निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...:स्मित:

मस्त रंगलाएत गप्पा............

अनिल, गुलाब एकदम रसशीत! आणि त्या वेली तुम्ही कुठे लावणार? मला जरा माहिती द्या नं...म्हणजे मी असं ऐकले आहे की ही फळं वाळूत वगैरे लाव्ली जातात. किंवा नदीकिनारच्या वाळूत येतात. पण बरेच जण वेगळ्याप्रकारे सुद्धा ही फळं काढतात. म्हणून मला उत्सुकता आहे. आणि मलापण पायजे हळद..माझ्यासाठी एखादा कंद ठेवाल?

स्निग्धा, मोठ्या कुंडीत हळदीच्या १-२ बीयाच लावु शकाल,कारण खत मिळाल तर रोप २-४ फुट सहज वाढेल. >>>> अरे वा, पण कंद तुम्ही मला देणार कसे?

सुप्रभात !

शांकली,
खुप वेली मधल्या फक्त २-३ ठेवल्या आहेत्,कुंडीत तेवढ्याच चांगल्या वाढतील म्हणून ..त्यांना १-२ कलिंगड नक्की लागतील
फळांसाठी वाळुची जमीन पाहिजे अस काही नाही, माती नुसार थोडाफार दर्जात फरक पडु शकतो,
आमच्याकडे द्राक्षे,पेरु,आंबे,चिकु,सिताफळ आणि कलींगड तर काळ्या जमिनीत, लाल, खडकाळ, मुरुमाड जमिनीतही चांगले पिकतात, त्यातही नदी काठच्या लाल मातीत तर केळी, कलिंगडाच भरघोस उत्पन आलेलं मी पाहिलयं आवळ्याची,पेरुची,रामफळाची भरलेली झाडे मात्र नदीकाठच्या लाल मातीत जास्त चांगली आलेली पाहिली

पुण्याजवळ भोरजवळच्या एका शेतकर्‍यानं स्ट्रॉबेरीची रोपे परदेशातुन आणली (महाबळेश्वरला सहज मिळाली नाहीत म्हणुन) आणि प्रथमच महाबळेश्वर सोडुन राज्यात भरघोस उत्पन्न (एकरी ७ लाख) घेऊन दाखवलं,त्यांनी आता आपल्या बांधावर काश्मिरी सफरचंदाची झाडे लावली आहेत त्याला ही फळे लागत आहेत हे विशेष.

पुण्याजवळ भोरजवळच्या एका शेतकर्‍यानं स्ट्रॉबेरीची रोपे परदेशातुन आणली (महाबळेश्वरला सहज मिळाली नाहीत म्हणुन) आणि प्रथमच महाबळेश्वर सोडुन राज्यात भरघोस उत्पन्न (एकरी ७ लाख) घेऊन दाखवलं,त्यांनी आता आपल्या बांधावर काश्मिरी सफरचंदाची झाडे लावली आहेत त्याला ही फळे लागत आहेत हे विशेष.<<>>

अनिल हे फार्म नक्की कुठे आहे आणि त्यांचं नाव सांगाल का?

अनिल हे अगदी खरेय. इथे तर वाळवंट म्हणावे अशी रेती आहे पण सर्व झाडे मजेत वाढताहेत. अगदी सफरचंदे देखील होतात. ( त्यांची चव वेगळी असते. )
पुण्यात डॉ नारळीकरांनी, थेट न्यूटनचे सफरचंदाचे झाड वाढवले आहे आणि त्यालाही फळे लागतात, अशी बातमी पेपरमधे वाचली होती.
आणि इस्त्रायल मधल्या मातीविना शेतीबद्दल आपण वाचतच असतो. तिथली संत्री मी इथे रोज खातो.

अनिल, मस्त फोटो. मोर बघून तर कधी तुमच्या घरी गटग करतोय असं झाल. Happy

आणि सगळ्यांचे नाही जमले तर मी एकटा येईनच.>>>>>>>>>>>>>>मी पण येणार. ए येणार्‍यांनी हात वर करा . Proud
दिनेशदा, तुम्ही कधी येताय इकडे परत? म्हणजे गटग ठरवता येईल.

किती छान माहिती दिलीत अनिल.......प्रयोगशील शेती करणार्‍या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!!

माधव, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा... Happy

अनिल, स्ट्रॉबेरीबद्दल आणि सफरचंदाविषयी वाचुन खुप आशा वाटली. मलाही कधीतरी हे करता येईल.

