जगातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटर कोण ? सचिन, लारा, पोंटिंग कि कॅलिस.

Submitted by पिंटू on 8 June, 2013 - 05:51

क्रिकेट ह्या खेळाने जगाला अत्यंत दर्जेदार असे खेळाडू दिले. त्यात प्रामुख्याने समावेश होतो तो सचिन, कॅलिस, पोंटिंग , लारा यांचा.खाली त्यांचे कसोटी क्रिकेट मधील रेकॉर्ड दिले आहेत येथे प्रामुख्याने कसोटी क्रिकेटचेच रेकॉर्ड लक्षात घेतले आहेत. कारण कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे जिथे खेळाडूचा खरा कस लागतो. तर ह्या चौघा मधला महान खेळाडू कोण हे पाहूया .

कॅलिस--- सामने-१६२ धावा -१३,१२८, शतक -४४ अर्ध शतक-५८ सरासरी-५६.१० बळी-२८८

सचिन-- सामने-१९८ धावा -१५८३७ , शतक -५१ अर्ध शतक-६७ सरासरी-५३.८६ बळी-४५

लारा ---सामने-१३१ धावा -११९५३ , शतक -३४ अर्ध शतक-४८ सरासरी-५२.८८ बळी----

पोंटिंग ---सामने-१६८ धावा -१३३७८ , शतक -४१ अर्ध शतक-६२ सरासरी-५१.८५ बळी-५

हि आकडेवारी पाहून लगेच कळते कि ह्यातला महानतम खेळाडू हा कॅलिस आहे त्याची सरासरी सर्वोत्तम आहे त्या शिवाय त्याने गोलंदाजीत हि २८८ विकेट घेतले आहेत मला तर सचिन, पोंटिंग आणि लारा ह्यांच्या तुलनेत कॅलिस सरस वाटतो .हे तिन्ही खेळाडू फलंदाजीचे देव असतील तर कॅलिसला क्रिकेटचा महादेव म्हणावे लागेल.
कॅलिसला ४४ शतके झळकावली त्या सामन्यात गोलंदाजी हि करावी लागली. त्यामुळे मला ह्या सर्व खेळाडूत कॅलिस हा ग्रेट वाटतो .असा हिरा भारताला मिळाला असता तर मला नाही वाटत ६० व्या वर्षापर्यंत त्याला कोणी निवृत्त होवू दिला असता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंटुजी, हा धाग्यावर भक्त आले की मजा येइल Proud कारण तुम्हि चक्क देवाची लारा, कॅलिस मर्त्य तुच्छ मानवांशी तुलना करता आहात! Wink

कॅलिसला क्रिकेटचा महादेव म्हणालात हे उत्तम ... त्याने लईच बळी घेतले आहेत
लारा तसा चांगला देव म्हणावा लागेल.... एकही बळी घेतला नाही.

जगातला सध्याचा सर्वात श्रेष्ठ क्रिकेटपटू विधू (दारासिंह) रंधवा हाच आहे.
खालील खेळाडू टीममधे घेतल्यास निकाल प्रतिस्पर्धी संघाच्या हाती कधीच राहणार नाही.

१. श्रीनिवासन
२. श्रीनिवासनचा जावई (जावयां चं महत्व औरच आहे)
३. राज कुंद्रा
४. विधू दारासिंह
५. अंकित चव्हाण
६. श्रीसंथ

जगातला सध्याचा सर्वात श्रेष्ठ क्रिकेटपटू विधू (दारासिंह) रंधवा हाच आहे. >>>>>>>>> माझा आक्षेप आहे ..

सध्या सर्वात श्रेष्ठ क्रिकेटपटु गोलंदाज "श्रीशांतच" आहे......त्याने फक्त ४ ओव्हर्स गोलंदाजी केली परंतु "विकेट्स" अजुन जातच आहेत Biggrin

कॅलिस हा ह्या बाकी तीन खेळाडूंपेक्षा श्रेष्ठ आहे ह्यात वादच नाही.कॅलिस नंतर लाराचा नंबर असावा त्याने ज्या तडफेने नाबाद ४०० धावांची खेळी केली होती तशी खेळी कधीच पाहण्यात आली नव्हती. इतर खेळाडू दोनशे अडीचशे धावा मुश्किलीने करत असताना हि चारशे धावांची खेळी म्हणजे एक अलौकिक प्रतिभेचा आविष्कारच होता. ह्या चारशे धावा आधी त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ३७५. जी धावसंख्या गाठणेही इतर तीन खेळाडूंच्या आवाक्याबाहेरचे होते.

