मटर चुडा

Submitted by हर्शा १५ on 22 May, 2013 - 12:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जाडे पोहे १ मोठी वाटी , १/२ वाटी फ्रेश हिरवे वाटणे / मटार, १ चमचा जिरे , १ मोठे चमचा साजूक तूप , चुटकी भर हिंग , दोन हिरव्या मिरचा, १/४ चमचा मिरे पूड ,१/२ चमचा गरम मसाला, २ लवंग , एक मोठी वेलची , २ तमालपत्र ,१/४ आमचूर पावडर / लिंबू रस चवीनुसार मीठ , वेलदोडा आणिक काजू सजावटी साठी .

क्रमवार पाककृती: 

पोहे धून भिजत घालावे ५-७ min .
कढई मध्ये तूप घालून गरम झालावार त्यात हिंग ,जिरे, मिर्ची ची फोडणी करावी
आता यात तमालपत्र ,वेलची, आणिक लवंग घालून एक सेकंद परतावे .
मग मटार घालून ते शिजत ठेवावे किंचित पाणी टाकावे आणिक झाकून वाफ काढावी.
मटार शिजले किवा मऊ झाले कि त्यात जर पाणी शिलक राहिले तर ते जिरू द्यावे मग यात पोहे घालावे आणिक नीट परतून एक सारखे करावे .
नंतर मीठ, मिरे पूड व गरम मसाला,आमचूर पावडर / लिंबू रस घालून दोन मीन चांगले हलवावे , परत झाकण ठेऊन एक वाफ काढावी.
शेवटी त्यात वेलदोडा आणिक काजू घालून सर्व करावे

वाढणी/प्रमाण: 
दोन व्यक्ति
अधिक टिपा: 

मटार जर एक वाटी पोहे ला एक वाटी प्रमाणात घेतले तर अजून छान वाटते पण ते सुधा ताजे हवे . आणिक सर्व करता ना जर अजून एक चमचा तूप घातले तर मस्तच चव येते Happy

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली वाटतेय रेसिपी.
नेहमीच्या पोह्यांपेक्षा वेगळे आहेत. पण नाश्त्याला खूप मसालेदार वाटतील का?

छान वेगळा प्रकार आहे.
तूम्ही आहारशास्त्र या विभागात हे लेखन हलवा, ( परत संपादन केल्यास ग्रुप निवडता येईल ).

छान प्रकार आहे.
या मध्ये बटाटा बारीक कापून(काचर्‍या) व वांगे तेही बारीक करुन घातले तर अजून छान चव येते.

सर्वप्रथम पहिला प्रयास ला प्रतिसाद दिलल्या बदल . हि पाककृती मटार मूडे कमी मसालेदार वाटते तरी आपण मसाले चे प्रमाण कमी जास्त करू शकता .

विजय आंग्रे
हो नक्की यात काही वेग्डे प्रयोग करता येतात पण हि एक पारंपारिक पोहे ची पाककृती आहे कांदे पोहे सारखी विशेषतः हिवाडत Happy