हृदयात उगाचच धाकधूक का होते

Submitted by बेफ़िकीर on 27 May, 2013 - 08:45

हृदयात उगाचच धाकधूक का होते
येणार्‍या मरणा तुझी चूक का होते

या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते

कोणी शर्थीने होईना अपुलेसे
अन् कुणी आपले आपसूक का होते

मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते

कुठल्या स्वप्नांनी उगम पावते वेडी
ही नदी मुखाशी पूर्ण मूक का होते

'बेफिकीर' पुढची पिढी पाहुनी कळले
की म्हातार्‍यांना भूक भूक का होते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव मस्त गझल
तशी तुमची प्रत्येक गझल खूप आवडतेच आज खूप दिवसांनी एखादी गझल त्यापेक्षाही जास्त आवडली

मतल्यावरून सहज माझा एक नवा शेर आठवला ......

मेल्यानंतर कळले जी हुरहुर श्वासांमधली सुटली
ते दुसरे काहीही नव्हते साधे जीवनभय होते

Happy

क्या बात है!!!

कोणी शर्थीने होईना अपुलेसे
अन् कुणी आपले आपसूक का होते

मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते

कुठल्या स्वप्नांनी उगम पावते वेडी
ही नदी मुखाशी पूर्ण मूक का होते

'बेफिकीर' पुढची पिढी पाहुनी कळले
की म्हातार्‍यांना भूक भूक का होते

हे सारेच शेर बहारदार......

मतला आधी ह्या शेरांच्या मानाने तुल्यबळ वाटला नव्हता.... मात्र थोडा विचार केल्यावर आवडला...

मस्त गझल.

मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते <<< व्वा ! >>>

मस्त गझल....

हृदयात उगाचच धाकधूक का होते
येणार्‍या मरणा तुझी चूक का होते

मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते

व्वा! मतला फार आवडला.

नदीचा शेर समजत नाहीये. प्रतिमांचा परस्परसंबंध जोडू शकत नाहीये मी!

कुठल्या स्वप्नांनी उगम पावते वेडी
ही नदी मुखाशी पूर्ण मूक का होते

मुखाशी मुके होणे यातील विरोधाभास आहेच,त्याहूनही स्वप्नांमध्ये उगम पावून शेवटी मौनात विराम पावणारी ही वेडी नदी ,येणार्‍या सुनिश्चित मरणाशी चुकामूक साधत होणारे जगणे.प्रत्येक द्विपदी आवडली..

या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते

कोणी शर्थीने होईना अपुलेसे
अन् कुणी आपले आपसूक का होते

मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते

कुठल्या स्वप्नांनी उगम पावते वेडी
ही नदी मुखाशी पूर्ण मूक का होते

अफलातून हरेक शेर बेफिजी !

दंडवत !!!

-सुप्रिया.

या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते

कोणी शर्थीने होईना अपुलेसे
अन् कुणी आपले आपसूक का होते

कुठल्या स्वप्नांनी उगम पावते वेडी
ही नदी मुखाशी पूर्ण मूक का होते

सुरेख शेर ! आवडले.
एकूणच गझल वैशिष्ठ्यपूर्ण वाटली. मात्र शेवटचा शेर समजला नाही.

धन्यवाद, पुलेशु.

करमणूक आणि आपसूक हे शेर फार आवडले!!

शेवटचा शेर मलाही पटकन कळला नाही. पण पुन्हा वाचल्यावर लागलेल्या अर्थाने धस्स झालं.
नदीचा मात्र अजूनही समजत नाहीये. उद्या पुन्हा वाचून पाहीन Happy

बेफिकीर,

सुंदर रचना आहे. थोडी आखूड वाटली. नेहमी तुमच्या गझला जरा लांब असतात. अर्थात हे एक तटस्थ निरीक्षण आहे.

करमणूक आणि शेवटचा शेर खासकरून आवडले.

आ.न.,
-गा.पै.

सुंदर रचना आहे. थोडी आखूड वाटली. नेहमी तुमच्या गझला जरा लांब असतात. अर्थात हे एक तटस्थ निरीक्षण आहे.
<<

वाव्वावा! क्या ब्बात! आखुड, लांब ही गझलेची विषेशणे (की विशेषणे?) लै 'अ‍ॅप्ट' हैत बगा! अहह! दिल खुस झाला!!

गापै,
इथे गझलांचे रविकिरण मंडळ पर्तिसाद देत बसलेय. तुम्हीच शायर पैलवान अशी आय्डी घेतलीये काहो?

या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते

हा शेर उल्लेखनीय वाटला.
गझल छान झालीय.

मस्तच... बर्‍याच दिवसांनी फ्रेश गझल वाचायला मिळाली.

सगळेचशेर उत्तम ,....

मतल्यातला सानी जरा कमजोर वाटला किंवा पोचला नाही.

हृदयात उगाचच धाकधूक का होते
ये मरणा येना तुझी चूक का होते ? असे उचंबळून आले आहे.

Happy

सुंदर !!

हे शेर खास आवडले
या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते

मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते

शेवटचा शेर कळाला नाही ...असो , पुढे मागे कळेल कधी तरी परत वाचेन तेव्हआ!!

गझल आवडली
>>या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते<<

हा शेर वाचताना खालील दोन आठवले.

पाठलागावरील आनंदा
ये इथे तू...... इथून गेलो मी

मला वाटेल तेव्हा मी मला मानेन आनंदी
कुठे आहात तुम्हीही मला बांधील दु:खांनो?

हे तिन्ही पार्ट १, पार्ट २, पार्ट ३ आहेत काय? Happy ( कृपया हलके घेणे )

या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते

क्या बात है .

कोणी शर्थीने होईना अपुलेसे
अन् कुणी आपले आपसूक का होते

मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते>>>
टॉप शेर!!

माझी वाचायची राहिली होती ही...

भूक -भूक का होते >>तो मिसरा तितकासा समजला नाही
(बहुधा माझाच दोष असावा)
बाकी ब्येस ..As always!!:स्मित:

या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते

कोणी शर्थीने होईना अपुलेसे
अन् कुणी आपले आपसूक का होते

मस्त!!!