फलंदाजात ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन आणि अष्टपैलू खेळाडूत वेस्ट इंडिजचे सर गारफिल्ड सोबर्स....हे दोन्ही महान आहेत...ह्यांच्याशी कुणाचीही तुलना होणे नाही.
बाकी दळण दळत बसा.

कशाला असले वाद घालता?

.सचिनबद्दल अढी निर्माण होत चालली आहे ती त्याच्या निर्बुद्ध समर्थकांमुळे. सचिनद्वेष, ब्राह्मणद्वेष अशी विशेषणं वापरल्याने सचिनचे चाहते दूर होताहेत याचं त्यांना भान नाही. सचिन त्यांचा देव बिव काही नाही, ऑनलाईन वादविवादात समोरच्यांना धूळ चारण्यासाठी त्यांच्या हाती लागलेलं आयुध आहे सचिन म्हणजे. सचिनच्या खेळीने आख्खा देश जेव्हां वेडा झाला होता तेव्व्हां त्याला डोक्यावर घेणा-यांनी आणि सचिननेही एकमेकांची जात पाहिली नव्हती. सचिनकडे काहीतरी एक्स्ट्रा आहेच आहे, ते म्हणजे त्याचे धाडसी फटके. सुरुवातीच्या सचिनवर प्रेम केलेल्यांना आताच्या सचिनमधला फरक जाणवणारच. तसं त्यांनी व्यक्त केलं कि अमूक द्वेष तमूक द्वेष, बॅट हातात धरली होती का ? लायकी आहे का अशा पोष्टी टाकणायांच्नी सचिनच खूप नुकसान केलंय असं माझं मत आहे. हेच लोक धोनीबद्दल तोंडसुख घेतात, कपिलबद्दल घेतात तेव्हां यांच्या सात पिढ्यात कुणी आउटस्विंगर टाकला होता का असं प्रत्त्यु त्तर देणं अवघड नाही. धोनीसारखा यशस्वी कप्ता न झाला नाही हे म्हणताना मला धोनीची जात माहीत नाही.

व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रवीड हे देखील कुठल्या जातीचे आहेत हे माहीत असूनही त्यांच्याबद्दल नेहमीच गौरवपर लिहीत आलोय. ते काय ठराविक जातीचा द्वेष म्हणून ? यांच्याबद्दल प्रेम अस ण्याचं कारण उघड आहे. दडपणाखाली केलेल्या मोठ्या भागीदा-या आणि त्यामुळे टीम इंडीयाच्या मानसिकतेता झालेला स्वागतार्ह बदल. पूर्वी सुनील गावस्कर बाद झाला कि मोठ्या धावसंख्येच्या दडपणाखाली टीम कोसळत असे. याचं दडपण गावस्करला आयुष्यभर वागवावं लागलं. कपिलच्या उदयानंतर दडपण झुगारून देऊन प्रतिकार करणारं शेपूट दिसू लागलं.

सचिन बाद झाल्यानंतर राहुल द्रवीड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ती परिस्थिती कधीच येऊ दिली नाही. सुनील गावस्करच्या काळात दिलीप वेंगसरकरच्या खेळ्या झाकोळल्या जायच्या. खूपदा डाव सावरूनही सुनील ची चर्चा व्हायची. राहुल हा दिलीप वेंगसरकर बनणार होता. पण ऑस्ट्रेलियापुढे खेळताना लक्ष्मण आणि राहुल या रामलक्ष्मणाच्या जोडीने गेलेला सामना खेचून आणल्यानंतर मि रिलायबल चा द वॉल झाला.

