कोबीच्या वड्या

Submitted by देवकी on 9 June, 2013 - 15:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी कोबी,१ - १.५ वाटी बेसन,तिखट किंवा मसाला,धणे-जिरे पावडर,कोथिंबीर,मीठ, साखर,तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

१ वाटी बारीक चिरलेल्या कोबीत तिखट किंवा मसाला,धणे-जिरे पावडर,कोथिंबीर,मीठ, साखर घालून

त्यात बेसन घालावे मिश्रण जाडसर असावे.१०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेवावे.दुसर्‍या भांड्याला तेलाचा

हातलावून वरील मिश्रण त्यात ओतावे.कुकरला शिट्टी न लावता १० मिनिटे इडलीप्रमाणे उकडावे.गार

झाल्यानंतर वड्या कापून तेलात डीप फ्राय कराव्यात.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजेच १-२ जण
अधिक टिपा: 

मिश्रण १०-१५ मिनिटे झाकून ठेवल्यामुळे सोडा/बेकिंग पावडर घालावी लागत नाही.

वड्या जरा छोट्या आकाराच्या केल्यास व्यवस्थित तळल्या जातात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users