चैत्रांगण

Submitted by pr@dnya on 8 May, 2013 - 08:02

chaitrangan.jpg

चैत्रांगण, गुढीपाड्व्यापासून ते अक्षयतृतीयेपर्यंत काढली जाणारी रांगोळी. यामध्ये चैत्रागौरी,गणपती, पिंड, देवतांची शस्रे, शुभचिन्हे, गाय वासरू, हत्ती अंबारी अशी बरीच चिन्हे काढली जातात. यात काय राहीले असेल तर तुम्ही सुचवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सुंदर काढलंय चैत्रांगण. माझ्या आजीची आठवण झाली. ती सुद्धा असंच काढायची, गौरीच्या तिजे पासून अक्षय्य तृतियेपर्यंत. पण तिची ही कला माझ्यात नाही आली...:अरेरे: पण तुम्ही मात्र मला तिची आठवण करून दिलीत तुमच्या रांगोळीतून............. धन्यवाद. एकदम नॉस्टॅल्जिक केलंत.

छान! मागे पण एकदा कुणी तरी इथे या विषयी लिहिलं होतं. आणि बर्‍याच रांगोळ्या (अर्थातच चैत्रांगणातल्याच) अ‍ॅड झाल्या होत्या.

मस्तच!

मागे पण एकदा कुणी तरी इथे या विषयी लिहिलं होतं. आणि बर्‍याच रांगोळ्या (अर्थातच चैत्रांगणातल्याच) अ‍ॅड झाल्या होत्या. >>> मानुषी + १. मी ही हेच लिहिणार होते.

सापडली. रमडची आहे : http://www.maayboli.com/node/24808

मस्तच!! माझ्या आजीची आठवण झाली. तिला चैत्रांगण काढायला मी पण मदत करायची. ती त्यामध्ये गौरीचे सगळे दागिने पण काढायची.. पाण्यासाठी ताम्ब्या भान्डे, कपड्याचे गाठवडे पण असायचे. कैरीचे/आम्ब्याचे दिवस असातात म्हणुन ते ही असायचे.

सगळ्यांना धन्यवाद. खरतर काय काय काढायचं याबद्द्ल मी कन्फ्यूजच होते, अजून बरच काही काढायच राहून गेलं असेल.
@ रिया नक्की टाक फोटो
@ मामी ते चैत्रांगण छानच आहे.