मी असं म्हणेन सचिनच्या खेळीने रसिकांना आनंद दिला. पण परिस्थिती ओळखून जबाबदारीने खेळ करणा-या या खेळाडूंच्या यशाचं माप एकाच्याच अतिरेकी कौतुकाने झाकोळलं जात असेल तर ते ही योग्य नाही. शेवटी या खेळात पैसा नसताना झोकून देऊन भारताला क्रिकेटमधे ओळख देणा-या सुनील, कपिल वर आपण अन्याय तर करत नाही ना हे पाहणंही गरजेचं आहे.

kiranyake | 9 June, 2013 - 04:21 नवीन >>>>>>>>>>> +१०००००००००००००

खेळाडूंच्या स्टॅटिस्टिक्सवरून त्यांच्या महानतेचा क्रम ठरवणार्‍यांना सलाम.
तुमच्यासारखे "रसिक" असल्यामुळेच आम्ही स्वतःचे क्रिकेटप्रेम चारचौघात दाखवायला बिचकू लागलो आहोत.

आणि हो, मॅच ड्रॉ ठेऊन चारशे रन कुटत बसणार्‍या लाराच्या त्या इनिंगचे मूल्य खरेखुरे क्रिकेट बायबल असलेल्या विस्डेनच्या लेखी शून्य आहे. त्यांच्या यादीत पहिल्या शंभरातही ती नाही.
पण त्याच विस्डेनने त्याच लाराची ऑसीजविरुद्धची १५३ धावांची खेळी "सार्वकालिन सर्वोत्कृष्ट" ठरवली आहे. सुदैवाने तिथे आपल्यासारखे 'रसिक' बसलेले नाहीत.

चारशे रन्स करणे हे मात्र माझ्यासारख्या क्रिकेट रसिकाच्या दृष्टीने अदभूतच आहे भले तो सामना ड्रॉ का झालेला असेना. सचिन ने हि त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत शंभर शतके केली त्यातला हि बऱ्याच मॅच ड्रॉ झालेल्या आहेत त्याने त्याच्या शतकांचे मूल्य कमी होत नाही.

विस्डेन च्या साऱ्या गोष्टी मानण्याची काय आवश्यकता. आपण रसिकही सामने पाहतोच ना एकाधि गोष्ट विस्डेन सांगेल म्हणून आपल्याला पटायलाच हवी का ?उद्या विस्डेन ने अजून एखादी यादी काढली आणि त्यात कॅलिस हा जगातला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे असे सांगितले तर भारतातल्या क्रिकेट रसिकांना ते पटेल का? सर्वच बाबतीत विस्डेन ला प्रमाण मानायची काय गरज.

सचिन हा भारतातील राहुल द्रविड नंतरचा उत्कृष्ट खेळाडू आहे त्यात वादच नसावा. राहुल द्रविड ने भले शतकांचे शतक ठोकले नसेल पण संकट समयी भारतीय संघाला त्यानेच सर्वाधिक वेळा तारले असेल.

आता कॅलिस चालत नाहीये म्हणून द्रवीडचे नाव का?
द्रवीडला मानणारा कुठलाही सच्चा फॅन असले धागे काढणार नाही.....तेव्हढे तरी नक्की शिकले पाहिजेल त्याने द्रवीडकडून Happy

"सर्वश्रेष्ठ क्रिकेटर" म्हटलं तर मुरली, शेन वॉर्न, कुंबळे हीं नावं पण विचारार्थ यायला हवींत, असं नाही वाटत? त्यांचीही आंकडेवारी व कामगिरी जबरदस्त आहे ! शिवाय, More the merrier, हें आहेच !!

माझ्या द्रूष्टीनं कुंबळे complete team man आहे.
जबडा तुटल्यावरही तो संघासाठी गोलंदाजी करण्यास आला...
विशेष म्हणजे त्याने १० विकेट्स घेतल्या...
माझ्या मते कुंबळे च ग्रेट...

चु. भू. द्या. घ्या...

