पाऊस आणि प्रेम

Submitted by जयश्री देशकुलकर्णी on 14 June, 2013 - 06:22

पाऊस आणि प्रेम
पावसाच आणि प्रेमाच
एक अतुट नात असत
दाटून आल खुप की
दोघानाही बरसाव वाटत

मनीच गुज कधी धरणीला
त्याला रिमझिमत सांगाव वाटत
रिमझिमत्या पावसात प्रेमाला
सतत भिजत रहाव वाटत

बरसून झाल्यावर कधी कधी
त्याला इंद्रधनुच्या रुपात प्रकटाव वाटत
सप्तरंगाच्या दुनियेत प्रेमाला
धुंद होऊन गाव वाटत

पाऊस ही वेडा असतो
प्रेम ही वेड असत
थांब म्हणून दोघांना
थांबण मान्य नसत

पावसाच्या थेंबा थेंबातून
धरणीच अंकुरण असत
प्रेमाच्या पावसातून आयुष्याचे
नव्याने जन्म घेण असत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुन्दर हो...
पाऊस ही वेडा असतो
प्रेम ही वेड असत
थांब म्हणून दोघांना
थांबण मान्य नसत..

मस्त....

<पावसाच आणि प्रेमाच
एक अतुट नात असत
दाटून आल खुप की
दोघानाही बरसाव वाटत>>