अकबर इलाहाबादी

Submitted by समीर चव्हाण on 15 May, 2013 - 02:28

काही वर्षांपूर्वी अकबर इलाहाबादीचा एक कविता-संग्रह माझ्या वाचनात आला. थोडा चाळल्यानंतर त्याची काही मते मला टोकाची, अपरिपक्व वाटली म्हणून तो तसाच ठेवून दिला. काही महिन्यांपूर्वी अनंतकडून अकबरचा एक शेर ऐकल्यावर खूप वाईट वाटले. बरेच दिवस ती अस्वस्थता राहिली. तो शेर (जो अकबरच्या संग्रहात फुटकर अशआर मधे सामील) आहे:

हुए इस कदर मुहज़्ज़ब, कभी घर का मुंह न देखा
कटी उम्र होटलों में, मरे अस्पताल जाकर

(मुहज़्ज़ब: सभ्य)

काही दिवसांपासून अकबर गंभीरपणे वाचताना त्याचे बरेच सुंदर शेर मला सापडले. ते सगळ्यांसोबत शेअर करावे ह्या लिखाणाचा हा एक उद्देश्य.

क्या तुम से कहें जहां को कैसा पाया
गफलत ही में आदमी को डूबा पाया

दुनिया उभारती है आज अपने आशिकों को
मर जाएंगे तो उनका कल नाम भी न लेगी

हादिसें अपने तरीकों से गुज़रते ही रहे
क्यों हुआ ऐसा, हम तहकी़क़ करते ही रहे

ये सच है, बेख़बर है निस्फ दुनिया निस्फ दुनिया से
कि ये मातम में है मसरूफ, और वो चैन करती है

(निस्फ: अर्धी)

तलबे-इश्क़ का इक जोश है फितरत से अयां
जिस तरफ देखिए तूफाने-खुदअराई है

(अयां: प्रकट, खुदअराई: आत्म-प्रदर्शन)

हा मीरचा शेर तर नाही ना, असे वाटून गेले.

मुद्दतों कायम रहेंगी अब दिलों में गर्मियां
मैनें फोटो ले लिया, उसने नज़र पहचान ली

वर बशीर बद्र वरचा प्रभाव जाणवला.

होश भी बार है तबीयत पर
क्या कहूं हाल नातवानी का

(बारः ओझे, नातवानी: कमजोरी)

सदियों फिलासफी की चुनां और चुनी रही
लेकिन खुदा की बात जहां थी वही रही

काही सोशल इश्यूज वर त्याचे भाष्य चिंतनीय आहे.

सोसायटी से अलग हो तो जि़न्दगी दुश्वार
अगर मिली तो नतीजा मलाल होता है

(मलाल: उदासी)

हम क्या कहे अहबाब क्या कारे-नुमाया कर गए
बी ए हुए, नौकर हुए, पेंशन मिली, फिर मर गए

(अहबाब: यार, कार-नुमाया: उल्लेखनीय कार्य)

ही तक्रार पहा (विशेषतः सांगण्याचा लहजा)

थे मुअज्जि़ज़ शख्स़ लेकिन उनकी लाइफ क्या लिखूं
गुफ्तनी दर्जे-गज़ट, बाकी जो है नागुफ्तनी

(गुफ्तनी: सांगण्यालायक)

सेल्फ-रेसपेक्ट का वक्त़ आए कहां से अकबर
देख तो गौर से दुनिया को, किधर जाती है

उसकी बेटी ने उठा रक्खी है दुनिया सर पर
खै़रियत गुज़री कि अंगूर के बेटा न हुआ

(दारू म्हणजे अंगूर की बेटी)

काही शेर साहित्यिकांसाठी:

दिल छोडकर ज़बान के पहलू पे आ पडे
हम लोग शायरी से बहुत दूर जा पडे

है बज्मे़-सुख़न का हाल ये ए अकबर
शायर कम है मगर है उस्ताद बहुत

वर तुकारामाची आठवण येते:
घरोघरी झाले कवी, नेणे प्रसादाची चवी

हरेक से सुना नया फसाना हमने
देखा दुनिया में एक ज़माना हमने
अव्वल ये था कि वाक़फियत पे था नाज़
आखि़र ये खुला कि कुछ न जाना हमने

दुदैवाने, अकबर ओळखला जातो तो त्याच्या हास्य-कवितांमुळेच.
असो, शेवटी त्याच्याच भाषेत,

अब इलाहाबाद में सामां नही बहबूद के
यां धरा क्या है सिवा अकबर के और अमरूद के

(बहबूदः सुख-कल्याण)

अकबर का नग्मा कौ़म के हक़ में मुफीद है
दिल को तो गर्म रख़ता है वो, बेसुरा सही

अजल आई अकबर, गया वक्ते़-बहस
अब इफ कीजिए और न बट कीजिये

समीर चव्हाण

(पूर्वप्रकाशित, ऐलपैल)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजल आई अकबर, गया वक्ते़-बहस
अब इफ कीजिए और न बट कीजिये<< हा हा, मस्तच!