माझं क्रिकेटचं जग पार सनी पासून सुरु होतं. वन्डेत सनी टुचुटुचु खेळायचा तेव्हा त्याच्या सोबत आलेल्या श्रीकांतला पहिल्या काही षटकात उंचावून आणि बेधडक फटके मारतांना बघायचो तर धडकी भरायची तेव्हा श्रीकांत मला सर्वश्रेष्ठ वाटला. नंतर कधी नवज्योतसिंग सिद्धुही आवडायचा. विव्हियन रिचर्ड्स तर श्रेष्ठच. नंतर सच्यानं यशाचं आणि विक्रमाचं शिखर ज्या पद्धतीनं गाठलं तेव्हा बॉ आपल्याला खूपच आनंद झाला. एका एका सामन्यात त्याची फलंदाजी पाहिलेली असल्यामुळे त्याच्या धावा पाहिल्या आहेत आणि पुस्तकात असलेले नसलेले आणि त्याने तयार केलेले फटके पाहिले त्याने केलेल्या फलंदाजीचा आस्वाद नुसता साठवून ठेवलेला असल्यामुळे तो आनंद सांगता येणार नाही. फक्त व्हायचं तेव्हा तो निवृत्त झाला नाही एवढी खंत सोडली तर त्याच्या फलंदाजीने दिलेला आनंद सर्वश्रेष्ठच. आम्ही त्याला जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणतो बाकीच्यांना नाही वाटत तर नाही वाटू दे, आपण सालं दुसर्‍याचा मताचा तितकाच आदर करतो. पुढे सच्याचे वयोमानाने फुटवर्क, अवसानघातकी फटके, सोडले तर सच्यानं मैदानावर दिसावं असं वाटायचं. आता क्रिकेट वेगवान झालं. युवी,विराट, रैना, धोनी, हे आहेत आणि अनेक खेळाडू आहेत पण खेळाचा हिशेब-टीशेब केला आणि क्रिकेटकडे उंचावरुन पाहिलं तर सच्याच जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज वाटतो आणि इथेच आमचं फलंदाजीवरील प्रेमाचा समारोप होतो.

-दिलीप बिरुटे

आपण सालं दुसर्‍याचा मताचा तितकाच आदर करतो.<<<

काय सांगताय बिरुटे? हे एक नवीनच लिहिलेत.

तुमच्या पदव्या विसरलो याबद्दल क्षमस्व!

भारतात एकदिवसीय क्रिकेट रूजलं तेच १९८३ च्या विश्वचषकानंतर. तोपर्यंत हे क्रिकेट कुणालाही माहीत नव्हतं. त्याचे रेकॉर्डस देखील जमेस धरत नव्हते. वन डे क्रिकेट कसं खेळतात याची जाण नव्हती आणि तशी गरजही भासत नव्हती. जेव्हां भारताने विश्वचषक जिंकला तेव्हां मात्र एकदिवसीय सामन्यांचा दौ-यात आवर्जून समावेश केला जाऊ लागला. एकदिवसीय सामने गांभिर्याने घेतले जाऊ लागले. पण त्याचे रेकॉर्डस वेगळेच ठेवले जात. आजही पाच दिवसीय क्रिकेट हेच खरे क्रिकेट हे मानणारे रसिक आहेत. शेवटी वनडे क्रिकेट हे उत्पन्नाचे सोर्सेस म्हणून स्विकारले गेलेले झटपट क्रिकेट आहे हे नाकारून चालणार नाही. फुटबॉलचे सामनी नव्वद मिनिटांचे तर वनडे का नको असा युक्तीवाद इथे लागू होत नाही. कारण क्रिकेट हा काही फुटबॉलसारखा वेगवान खेळ नाही. इतर खेळांइतकी दमछाक त्यात होत नाही. असो.

आपल्या विलक्षण तंत्रशुद्ध शैलीत बदल करत सुनीलने नागपूरला ३६ चेंडूत फटकावलेले वेगवान शतक आठवले तर या माणसाकडे आणखी वेळ असता तर नवनवे विक्रम रचले असते यात शंका नाही. सुनील निवृत्त झाला तेव्हाही त्याच्या हालचाली मंदावल्या नव्हत्या किंवा नजर विचलीत झाली नव्हती. तो एक निर्विवाद महान खेळाडू होता. सुनीलचा अभेद्य बचाव ही त्याची नाही तर संघाची गरज होती. त्यातूनच सुनीलने बाद व्हायचं नाही या अलिखित कराराच्या ओझ्याखाली त्याला कायम डाव अनिर्णित ठेवण्याची गणितं डोक्यात ठेवून खेळावं लागलं. धाडसी फटक्यांची लक्झरी त्याच्या नशिबात कधीच नव्हती, क्षमता असतानाही. कारण आपण बाद झालो तर संघ कोसळेल ही भीती त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हती. त्याने हे दडपण झुगारून देऊन खेळ केला असता, आणि मी बाद झालो तर झालो असा दृष्टीकोण ठेवला असता तर कित्येक दारूण अपयशांची नोंद संघाच्या खात्यात झाली असती. सुनील ज्या सामन्यात लवकर बाद झाला त्यात भारतीय फलंदाजीची जी अवस्था झाली त्याने पुढे ते सिद्धच झालेलं आहे.

