पाऊस आणि प्रेम
पावसाच आणि प्रेमाच
एक अतुट नात असत
दाटून आल खुप की
दोघानाही बरसाव वाटत
मनीच गुज कधी धरणीला
त्याला रिमझिमत सांगाव वाटत
रिमझिमत्या पावसात प्रेमाला
सतत भिजत रहाव वाटत
बरसून झाल्यावर कधी कधी
त्याला इंद्रधनुच्या रुपात प्रकटाव वाटत
सप्तरंगाच्या दुनियेत प्रेमाला
धुंद होऊन गाव वाटत
पाऊस ही वेडा असतो
प्रेम ही वेड असत
थांब म्हणून दोघांना
थांबण मान्य नसत
पावसाच्या थेंबा थेंबातून
धरणीच अंकुरण असत
प्रेमाच्या पावसातून आयुष्याचे
नव्याने जन्म घेण असत.
हे नात माहित नव्हते,खूपच छान
हे नात माहित नव्हते,खूपच छान .
मस्तच!!!!!
मस्तच!!!!!
खुपच सुन्दर हो... पाऊस ही
खुपच सुन्दर हो...
पाऊस ही वेडा असतो
प्रेम ही वेड असत
थांब म्हणून दोघांना
थांबण मान्य नसत..
मस्त.... <पावसाच आणि
मस्त....
<पावसाच आणि प्रेमाच
एक अतुट नात असत
दाटून आल खुप की
दोघानाही बरसाव वाटत>>
मस्त
मस्त
पाउस-प्रेमाला जोडणारे दुवे
पाउस-प्रेमाला जोडणारे दुवे अचुक टिपलेत....छान...!!