Submitted by पुरंदरे शशांक on 11 June, 2013 - 05:27
एक थेंब कृपेचा रे...
कृष्णमेघ गगनात
रुप तुझे नयनात
बरसवी अंतरात
तुझ्या कृपेचे अमृत
नांगरुनी रे भुईला
किती शिणलो थकलो
तण विखारी काढता
वारं वार खंतावलो
प्रेमबीज पेरियले
अशा बरड भूमीत
भाव शिंपूनिया ठेवी
रोप थोडे पल्लवीत
मेघ बरसवी आता
झडकरी देवराया
सुकुनिया जाई रोप
आटली का तुझी माया
नाही मागणे अफाट
नसे आस सागराची
तहान ती अति अल्प
एक थेंब चातकाची
एक थेंब कृपेचा रे
मजलागी धाड देवा
परिपूर्ण जीवनाचे
भाग्य लाभे वेड्या जीवा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप आवडली !
खुप आवडली !
अंतरातला अमृत-पाऊस ..
अंतरातला अमृत-पाऊस ..
छान आहे
छान आहे
वाह!
वाह!
सुंदर..
सुंदर..
व्वाह.... सुंदर!!
व्वाह.... सुंदर!!
वाह !
वाह !
वा, मनाला भिडणारी कविता आहे.
वा, मनाला भिडणारी कविता आहे.
सर्वांचे मनापासून आभार .....
सर्वांचे मनापासून आभार .....
केवळ अप्रतिम, शशांक... सुंदर
केवळ अप्रतिम, शशांक... सुंदर
सुंदर मागणे
सुंदर मागणे