- २-३ मध्यम पापलेट (पॉंफ्रेट)
मॅरिनेट १ साठी-
- १ लिंबू
- १ चमचा मीठ
मॅरिनेट २ साठी-
- पाच-सहा चमचे घट्ट दही
- २ चमचे तिखट (शक्यतो काश्मिरी, छान रंग येण्यासाठी)
- १ चमचा धणे पावडर
- १ चमचा तंदुर मसाला
- अर्धा चमचा गरम मसाला पावडर
- १ चमचा आलं-लसूण पेस्ट
- चवीनुसार मीठ
- २ चमचे ऑलिव्ह ऑईल
पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घ्यावा
पापलेटला आडव्या चीरा कराव्यात, चीर साधारण अर्धा सेंमी खोल आणि थोडी तिरकी करावी. त्यामुळे मसाला आतमध्ये चांगला मुरेल.
पापलेटवर लिंबू पिळून, त्यावर थोडे मीठ लावावे. आणि १५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावे.
दुस-या मॅरिनेटसाठी, भांड्यात दही, तिखट, तंदुर मसाला पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ घेऊन चांगले फेटून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालावे.
मॅरिनेटमध्ये पापलेट घालावेत. मॅरिनेट पापलेटच्या चीरांमध्ये घालावे.
पापलेट किमान २ तास मॅरिनेट होऊ द्यावेत. त्यापैकी पहिला एक तास रेफ्रिजरेटर मध्ये आणि नंतरचा एक तास रूम टेंप्रेचरला मॅरिनेट करावेत.
ओव्हन २५०° ला २० मिनिटे प्रिहिट करुन घ्यावा. पापलेट ग्रीलवर थेवून साधारणतः ४०-४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा.
गरमागरम पापलेट कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो च्या सलाडबरोबर सर्व्ह करावा
अधिक टिपा...?? काही नाही.. फक्त तुटून पडा..
पापलेट एकदम नंबरी हायेत.
पापलेट एकदम नंबरी हायेत.
अरे बापरे किती ताजे फडफडीत
अरे बापरे किती ताजे फडफडीत पापलेट आहेत!.
कखुप छान आहे.
कखुप छान आहे.
मन:पूर्वक आभार
मन:पूर्वक आभार
अरे हे कसं सुटलं नजरेतून ?
अरे हे कसं सुटलं नजरेतून ? भारी! एकदम तोंपासू. कधी येऊ जेवायला? खमंग दरवळ आला इथ पर्यंत
हाहाहा.. धन्यवाद अवल
हाहाहा.. धन्यवाद अवल
खुप छान आहे रेसीपी.उद्या
खुप छान आहे रेसीपी.उद्या बनवली पाहीजे.
धन्यवाद तुशपी
धन्यवाद तुशपी
मी हे बनवले होते मस्त झाले
मी हे बनवले होते मस्त झाले होते.माझ्याकडे ऑलिव ऑईल आणी तंदुरी मसाला नव्हता. सुर्यफुल तेल आणि साध्या घरचा मसाला टाकला पण छान झाले
पापलेट ला दिलेल्या चिरा अगदी
पापलेट ला दिलेल्या चिरा अगदी शेफ ला लाजवतील अशा आहेत
मस्त पाक्रु .
करुन बघण्यात येइल
अविगा >> वा, मस्तच थंड >>
अविगा >> वा, मस्तच
थंड >> धन्यवाद
Pages