शा गं गटग - पुण्यनगरी

Submitted by _हर्षा_ on 8 May, 2013 - 04:38

इतके दिवस गटग प्रकरण रोजच गाजत होतं, वाट पाहता पाहता महाचर्चेचा शेवट होऊन सन्माननीय अतिथी शा गं यांच्या उपस्थितीत नेहमीच्याच ठिकाणी 'पुणे गटग' संपन्न झाले. संयोजकांना उपस्थितीबद्दल वाटणारी शंका धुळीस मिळवत माबोकरांनी आपले माबो / गगोप्रेम सिद्ध केले. Happy

पुणेकर वेळ पाळण्यास असमर्थ आहेत अशी जोरदार टीका करत मुंबईकर आणि पेणकरांनी गटग ला वर्णी लावली. १०.३० ची वेळ देवुनही पुणेकरांमुळे गटग चे १२ वाजले हे मत पुणेरी स्वाभिमान दुखावलेल्या
संयोजकांनी गटग ची खरी वेळ १२ च असल्याचे सांगुन त्यांना गप्प केले. (उलटपक्षी तुम्हा परगावाहुन येणार्‍या माबोकरांसाठीच गटग उशीरा सुरु करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आलेले आहे.)

३/४ सभासद वगळता सन्माननीय अतिथी शा गं यांच्याशी बोलण्याचा लाभ इतर माबोकर घेऊ शकले नाहीत (त्याबद्द्लही नंतर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.) परंतू त्यांनी आणलेल्या चॉकलेट वाटपाने गटगची गोड सुरवात करण्यात आली.

पेणकरांनी ही आपल्या वादि च्या शुभेच्छांना जागुन फसवी Wink चॉकलेट्स माबोकरांना वाटली. (फसवि या शब्दाबद्दल कुतुहल / शंका उपस्थित झाल्यास पुर्ण मानसिक तयारीनिशी पेणकरांना संपर्क करणेत यावा.)
गोड सुरवात झाल्या बरोबर काही हौशी माबोकर प्रकाशचित्रणास सज्ज झाले. प्रकाशचित्रणात पहिला मान
अर्थातच बाळ शा गं, खालोखाल अप्सरेसह
गंधर्वांना मिळाला.
अप्सरा आलीईईई...........
Sha g with Apsara.JPG

प्रितीभोजनाचा योग Wink
Sha g & Apsara.JPG

जुनियर शा गं
Bal sha g.JPG

बाकी अवर्णनीय फोटो काढण्यात माबोकर हुशार आहेतच. Wink
जळाऊ प्रचि बघा लोक्स Happy

Chocolates.JPGKed with Choc.JPG

पुणेकरांना आळशी म्हणणारे मुंबईकर फारच उत्साही दिसत होते आणि त्यांनीच सगळ्यांत जास्त संवाद साधला बरं का Wink
Mau.JPG

जरा उशीरानेच आलेल्या माबोकरांची मात्र उपस्थितांनी चांगलीच फिरकी घेतली त्यासाठी सर्व सभासदांनी नसलेल्या आयडींची नावे धारण केली Happy
Half Group.JPG

पुणेकरांनी सुद्धा आपल्या वा दि च्या शुभेच्छांचा स्विकार करत 'होममेड' केक आणुन आपल्या गृहस्वामिनीच्या कलेची चुणुक दाखवली. Wink
Choco with cake.JPG

खास पेणहुन मागवण्यात आलेले पोह्याचे पापड, कडवे वाल मागणीनुसार तसेच इतरही माबोकरांपर्यंत
पोहोचले. त्यावेळी सिल्क आणि कॉटनचे वर्गीकरण आम्हांला कुणालाच ठाऊक नव्हते हां!! Wink (वरील देवाणघेवाण प्रकरण गटग मिसलेल्यांनी वाचु नये.)

नुसतीच देवाण्घेवाण चॉकलेट्स यावर थोडीच भागणार आहे. जठराग्नी खवळल्यावर हे हवेच!

Masala Papad.JPGSoup.JPGRoti bhaji.JPGJevan.JPG

वरील सर्व जेवणाबद्दल स्पॉन्सरर सुशांतदा चे सर्व उपस्थितांकडुन आभार!!!

बाकी शा गं आणि अप्सरा यांच्यासह गटग प्रितीभोजन पार पडल्यावर सर्वांचेच डोळे जडावु लागल्याने सर्वांनी आपला मोर्चा ग्रुप फोटोकडे वळविला. अजुनही माबोकरभेटीचा ओघ पुर्णपणे ओसरला नसल्याने
एका छोट्या विद्यार्थीमैत्रिणीने गटगला वर्णी लावली आणि पुन्हा एकदा सर्वांनी आपापली नावे बदलवुन तिला गोंधळात टाकले. ती बाळगगोकर मैत्रिण शा गं आणि पेणकरांनी आणलेल्या चॉकलेटस साठीच आली असेल काय? हा प्रश्न मात्र इतर सर्वांच्या मनात रूंजी घालत राहिला असावा. Wink तिचे चॉकलेटप्रेम पाहुन इतक्यावेळ सर्वांकडे विनातक्रार जाणारा बाळ शा गं तिच्या जवळपासही फिरकायला तयार होईना! (थोड्याफार [चॉकलेट] त्यागाने हे शक्य झाले असते हे वेगळे सांगणे न लगे!)

