तिन्ही सांजा सूरमयी
अंगणी चांदणं प्रसन्न
वृन्दावनी तुळशीच्या
मंद तेवतो 'यमन' ||1||
भाळी रिषभाची तीट
गाली निषादाची खळी
धुंद गंधाराचा गंध
शोभे षड्ज सोनसळी || 2||
किती स्वरांग लोभस
भासे सुहास वदन
रूप सोवळे सोज्वळ
सखा स्नेहल 'यमन' ||3||
येता आठव प्रियेची
होता सैर भैर मन
ऋणझुणतो प्रियेचा
गोड पैंजणी 'यमन' ||4||
धुंद श्वासांची मैफल
रंगे स्पर्शाचा सोहळा
देह्भरून प्रियेच्या
उरे 'यमन' आगळा ||5||
संगे टाळ चिपळ्यांच्या
रंगे कैवल्य सोहळा
उभा 'यमन' कीर्तनी
मनी विठ्ठल दाटला ||6||
कधी कीर्तनी रंगतो
'ख्याली' आनंदे दंगतो
'यमन' गझल सखा
कधी दोहे आळवितो ॥7||
कधी 'शाहीदी' यमन
कधी 'राशिदी' यमन
करी विकल मनाचे
आर्जवुनी शांतवन ||8||
शाम रंग खुलवितो
गाली राधेच्या 'यमन'
चिंब भिजवितो कृष्णा
आर्त मीरेचा 'यमन' ||9||
किती रुपात राधेला
भेटे सावळा श्रीरंग
तैसा मनास माझीया
भुलवितो 'यमन-रंग' ||10||
-श्री.
छान आहे रचना...गुणगुणून
छान आहे रचना...गुणगुणून पाहिली...प्रसन्न वाटलं.
छान
छान
<< भाळी रिषभाची तीट गाली
<< भाळी रिषभाची तीट
गाली निषादाची खळी
धुंद गंधाराचा गंध
शोभे षड्ज सोनसळी >>
..... प्रसन्न प्रसन्न. व्वा व्वा श्रीरंग ....
सा रे ग प ध सां .....
श्रीरंग, अतिशय सुंदर जमलीये
श्रीरंग, अतिशय सुंदर जमलीये ही रचना.
(किशोर, सा रे ग प ध सा? हे काय आहे?)
छान्,छान्,छान....
छान्,छान्,छान....
अहाहा...............काय सुरेख
अहाहा...............काय सुरेख रचना !!
खूप खूप प्रसन्न वाटलं
जियो !!
सगळ्यांचे आभार !!
सगळ्यांचे आभार !!
संगीतातील काही म्हणजे काही
संगीतातील काही म्हणजे काही मला कळत नाही
पण कविता अत्यंत गोड / प्रासादिक वाटली
आवडली
धन्यवाद वैभव. यमन खूप गोड राग
धन्यवाद वैभव.
यमन खूप गोड राग आहे. मन प्रसन्न करणारा राग आहे. आपण रोज ऐकतो त्यातली कितीतरी गाणी याच रागावरची आहेत. गझल,भक्तीसंगीत,चित्रपट गीते अशा कितीतरी रुपात यमन भेटत असतो. तेच शब्दात मांडण्याचा हा लहानसा प्रयत्न.
रंजीशी सही -- यमन
घरसे निकलते ही -- यमन
भय इथले संपत नाही -- यमन
श्री राम चंद्र कृपाळू -- यमन
मागे उभा मंगेश -- यमन
देवाघरचे ज्ञात कुणाला - यमन
पराधीन आहे जगती - यमन
आणि अशी कितीतरी गाणी…
वाह !!! फार सुंदर रचना!!!
वाह !!! फार सुंदर रचना!!!
अतीशय प्रासादिक आणी मनापासून
अतीशय प्रासादिक आणी मनापासून आलेलं काव्य...मस्त एकदम
आणी यमन जिवापाड अवडतो,म्हणून ही आमच्या कडून यमनांची भेट
निगाहें मिलाने को जी चाहता है...
आंसू भरीं है..ये जीवन की राहे...
जेथे सागर धरणी मिळते..
जाता है तु कंहां...रे बाबा जाता है तुं कंहां...
तुम दिल की धडकन मै रहेते हो...रेहेते हो...
यमन माझाही लाडका राग. कविता
यमन माझाही लाडका राग. कविता चांगली आहे.
शाहीदी-राशिदी यमन? - नाही कळाले.
शाहीदी-राशिदी यमन? >>>>
शाहीदी-राशिदी यमन? >>>> बहुतेक शाहिदभाईंनी (उ. शाहिद परवेझ) वाजवलेला व राशिदभाईंनी ( उ. राशीद खान) गायलेला म्हणायचे असेल ....
ओह.. थँक यू!
ओह.. थँक यू!
मस्त
मस्त
वाह! छान अजून यमनाशी गाठ
वाह! छान अजून यमनाशी गाठ घडली नाहीये (शिकतांना), तेव्हा त्याचे आरोह अवरोह आणी चलन कुणी शिकवले तर कवितेची गोडी वाढेलच
शाहीदी-राशिदी यमन? >>>>
शाहीदी-राशिदी यमन? >>>> बहुतेक शाहिदभाईंनी (उ. शाहिद परवेझ) वाजवलेला व राशिदभाईंनी ( उ. राशीद खान) गायलेला म्हणायचे असेल .... >>>
Right on . . अगदी हेच म्हणायचं होतं . . दोघांचाही यमन मला खूप आवडतो .
छान रंगवलेत यमन-रंग.
छान रंगवलेत यमन-रंग.
खूप सुंदर कवितीक परिचय
खूप सुंदर कवितीक परिचय यमनाच्या रूपांचा.(ही रचनाही यमनात गाता येईल का ?)
अजून राग-रंग येऊ द्यात श्रीयू..
धन्यवाद भारती ताई. बर्याच
धन्यवाद भारती ताई. बर्याच दिवसांनी सुचलेली ही पहिलीच कविता.
मायबोली वरील सगळ्या रसिकांचे आभार.
व्वा ! सुरेख कविता. इथे
व्वा ! सुरेख कविता.
इथे शाहिदी यमन आहे.