलेली आहे.
Pages