कपिलने जलदगती गोलंदाजीचा अध्याय सुरू केल्याने आणि अत्यंत धाडसी फलंदाजीचे धडे (फॉलोऑन टाळताना मारलेले सलग चार षटकार वगैरे) घालून दिल्याने तो त्या काळी सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू होता यात दुमत नाही. चारशे बळी हा टप्पा आज विशेष वाटत नसला तरी दौरे आणि सामन्यांची संख्या पाहता ते त्या काळी विशेष होतेच. सर रिचर्ड हॅडलीने हा टप्पा अगदी आरामात पार पाडला होता. त्या काळच्या सर्वोत्तम पाच वेगवान गोलंदाजांमधे इयन बोथम, रिचर्ड हॅडली, कपिलदेव, इम्रान खान यांचा समावेश होता. त्या काळी क्रिकेट खेळणा-या भारताव्यतिरिक्त इतर संघांत वेगवान गोलंदाज म्हणजे दुर्मिळ बाब नव्हती. वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानकडे कारखाना होता, तर ऑस्ट्रेलियात चार गोलंदाजांचे दोन संच (एक राखीव) असायचे. त्यामुळे एका गोलंदाजावर भार येत नसे. चार चार ओव्हर्सचा हप्ता प्रत्येकाच्या वाट्याला येई. कपिलने मात्र आपलं अर्ध आयुष्य भारतातल्या निर्जीव खेळपट्ट्यांवर घाम गाळला. भारतातल्या पाटा विकेटसवर इतक्या दीर्घकाळ कुणीच जलदगती गोलंदाजी केलेली नाही. इतर सर्वांचे विक्रम जलदगती गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवरच झालेले आहेत.

फिरकी निष्प्रभ होत असताना त्याने प्रतिस्पर्ध्यांवर दडपणही ठेवले आणि बळी घेत सामनेही जिंकून दिले. त्याने वेगवान गोलंदाजीची धुरा एकहाती सांभाळली. दुस-या एन्डकडून त्याला कायमस्वरुपी साथ कधीच मिळाली नाही. जगात कुणाच्याच वाट्याला आले नसतील असे मोठमोठे स्पेल त्याच्या वाट्याला येऊनही तो थकलाय असं कधिच वाटलं नाही. तसंच जगातले सर्व प्रमुख वेगवान गोलंदाज ठराविक अंतराने दुखापतीने ग्रस्त होत असताना कपिलच्या फिटनेसचं रहस्य हा चर्चेचा विषय झाला होता. खर तर ती संघाची गरज होती, कारण संघाकडे दुसरा ऑप्शनच नव्हता ! कपिलचा नियंत्रित वेग आणि नियंत्रित स्विंग आणि भरपूर व्यायाम यामुळे त्याला ते शक्य झालं हे त्याने नंतर सांगितलं. बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर युगाचा अस्त झाल्यानंतर गोलंदाजी विभागाची इतकी दुरावस्था होती कि आयसीसीने जर दोन्ही एण्डकडून एकाच खेळाडूला सलग गोलंदाजीची परवानगी दिली असती तर सामन्यातली सर्वच्या सर्व षटके कपिलला टाकायला सांगायला कर्णधार कचरले नसते यात शंका नाही. ईएसपीएन वरून झटकन दिलेली आकडेवारी ही परिस्थिती उभी नाही करू शकत, म्हणूनच कोण कोणत्या परिस्थितीत खेळलं याची कल्पना येत नाही.

