हुलकडूबी नाव

Submitted by अभय आर्वीकर on 2 June, 2013 - 05:19

हुलकडूबी नाव

यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे

हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे

दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे

मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे

जीवनाने नोंद घ्यावी
जिंकलो मी डाव आहे

भ्रष्ट, लंपट, चोरटा पण;
बोलताना साव आहे

पेटलो मी पूर्ण कोठे?
अंतरंगी वाव आहे

फुंकताना धाप कसली
’अभय’ झाले घाव आहे!

                        - गंगाधर मुटे
-------------------------------------
ढोबळमानाने शब्दांचे रूढार्थ
फेकणे = अतिरंजित बढाया मारणे
हुलकडूबी = अती हुरळून जाणारी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विदीपा,
माझ्या कोणत्याही गझलेला गझल म्हणून न स्विकारणार्‍या तुमच्या चिकाटीचेही कौतुक केले पाहिजे. Happy