लागेल थोडे तेल धगास आता

Submitted by डॉ. बंडोपंत on 18 May, 2013 - 05:58

वाटे मला हा देश भकास आता
शांती कधी लाभेल जगास आता

पेटेल क्रांती देश नवा कराया
लागेल थोडे तेल धगास आता

ॠतू अवेळी रंग नवाच फेकी
आणू नव्या शोधून ढगास आता

मौनी असे राजा ललनेस दारी
सोडायची ना त्यास मिजास आता

गेली कशी गूरे बघ छावणीला
लागेल मोठ्ठ टाळ घरास आता

चेकाळली श्वाने लत वासनेची
जाईल कोण्या देश थरास आता

(मार्गदर्शन अपेक्षीत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बदल करता येईल !<<<<<<<<
क्षमस्व !!!
ते डिपार्टमेंट देव्सरांचे Proud