तंदुरी पॉंफ्रेट

Submitted by डीडी on 19 March, 2013 - 04:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
 • २-३ मध्यम पापलेट (पॉंफ्रेट)

मॅरिनेट १ साठी-

 • १ लिंबू
 • १ चमचा मीठ

मॅरिनेट २ साठी-

 • पाच-सहा चमचे घट्ट दही
 • २ चमचे तिखट (शक्यतो काश्मिरी, छान रंग येण्यासाठी)
 • १ चमचा धणे पावडर
 • १ चमचा तंदुर मसाला
 • अर्धा चमचा गरम मसाला पावडर
 • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
 • चवीनुसार मीठ
 • २ चमचे ऑलिव्ह ऑईल

क्रमवार पाककृती: 

पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घ्यावा
पापलेटला आडव्या चीरा कराव्यात, चीर साधारण अर्धा सेंमी खोल आणि थोडी तिरकी करावी. त्यामुळे मसाला आतमध्ये चांगला मुरेल.

पापलेटवर लिंबू पिळून, त्यावर थोडे मीठ लावावे. आणि १५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावे.

दुस-या मॅरिनेटसाठी, भांड्यात दही, तिखट, तंदुर मसाला पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ घेऊन चांगले फेटून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालावे.

मॅरिनेटमध्ये पापलेट घालावेत. मॅरिनेट पापलेटच्या चीरांमध्ये घालावे.

पापलेट किमान २ तास मॅरिनेट होऊ द्यावेत. त्यापैकी पहिला एक तास रेफ्रिजरेटर मध्ये आणि नंतरचा एक तास रूम टेंप्रेचरला मॅरिनेट करावेत.

ओव्हन २५०° ला २० मिनिटे प्रिहिट करुन घ्यावा. पापलेट ग्रीलवर थेवून साधारणतः ४०-४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा.

गरमागरम पापलेट कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो च्या सलाडबरोबर सर्व्ह करावा

वाढणी/प्रमाण: 
काही प्रमाण नाही.. एखादा मत्स्यप्रेमी ४ पापलेटही सहज हाणू शकतो!
अधिक टिपा: 

अधिक टिपा...?? काही नाही.. फक्त तुटून पडा.. Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिपटॉप रेसेपी. पापलेटबुवा एकदम ताजे फडफडीत दिसतायत. घासफुसवाल्यांनी काय वापरायचे?( मी घासफुसवाली आहे, घरात तसेच म्हणतात.:फिदी:)

पापलेट मस्त तोंपासु दिसताहेत..

४०-४५ मि ओव्हनमध्ये म्हणजे जास्त होत नाहीत का?

अहो टुनटुनताई, माझा पण तोच प्रॉब्लेम झालाय.

आता पापलेट खाऊन पाप लागण्यापेक्षा फुलकोबी अशीच बनवून खायला काही प्रॉब्लेम नाही..

- पिंगू

ओव्हन २५०° ला २० मिनिटे प्रिहिट करुन घ्यावा. पापलेट ग्रीलवर थेवून साधारणतः ४०-४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा.>>>
मला पण हेच विचारायचे होते?

मस्त दिसत आहेत. इकडे पापलेटं अद्याप मला मासळीबाजारात दिसली नाहीत. मिळाली तर नक्की करणार.

पण ४५ मिनिट्स मला तरी जास्त वेळ वाटतोय. जागू किधर हय?

एकदम कातिल ...स्लर्र्र्र्र्र्प....बहुतेक उद्याच बनवून पाहेन कारण पापलेट्स घरात आहेत..:P

इतका सुंदर रंग फक्त काश्मिरी मिर्चिने आला? वॉव

धागाकर्ता जरा टेम्परेचर नीट सांगणार का? २५० फॅ.ला तीस मिनिटात धक्कापण लागला नाहिये Sad

देव
समजा हे मॅरिनेट केल्यावर गॅसवर करायचे असतील तर कसे करायचे ते ही सांगा जरा.
माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे त्यात कोणत्या सेटिंगवर किती वेळ ठेवू ते पण सांगून ठेवा, प्रीहिट म्हणजे काय? तो कसा करायचा? मावेत करण्याचा कॉन्फिडन्स वाटत नाही म्हणून गॅसचे विचारतेय. दोन्हीची उत्तरं दिलित तर बरं होइल. Happy

माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे त्यात कोणत्या सेटिंगवर किती वेळ ठेवू ते पण सांगून ठेवा>>> दक्षिणा, मायक्रोवेव्ह नीट बघ, त्यावर कन्व्हेक्शन आणी ग्रिल असे ऑप्शन आहेत का? असतील तर तुला प्रीहीट वगैरे करता येईल.

Pages