Submitted by panks on 5 June, 2013 - 04:35
देवळाच्या घाभाऱ्यात बसलेल्या देवाला विचारल
मिळत कारे समाधान तुला या चार भिंतीत
त्यातील समोरची भिंत सजीव पण सतत बदलणारी
त्या भिंतीवरचे भाव वेगळे रंग वेगळे रूप वेगळे
पण एक गोष्ट सारखीच तिचे डोळे जे सदैव मिटलेले
अन तुझ्या अखंड कृपेची वाट बघणारे
तुलाही आता सवय झाली असेल या रंगांची आणि
मिटलेल्या डोळ्यातील अपेक्षांची.
का कंटाळलास तू सुद्धा या रोजच्याच अपेक्षांनी भरलेल्या भिंतीना
वाटत तुलाही जाव पळून कुठेतरी निर्जन ठिकाणी
जेथे असेल फक्त निरागस प्रेम ना कुठल्या भिंती ना कुठले आसन
पण तुला तसही करून चालणार नाही
कारण तुला ह्या भिंतीनीच आसनावर सुरक्षित वा बंदिस्थ
करून ठेवलय त्यांच्या अखंड इच्छापूर्तीसाठी
राहा असच सदैव ह्या चार भिंतीत घुसमटत
कारण अजून तरी कुणी देव तू स्वतःसाठी निर्माण केला नाहीस
स्वतःच्या इच्छा अपेक्षांसाठी.
-पंकज
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. "समोरची भिंत", "सदैव
छान आहे. "समोरची भिंत", "सदैव मिटलेले डोळे" कल्पना आवडल्या.
छान आहे.
छान आहे.
नमस्कार देवा ! खूप दिवसांनी
नमस्कार देवा !
खूप दिवसांनी आज कोणितरी देउळात येऊन देवाची काळजी दाखवुन गेलं !
छान आहे . . . .