मात्र १९८३ ला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मोहिंदर अमरनाथला मिळाला तेव्हां नाबाद १७५ ची खेळी करूनही कपिल का नाही असा प्रश्न कुणाला पडला नाही. कपिलचं असं स्तोम त्याच्या भक्तांनीही माजवलं नव्हतं ना माध्यमांनीही. मोहिंदरकडे देखणं क्रिकेट नव्हतं पण अस्सल क्रिकेट होतं. गरजेच्या वेळी त्याने मिळवून दिलेले बळी आणि केलेल्या धावा यामुळे विजयाचं फिरलेलं पारडं हे निर्जीव आकडेवारी सांगू शकत नाही. शेवटी त्या त्या वेळी उपयुक्त खेळ्या करणारा खेळाडू महत्वाचा. १९८३ च्या विश्वचषकाने हेच शिकवलं. म्हणूनच अचूक सरळ कुंबळे अशी अत्यंत गलिच्छ टीका होउनही सातत्याने बळी घेऊन सहाशे बळी आणि दोनदा दहा बळींचा विक्रम करणारा कुंबळे देखील सर्वोत्तमांपैकी एक असायलाच हवा. त्याला बिचा-याला फॅन्स नाहीत म्हणून त्याचं योगदान जमेस धरायचंच नाही हे समजण्यापलिकडचं असलं तरी मतस्वातंत्र्याचा आदर करायलाच हवा.. नाही का ?

त्या काळी आमचा कपिलच ग्रेट असा जयघोष झाल्याचं ऐकिवात नाही. ज्याच्या त्याच्या श्रेयाचं माप त्याच्या पदरात टाकण्याची उदारमतवादी परंपरा आजही अनेकांच्या नसानसात आहे. शेवटी अमकाच ग्रेट आणि बाकिचे झिरो असा निष्कर्ष काढणा-यांच्याही मताचा आदर केलाच पाहीजे हा त्या उदारमतवादाचाच जय म्हणायला हवा !

@ बेफ़िकीर

>>>काय सांगताय बिरुटे? हे एक नवीनच लिहिलेत.
काय नवीन लिहिलंय ?

>>>> तुमच्या पदव्या विसरलो याबद्दल क्षमस्व!

प्रतिसादाचाही अर्थ काही कळला नाही.
तपशीलवार लिहिलेत तर कळेल, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते ?

मनातल्या मनात : प्रा.डॉ. या बेफिकीरच्या चव ना धवाच्या 'काही' गझला वाचाव्या लागतील असं दिसतंय !

-दिलीप बिरुटे

सुनील गावस्कर हा महान खेळाडू होता ह्यात वादच नाही.वेस्ट विंडीजच्या तोफखान्याला त्याने ज्या प्रकारे तोंड दिले त्याला तोड नाही आणि हे तो हेल्मेट न घालता खेळायचा ते विशेष.सुनील गावस्करने वेगवान गोलंदाजीचा सामना कसा करायचा ते इतर फलंदाजांना दाखवून दिले.

त्यानंतर कपिल हा भारतातला गोलंदाजांचा आदर्श होता.त्यात तो फलंदाजीही तुफानी करायचा. फक्त खेळाडू म्हणून नव्हे तर कर्णधार म्हणूनही तो ग्रेटच होता.भारताबद्दल बोलायचे तर सुनील गावस्कर नंतर राहुल द्रविड, गांगुली,सेहवाग, लक्ष्मन हे भारताला ग्रेट खेळाडू मिळाले.

मोहम्मद अझहरुद्दीन हा हि भारताचा यशस्वी कर्णधार होता त्याच्या कर्णधारपदाच्या काळात सचिनचा खेळ खऱ्या अर्थाने बहरला .अझहरच्या यशस्वी कारकिर्दीत सचिनचाही सिंहाचा वाट होता. आणि एक खेळाडू म्हणून विचार केला तर अझहरची गणना महान फलंदाजातच करावी लागेल.

भारताबद्दल बोलायचे तर सुनील गावस्कर नंतर राहुल द्रविड, गांगुली,सेहवाग, लक्ष्मन हे भारताला ग्रेट खेळाडू मिळाले. >>>
सचिनचा अनुल्लेख का ? Lol
दुस-याच्या प्रतिक्रियेवर आपण का प्रतिक्रिया द्यावी ? सचिन हा ही सर्वोत्तम आहेच आहे. कुणीही नंतर नाही कि आधी नाही. परिस्थिती, काळ या प्रमाणे नवनवे विक्रमादीत्य येत असतात.

Pages