अनेक , बहुतेक शेर आवडले. परिचयासाठी धन्यवाद! Happy

एकही शेर चमकदार वाटला नाही.
यापेक्षा माबोवरचे शेर बरे असतात.
मी काही खास पुन्हा मिळवून वाचले नसते या गझलकाराचे शेर.

धन्यवाद, भूषण.

साती:

एकही शेर चमकदार वाटला नाही.

शक्य आहे. माझ्या आकलनाप्रमाणे, आवडीप्रमाणे अकबरचे मला आवडलेले शेर दिलेत.
हुए इस कदर हा माझ्यामते एक जबरदस्त शेर आहे.

यापेक्षा माबोवरचे शेर बरे असतात.

हेही शक्य असावे. माबोवर मीही लिहितो त्यामुळे अधिकच आनंद होत आहे.

मी काही खास पुन्हा मिळवून वाचले नसते या गझलकाराचे शेर.

आपली मर्जी. माझा अनुभव आहे की अतिशय सुमार लिहिणारा कवीही आयुष्यभर झटत राहिला तर दोन-चार कविता चांगल्या लिहून जातोच.

धन्यवाद.

हुए इस कदर मुहज़्ज़ब, कभी घर का मुंह न देखा
कटी उम्र होटलों में, मरे अस्पताल जाकर

एम एफ हुसैन मेल्यानंतर एका वर्तमानपत्रात त्याच्यावर लेख आला होता तेव्हा हुसैनची ओळख करून देण्यासाठी हा शेर त्या लेखात वापरला होता. हा शेर तेव्हाच खूप भावला होता.

आज अजून एका शायराबद्दल माहिती मिळते आहे याचा खूप आनंद आहे
अनेक शेर समजले तुम्ही नेमक्या शब्दांचे अर्थही दिलेत त्यामुळेच !
तुम्ही दिलेले जवळ जवळ सर्वच शेर उत्तम दर्जेदार वाटत आहेत
अकबर यांची शैली हटकेच आहे हे नक्की

मला सर्वात जास्त आवडला तो शेर .........

उसकी बेटी ने उठा रक्खी है दुनिया सर पर
खै़रियत गुज़री कि अंगूर के बेटा न हुआ<<< Happy मस्त मिस्किली आहे यात ( तशी इतर अनेक शेरांमधेही आहेच )

धन्यवाद समीरजी

>>
होश भी बार है तबीयत पर
क्या कहूं हाल नातवानी का
<<
वा! Happy

(या नावाचा खरच शायर होता हे माहीत नव्हतं. मला आपला 'अमर अकबर अँथनी' सिनेमातला अकबर इलाहाबादी माहीत! :P)

मला आपला 'अमर अकबर अँथनी' सिनेमातला अकबर इलाहाबादी माहीत!
>>>>>>>>>>
हायला.. म्हणजे हे ते नाही.. Uhoh

भरभर वाचले.. खोटे का बोला.. नाही फारसे आवडले..

पण हे शेर वाचून याच टाईपातला हल्लीच कुठेतरी वाचलेला एक शेर अर्ज करतो, गौर फर्माईयेगा, शायर अनामिक है तो क्या हुआ..

किसीको घर मिला हिस्से में,
किसीको दूकान आयी..
मैं सबसे छोटा था घर में,
मेरे हिस्से में माँ आयी..

-अनामिक

अंड्या तो मुनव्वर राणा चा शेर असावा (उगाच आपला एक अंदाज)

आणि हो.........

किसीको घर मिला हिस्से में, किसीको दु़काँ आयी..
मैं घर में सबसे छोटा था ,मेरे हिस्से में माँ आयी..

अस्सं पाय्जेल ...शेर दोन ओळीचा असतो Light 1 Proud

एकदा एक गृहस्थ यांना भेटण्याकरता आले आणि नोकराबरोबर आपल्या नावाचे कार्ड धाडून दिले. कार्डावर त्यांचे नाव जनाबxxx आणि त्यापुढे बी.ए. पास असे लिहिले होते. अकबरसाहेबांनी त्या कार्डाच्या मागे पुढील शेर लिहिला आणि कार्ड पाहुण्याकडे परत पाठवले.

शेखजी घरसे न निकले और इतना लिख दिया
आप बी.ए.पास हैं, तो बंदा बीबी पास हैं !!

(साहेब (स्वतः)घरातून बाहेर न पडता इतकेच कळवतात, की आपण बी.ए. पास असलात तर सेवक बीबी पास(बायकोजवळ) आहे.. Happy .