आस नवचैतन्याची ...

Submitted by पुरंदरे शशांक on 15 May, 2013 - 00:54

आस नवचैतन्याची ...

घुसमट तगमग शब्दही झाले नको नकोसे
आकाश मोकळे अता निरखू दे जराजरासे

येऊ दे जरा तो झुळझुळणारा रेशीमवारा
श्वासात भरु दे रानसुंगध हा घमघमणारा

शीळ कुणा पक्ष्याची येवो अर्ध जरिही
तुटलेली ही तार जुळावी सहज मनींची

मनपक्षी वेडा विहरत जावो दिगंतरासी
कंठात घेऊनी गाणी नवनवचैतन्याची .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

सर्व जाणकार, रसिकांचे मनापासून आभार....
(खूप उशीराने आभार मानत आहे - त्याबद्दल दिलगीर...)