आणि हळदीच्या बीया पहिल्यांदाच ऐकल्या. अर्थात फुले येतात म्हणजे बीयाही असणारच. पण लागवडीला बीया वापरतात हे कधी ऐकले नव्हते. मी तसेही हळदीच्या लागवडीबद्दलही कुठे ऐकले होते??? Happy कांद्याची लागवडही बीया पेरुनच करतात मग हळदीची का नाही?

मेधा, मीही कुंडीत ओली हळद पेरलेली २ महिन्यापुर्वी आणि त्याला आता ४ मस्त सुगंधी पाने आलीत. आपल्यासाठी हळद पेरुन उगवणे स्वस्त पडत असेल पण कमर्शिअल उत्पादन घेणा-यांना हळद पेरुन त्याचे पिक काढणे महाग पडत असेल, परत लेबरही आलेच त्यात. त्यापेक्षा बीया पेरुन हळद लागवड स्वस्त पडत असेल.

७-८ वर्षांपुर्वी मी कुंडीत अशीच ओली हळद लावलेली. कुंडीत हळूहळु हळदीचे बन माजले. मी शेवटी कंटाळुन रोप उपटायला गेले तर मुळाशी जवळजवळ अर्धा पाऊण किलो ओली हळद मिळालेली.. अलभ्य लाभ Happy

माझ्याकडे सध्या एक ६ इंच उंच अननसही आलेय. पण माझ्या घरी गुगल क्रोम लोड झाले आनि त्यामुळे मला पिकासावरुन फोटोच टाकता येत नाहीयेत आता. अननसावर एक मस्त लेख मनातल्य मनात लिहिलेला, त्याचे खरेखुरे फोटोही, अगदी प्रत्येक फुलाचे फोटो, काढलेले. ते कार्ड करप्ट झालं आणि पिकासाही बंद पडलं... Sad त्यामुळे आता फोटो अपलोडच करता येत नाहीत.

गेल्या रविवारी मी एक आगळीक केली. ( मला माहीत आहे, शशांकला आवडणार नाही, तरी पण ज्या अर्थी मी इथे आहे, त्या अर्थी लिहायला हरकत नाही. )

मी आधी ज्या घरी रहात होतो तिथे झाडाखालचा बाजार होता. स्थानिक लोक ज्या भाज्या खातात त्या मला सहज उपलब्ध होत्या. हिरव्या देठाची अंबाडीची भाजी पण सहज मिळायची.
किलांबातल्या नवीन घराजवळ मात्र असा बाजार नाही. आहे ते भले मोठे सुपरमार्केट. तिथे जास्त करुन आयात केलेल्या भाज्याच मिळतात.

तर गेल्या रविवारी मी नेहमीप्रमाणे जंगलात फेरफटका मारायला गेलो. जंगल म्हणजे घनदाट जंगल नव्हे. तर गवताळ प्रदेश आणि त्यात उभी असणारी काजू, आंबे आणि अशीच झाडे. जायला मस्त डांबरी रस्ता आणि आजूबाजूला असे जंगल. ( पुढच्या रविवारी फोटो काढीन ) तर मला झाडे झुडपे न्याहाळत जायची सवय आणि मला रस्त्यापासून साधारण १०/१२ फुटावर अंबाडीसारखे झुडूप दिसले.
इथे बाजारात मिळायची ती हिरव्या देठाची पण ही होती लाल देठाची. ( मुंबईत मिळते तशी. ) जवळ जाऊन
बघितल्याशिवाय मला चैन कशी पडणार ? दाट गवतातून मार्ग काढत तिथे गेलो.
अगदी जंगलातच बाढलेली असल्याने रंगरुपात थोडा फरक होता. खात्री करण्यासाठी फुले वा फळे नव्हती.
तरी मी काही पाने ( म्हणजे बरीच ) तोडून खिशात भरून घेतलीच.
घरी आल्यावर डोळ्यांनी, ( चष्मा नव्हता Happy ) बोटानी, नाकानी खात्री करुन घेतली. धीर करुन बारीकसा तूकडा
खाऊन बघितला. तर अंबाडीच की !
अगदी खास वेगळी भाजी करण्या एवढी पण पाने नव्हती. मग मसुराच्या आमटीच्या फोडणीत वापरली.
पुढच्या रविवारी डल्ला मारणार आहे.

