अॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :
super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही..
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही..
Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..
sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो
m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..
camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..
flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.
Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.
Battery Doctor - कोणत्या अॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.
ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.
Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.
GPS Essentials - GPS Tracking साठी
Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी
Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.
LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]
Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे
PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्या करामती...
App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते
Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले
पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अॅप आहे.
fm radio india :- नावाचे एक छान अॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अॅप. ट्राय करून पहा
Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....
TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...
AppLock :- हे लॉक अॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .
Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अॅप्लिकेशन
अॅप्लिकेशन काढल्यावर माझ्या
अॅप्लिकेशन काढल्यावर माझ्या मते त्यातला डाटा जात नाही
जातो डाटा उदयन.... किंवा
जातो डाटा उदयन.... किंवा एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये दिसतो... ओपन करता येत नाही.
डॉक्टर .. मी त्या सुपर
डॉक्टर .. मी त्या सुपर सिक्युरीटीमधे ठेवलेले फोटो आणि व्हिडीओ बद्दल बोलत आहे...तो डाटा जात नाही बहुदा....
\झकासराव...गुगलुन बघा ...:)
प्रत्येक वेळी स्ट्रोन्ग बॉक्स
प्रत्येक वेळी स्ट्रोन्ग बॉक्स मध्ये क्लिक केलं की आधी एसडी कार्ड स्कॅन चा मेसेज येतो आणि मग अॅप फोर्सफुल्ली क्लोज.>> माझे पण सेम असेच होत आहे. काय उपाय?? की uninstall करावे??
मित, कुठलंतरी एक अॅप आहे
मित, कुठलंतरी एक अॅप आहे त्याने सगळी अॅप्स मेमरी कार्डवर ट्रान्स्फर करता येतात. फोन मेमरी रिकामी रहाते. त्याचं नांव कळलं की देतो.
झकास, सुपर सेक्युरिटी फक्त
झकास, सुपर सेक्युरिटी फक्त आहे त्या डेटा / अॅप्स भोवती एक पासवर्डचे कवच घालते. जरी ते uninstall केले तरी डेटा जाणार नाही.
हेम, माझ्या माहितीत तरी अॅप एसडी कार्डावर हलवायला रुटींग करावे लागते. ते कुठच्या अॅपने होत असेल आणि तो तुम्हाला माहिती असेल तर इथे नक्की लिहा.
गुगल मॅप्स युट्युब वगैरे कसे
गुगल मॅप्स युट्युब वगैरे कसे उडवायचे?
काढायला जमले नाही... काही उपाय?
रुट करावा लागेल का?
धन्यवाद सर्वांचे. डाटा
धन्यवाद सर्वांचे.
डाटा क्रिप्टेड राहिल बहुतेक.
आज काढुन बघतो सुपर सेक्युरिटी.
अन इन्स्टॉल केल्यावर डेटा
अन इन्स्टॉल केल्यावर डेटा जाईल.
या सिक्यूरिटी अॅप्स फाईलनेम बदलून चालतात. एकतर त्या मेडिया फोल्डरमधे एक .nomedia नावाची फाईल वा फोल्डर असतो. किंवा फाईल सुरुवातीला (डॉट) . देऊन रिनेम केली जाते. उदा. img0001.jpg --> .img0001 एक्स्टेन्शन उडविले जाते, किंवा बदलले जाते. या दोन्हीमुळे ग्यालरीत तो फोटो/व्हिडिओ दिसत नाही.
त्या अॅपच्या हेल्प मधे तुमचा डेटा कुठे ठेवलाय त्याचा पाथ दिलेला असेल. तो शोधा, किंवा थोडे गूगलून पहा की हे अॅप नक्की कुठे डेटा ठेवतेय. डेटा रिट्रिव्ह करा, मग अन इन्स्टॉल करून टाका.
दुसरा मार्ग अॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा. हे करताना क्लिअर डेटा किंवा क्लिअर कॅशे करू नका. किंवा अॅप अपडेट उपलब्ध असेल तर अपग्रेड करा. काही अॅप्स डेटा परत मिळवून देतात.
