आवर्तन

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आवर्तन उठते पुन्हा एक परिचितसे
मी तिथेच येते फिरून घेऊन वळसे

इच्छांच्या डोही तरंग अस्फुट उठले
मी मिठीत आसक्तीच्या डोळे मिटले

एका चक्रातून दुजात जाण्यासाठी
धावते सतत वेड्या स्वप्नांच्या पाठी

कर्दमात गेला पाय रूते खोलात
तरी या वाटेची ओढ कशी अज्ञात!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

लाजो, शशांक, नी, चिन्नु... धन्यवाद!

पियु परी, कॅटेगरी टाकली आहे. पण बहुधा रंगीबेरंगी पानांसाठी ती दिसत नसावी.