खास सुचना : हा वेडेपणाच होता. अनोळखी झाडांची पाने / फळे खाऊ नयेत. काही झाडे केवळ स्पर्शानेदेखील
विषबाधा करु शकतात. श्रीकांत इंगळहाळीकरांनीदेखील रानतंबाखू बाबत अनुभव लिहिला आहे.

सारिका,
शेतकर्‍याच नाव नक्की आठवत नाही पण गेल्या महिन्यात टीव्ही वर मुलाखात पाहिली होती,नाव शोधुन सां गु शकेन.

अनिल, स्ट्रॉबेरीबद्दल आणि सफरचंदाविषयी वाचुन खुप आशा वाटली. मलाही कधीतरी हे करता येईल.
साधना,
पुरेशी जागा नसेल तर स्ट्रॉबेरी कुंडीत देखील लावता येईल
लहान ओले हळकुंड लावले तरी देखील चालते पण या बीया पासुन मिळेल तेवढे उत्पादन मिळणार नाही.तुम्ही म्हंटल्याप्रमाणे फक्त या बियांचा खर्चच एकरी ४०-५० हजारापर्यंत आहे.बाकी इतर खर्च वेगळा.

अनिल, मस्त फोटो. मोर बघून तर कधी तुमच्या घरी गटग करतोय असं झाल.
शोभा१२३,
लवकरच हा योग येईल अशी आशा आहे. Happy

<< ते कार्ड करप्ट झालं आणि पिकासाही बंद पडलं... >> हार्डडिस्क सारखा कार्डचा डेटा रिक्व्हर नाही होत का?

गेल्या रविवारी मी एक आगळीक केली. ( मला माहीत आहे, शशांकला आवडणार नाही, तरी पण ज्या अर्थी मी इथे आहे, त्या अर्थी लिहायला हरकत नाही. ) >>>>>>

खास सुचना : हा वेडेपणाच होता. अनोळखी झाडांची पाने / फळे खाऊ नयेत. काही झाडे केवळ स्पर्शानेदेखील
विषबाधा करु शकतात. श्रीकांत इंगळहाळीकरांनीदेखील रानतंबाखू बाबत अनुभव लिहिला आहे. >>>>>

मागे एकदा मी व शांकली असेच झाडे, पाने, फुले पहायला पुण्याच्या आसपास भटकत होतो - एका झुडुपाच्या फांदीवर अनेक फुले आलेली मी पाहिली - ओळखता येईना म्हणून तोडून घेतली बरोबर - दुसर्‍या दिवशी शांकली गेली साने मॅडमकडे (डॉ. हेमा साने) विचारायला - तर ती फुले चक्क "रानतंबाखूचीच" होती म्हणून कळले - नशीब मी जेव्हा ती फुले तोडली तेव्हा त्याच हाताने डोळे पुसले नव्हते किंवा अंगावर कुठेही तो हात लावला नव्हता ...
नाहीतर मलाही श्रीकांत इंगळहाळीकरां सारखाच झटका बसला असता ... सुदैवाने वाचलो झालं....

दिनेशदा जपून रहा हां .... पाना-फुला-फळांपासून Wink Happy

शशांक, नेमक्या त्या क्षणी सगळा शहाणपणा कुठे गायब होतो तेच कळत नाही Happy

रावी, हाताची आणि डोळ्याची आग आग होते. रानतंबाखूचे झाड मोठे असते. पाने मोठी असतात पण काही पानात मधेच एक खिडकी असते. तूराही आकर्षक असतो आणि लांबूनही सहज दिसतो. मला वाटते, शांकलीने मागे फोटो टाकला होता.

विषारी वनस्पतिंचा विषय निघाला कि मला हटकून दूर्गा भागवतांची आठवण होते.
पण त्या आजारपणातच तर त्यांनी विपुल लेखन केले. ( ऐसपैस गप्पा मधे, या आजारपणामूळेच आपण अविवाहीत राहिलो, असे पण त्या म्हणाल्या आहेत ना ? )

रानतंबाखू हाताला किंवा डोळ्याला लागली तर काय होतं? >>>> डोळ्यांची प्रचंड आग होते व तात्पुरते (कायमचे नव्हे) अंधत्व येऊ शकते ... श्री. श्रीकांत इंगळहळीकरांचा अनुभव

Pages