असो, एकुणच गटग यथोचित पार पडले, गोड सुरवातीबरोबरच प्रितीभोजन झाले आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी प्रचिदेखील काढली व त्यानंतर मात्र दस्तुरखुद्द संयोजकांनीच केलेल्या पलायनावर भाष्य न करता जडावल्या डोळ्यांनी आणि मनानेसुद्धा सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

गटग भेटीत रंगलेले माबोकर (इथेही मुंबैकर झोपेतच Wink )
Sagale.JPGKatil.JPG

कातिल पोझ
Sr.& Jr. Sha ga.JPG

त. टी. : पहिलाच प्रयत्न असल्याने आपलेपणाने चु भु दे घे. सर्वांनी दिवे घ्या हो!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लय भारी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

वाह वाह! छान लिहीलं आहे!!
मालकांच्या अनुपस्थितीतही गगो धो धो चालतंय आणि गटग दणक्यात पार पडत आहेत ही अत्यानंदाची गोष्ट आहे - असा निरोप मालकांनी दिला आहे.

लई भारी! खुसखुशीत लिहिलाय वृत्तांत!
पण थोडक्यात का आटोपतं घेतलस??

बादवे, आम्ही लोक मनाने इन्व्हॉल्व होतो या गटगमधे. आमचीपण नावं लिव्हा! Proud

बादवे, आम्ही लोक मनाने इन्व्हॉल्व होतो या गटगमधे. आमचीपण नावं लिव्हा! >>> हो, खरचं. क्रेडीटस - या सदराखाली तरी नांवे लिही Wink

काही हौशी माबोकर प्रकाशचित्रणास सज्ज झाले. >>>> या वाक्यातील हौशी शब्दाला तिव्र ऑब्जेक्शन Proud

छान लिहीलेल आहेस.... शा ग सोडुन सगळ्यांची नाव काढुन का टाकलीस.
असा निरोप मालकांनी दिला आहे..... मालक भलतेच घाबरट आहेत. Proud

आर्याताई +१
छान लिहल आहे...
तो अर्धा मसाला पापड न आलेल्यांसाठी ठेवला होता काय ?????? Wink Proud

तो अर्धा मसाला पापड न आलेल्यांसाठी ठेवला होता काय ??????
नाही नाही आमच्या टेबलावरचे संपले होती म्हनुन शेजारच्यांकडुन २ मि फोटोसाठी उधार आणला होता.... काय रे ग्री परत दिलेला ना???????

नाही नाही आमच्या टेबलावरचे संपले होती म्हनुन शेजारच्यांकडुन २ मि फोटोसाठी उधार आणला होता.... काय रे ग्री परत दिलेला ना???????
>......
असं नाय काय तो त्यांच्यासाठीच ठेवलेला उगाचच आपल्या पोटात दुखू नये म्हणून Proud

मी गगोमध्ये मोडत नाही याची बोचरी जाणीव करून दिल्याबद्दल मंडळ निषेध व्यक्त करत आहे.

एक्काला माझी उपस्थिती हवीशी वाटली नाही? काय ते दिवस जेव्हा ख्रिस गेलच्या थाटात मी एकहाती गगोला उधाण आणायचो. Light 1

धमाल केलेली दिसतीय. एका शुद्ध ब्राह्मणाचे शाप लागलेली ही चॉकलेटे लगेच संपतील व भोकाड पसरायची वेळ येईल. मला वाचाप्राप्ती आहे हे ध्यानात राहो.

मंदार जोशी नावाची एकही व्यक्ती अस्तित्वात नाही व आमच्या घराजवळ जो राहतो तो त्या नावाचा एक भामटा तोतया आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. Light 1

-'बेफिकीर'!

मी फोनवरुन उपस्थिती लावली होती.
फोटु छान. Happy
चॉकलेट्स कुणी संपवलीत ह्याचा अंदाज आहेच. Proud

गंधर्व आदल्या रात्रीच त्याच्या हिमालयीन ट्रेक मधुन मुंबैत परतलेला.
लगेच दुसर्‍या दिवशी गटगला पुण्यात हजर. कौतुकास्पद आहे. Happy

(सुशा, फुलटॉस आहे. मार सिक्सर..)

शागं जूनियर खूपच गोड बाळ आहे

<<<

ज्युनियर काय, सिनियर बाळही गोडच दिसतंय की? उगाच एखाद्यालाच नावाजू नये, सर्वांना बरे वाटेल असे बोलावे. '

कोणते चित्र कोणाचे आहे ह्यासाठी वेगळा धागा येणार आहे काय? Light 1

शा गं, आणि ज्युनियर शा गं ह्यांच्या व्यतिरीक्त इतरांची ओळख गुलदस्त्यात का ठेवलीये? किश्या ओळखतोय म्हणा(आता लग्न झालेले असूनसुद्धा Lol )

Pages