***
गुंडोपंत,
यूट्यूब उडवू नका असा एक फु.स. कारण त्या अॅपमुळे यूट्यूब व्हिडिओज दिसतात. ICS पासून पुढे फ्लॅश नसतो फोन मधे. एक्स्प्लोरर मधे फ्लॅश व्हिडू पहायचे वांधे होतात मग..
उडवायचेच असेल, तर मात्र फोन रूट करावा लागेल. कारण ९९% फोन्स मधे ते सिस्टिम अॅप आहे.
१००
१००
धन्यवाद इब्लिस!
धन्यवाद इब्लिस!
काल मित्राकडून internal
काल मित्राकडून internal memory वाढवण्याचा अजून एक उपाय समजला... जो तो स्वतः वापरतो आणि त्याच्यामते त्याला फायदाही होतो..
कीपॅडवर *#९९००# दाबल्यावर एक स्क्रीन येते ज्यात 'Copy to SD Card' असा option दिसतो.. त्यावर क्लीक केल्याने internal memory फ्री होते...
कोणी केलाय का हा प्रयोग?
काल फाइल मॅनेजर मधुन सगळ्या
काल फाइल मॅनेजर मधुन सगळ्या फायली हुडकल्या.
अॅप अनइन्स्टॉल केल्यावरही डाटा तसाच राहतो.
फक्त स्पेसिफिक फोल्डर शोधावा लागतो.
तो मिळाला. त्यातील फाइल्स मिळाल्या.
धन्यवाद हो..
डाटा तसाच राहतो किंवा जातो हे
डाटा तसाच राहतो किंवा जातो हे अॅप वर अवलंबून असते. मी अॅन्ड्रॉईड अॅप बनवले आहे. त्यात तुम्ही डाटा कुठे ठेवायचा हे सांगू शकता (लिंक). त्यामूळे डाटा नेहमीच राहील ह्याची खात्री नाही.. ते अॅप च्या डेव्हलपर वर अवलंबून आहे.
SD card वर काहीच अॅप कॉपी होऊ शकतात... हे सुद्धा अॅप च्या डेव्हलपर वर अवलंबून आहे (लिंक).. SD card वर अॅप नेल्याने ते हळू चालतात असे वाचले होते कुठेतरी...पण त्याला कुठेही आधार म्हणून डॉक वाचले नाही...
फोन restart होताना असे कॉपी केलेले अॅप उशीरा लोड होतात. (अनुभव)
मायक्रोमॅक्सचा डिफॉल्ट
मायक्रोमॅक्सचा डिफॉल्ट म्युझीक प्लेअर तितकासा उपयुक्त नाहीये. त्यावर जॉनर नुसार गाणी नाही प्ले होत. दुसरा कुठला म्युझीक प्लेअर (अर्थात फ्री) चांगला आहे?
mx player
mx player
उदय, तो आहेच पण तो फक्त
उदय, तो आहेच पण तो फक्त व्हिडीओ करता आहे ना? मला ऑडीओ करता हवाय.
त्यात ऑडिओ देखील
त्यात ऑडिओ देखील आहे..........बाकी विनअॅम्प देखील आहे...पण तो जास्त जागा घेतो रीअलप्लॅअर देखील आहे
अॅन्ड्रॉईड वरुन पीडीएफ
अॅन्ड्रॉईड वरुन पीडीएफ फाइल्स कशा डीलीट करायच्या माहीत आहे का (कॉम्पुटर ला न जोडता)?
तुझ्य मोबाईल मधे आहे
तुझ्य मोबाईल मधे आहे का...........कशात अहेत...?
अँड्रोईड असिस्टन्ट म्हनुन अॅप्लिकेशन आहे ... त्यात टुल्स मधे....फाईल मॅनेजर आहे.. त्यात जाउन तु तुझ्या फाईल्स डिलिट करु शकतोस
मोबाइल मधेच आहेत. अँड्रोईड
मोबाइल मधेच आहेत. अँड्रोईड असिस्टन्ट डा.लो. करुन बघतो. बाकी कोणत्याही टुल ने ह्या फाइल्स डीलीट होत नाहीत
इन कमिंग कॉल करणार्याचा आवाज
इन कमिंग कॉल करणार्याचा आवाज रेकोर्ड करायचा असेल तर काय करायचे?
