हृदयात उगाचच धाकधूक का होते

हृदयात उगाचच धाकधूक का होते

Submitted by बेफ़िकीर on 27 May, 2013 - 08:45

हृदयात उगाचच धाकधूक का होते
येणार्‍या मरणा तुझी चूक का होते

या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते

कोणी शर्थीने होईना अपुलेसे
अन् कुणी आपले आपसूक का होते

मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते

कुठल्या स्वप्नांनी उगम पावते वेडी
ही नदी मुखाशी पूर्ण मूक का होते

'बेफिकीर' पुढची पिढी पाहुनी कळले
की म्हातार्‍यांना भूक भूक का होते

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - हृदयात उगाचच धाकधूक का होते