कोणते अॅप्लिकेशन असल्यास लिंक द्या.
https://play.google.com/store
https://play.google.com/store/apps/details?id=polis.app.callrecorder&fea.....
हे बघ एक आहे...
साधारण एका वर्षापूर्वी
साधारण एका वर्षापूर्वी Samsung Galaxy Ace Plus मी पुण्यातल्या क्रोमातून घेतला.. काही दिवसांपूर्वी पुण्यात गेलो होतो महिन्याभराकरता तेव्हा बॅटरी साधारण ३-४ दिवस चालली. इंटरनॅशनल रोमिंग असल्याने कॉल्स शून्य पण वायफाय वरुन इंटरनेट वापर भरपूर. (थोपु,वॉअॅ, जीमेल, गुगल सर्च ) पण ह्याच फोनची बॅटरी इकडे गल्फात १ दिवसात खलास ! कॉलिंग दिवसाला जेमतेम एखाद-दुसरा कॉल आणि ते ही १-२ मिनिटांपेक्षा जास्त नसतात. इथे इंटरनेट वापर पॅकेटडेटा वरुन करतो आणि मोबाईलवरुन इंटरनेट फक्त वॉअॅ साठीच वापरतो. माझ्या माहितीनुसार वायफाय आणि पॅकेट डेटा दोन्हीपैकी वायफाय ला जास्त बॅटरी वापर होतो.. मग बॅटरी इथे जास्त लवकर संपायचे कारण इथला सर्विस प्रोवायडर असेल का ?? Battery Usage मधे cell standby 50% आणि phone idle 50% असं दिसतं इथे. पुण्यात पाहिलं नव्हतं.
रच्याकने, १-२ दिवसापूर्वी Juice Defender install केलं. आता १ दिवस चालणारी बॅटरी हे अॅप टाकल्यावर २ दिवस टिकली !
सोनी एक्स्पिरिआ ई कसा आहे ?
सोनी एक्स्पिरिआ ई कसा आहे ?
Android कंपनीच्या Sepcs. मधिल
Android कंपनीच्या Sepcs. मधिल Imp. Apps मधे फक्त Google देत आहेत. नविन Android घेताना कंपनी कडून किमान किती आणि कोणत्या Imp. Appsची अपेक्षा ठेवावी?
एल जि च्या नवीन एल ३ ,५ मध्ये
एल जि च्या नवीन एल ३ ,५ मध्ये अॅनडरॉईड ४.० आ सै आहे पण (heavily skinned) जाड आवरण आहे तर घेऊ नये का ?अॅपस हळू चालतात का ?
मग बॅटरी इथे जास्त लवकर
मग बॅटरी इथे जास्त लवकर संपायचे कारण इथला सर्विस प्रोवायडर असेल का ?? Battery Usage मधे cell standby 50% आणि phone idle 50% असं दिसतं इथे. पुण्यात पाहिलं नव्हतं. >> इथे म्हणजे कुठे?
नात्या, हे पहा काय म्हटलेत ते
नात्या, हे पहा काय म्हटलेत ते : " पण ह्याच फोनची बॅटरी इकडे गल्फात १ दिवसात"
गल्फात = आखाती देशांत असे काहिसे म्हणायचे असावे..
मग बॅटरी इथे जास्त लवकर
मग बॅटरी इथे जास्त लवकर संपायचे कारण इथला सर्विस प्रोवायडर असेल का>>>> असेल देखिल. जर सिग्नल विक असला किंवा सतत गायब होत असला तर मोबाईल कनेक्टीव्हिटीसाठी नेटवर्क स्कॅन करत राहतो त्यामुळे बॅटरी लवकर डीसी होत असेल.
Pages