शा गं गटग - पुण्यनगरी

Submitted by _हर्षा_ on 8 May, 2013 - 04:38

इतके दिवस गटग प्रकरण रोजच गाजत होतं, वाट पाहता पाहता महाचर्चेचा शेवट होऊन सन्माननीय अतिथी शा गं यांच्या उपस्थितीत नेहमीच्याच ठिकाणी 'पुणे गटग' संपन्न झाले. संयोजकांना उपस्थितीबद्दल वाटणारी शंका धुळीस मिळवत माबोकरांनी आपले माबो / गगोप्रेम सिद्ध केले. Happy

पुणेकर वेळ पाळण्यास असमर्थ आहेत अशी जोरदार टीका करत मुंबईकर आणि पेणकरांनी गटग ला वर्णी लावली. १०.३० ची वेळ देवुनही पुणेकरांमुळे गटग चे १२ वाजले हे मत पुणेरी स्वाभिमान दुखावलेल्या
संयोजकांनी गटग ची खरी वेळ १२ च असल्याचे सांगुन त्यांना गप्प केले. (उलटपक्षी तुम्हा परगावाहुन येणार्‍या माबोकरांसाठीच गटग उशीरा सुरु करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आलेले आहे.)

३/४ सभासद वगळता सन्माननीय अतिथी शा गं यांच्याशी बोलण्याचा लाभ इतर माबोकर घेऊ शकले नाहीत (त्याबद्द्लही नंतर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.) परंतू त्यांनी आणलेल्या चॉकलेट वाटपाने गटगची गोड सुरवात करण्यात आली.

पेणकरांनी ही आपल्या वादि च्या शुभेच्छांना जागुन फसवी Wink चॉकलेट्स माबोकरांना वाटली. (फसवि या शब्दाबद्दल कुतुहल / शंका उपस्थित झाल्यास पुर्ण मानसिक तयारीनिशी पेणकरांना संपर्क करणेत यावा.)
गोड सुरवात झाल्या बरोबर काही हौशी माबोकर प्रकाशचित्रणास सज्ज झाले. प्रकाशचित्रणात पहिला मान
अर्थातच बाळ शा गं, खालोखाल अप्सरेसह
गंधर्वांना मिळाला.
अप्सरा आलीईईई...........
Sha g with Apsara.JPG

प्रितीभोजनाचा योग Wink
Sha g & Apsara.JPG

जुनियर शा गं
Bal sha g.JPG

बाकी अवर्णनीय फोटो काढण्यात माबोकर हुशार आहेतच. Wink
जळाऊ प्रचि बघा लोक्स Happy

Chocolates.JPGKed with Choc.JPG

पुणेकरांना आळशी म्हणणारे मुंबईकर फारच उत्साही दिसत होते आणि त्यांनीच सगळ्यांत जास्त संवाद साधला बरं का Wink
Mau.JPG

जरा उशीरानेच आलेल्या माबोकरांची मात्र उपस्थितांनी चांगलीच फिरकी घेतली त्यासाठी सर्व सभासदांनी नसलेल्या आयडींची नावे धारण केली Happy
Half Group.JPG

पुणेकरांनी सुद्धा आपल्या वा दि च्या शुभेच्छांचा स्विकार करत 'होममेड' केक आणुन आपल्या गृहस्वामिनीच्या कलेची चुणुक दाखवली. Wink
Choco with cake.JPG

खास पेणहुन मागवण्यात आलेले पोह्याचे पापड, कडवे वाल मागणीनुसार तसेच इतरही माबोकरांपर्यंत
पोहोचले. त्यावेळी सिल्क आणि कॉटनचे वर्गीकरण आम्हांला कुणालाच ठाऊक नव्हते हां!! Wink (वरील देवाणघेवाण प्रकरण गटग मिसलेल्यांनी वाचु नये.)

नुसतीच देवाण्घेवाण चॉकलेट्स यावर थोडीच भागणार आहे. जठराग्नी खवळल्यावर हे हवेच!

Masala Papad.JPGSoup.JPGRoti bhaji.JPGJevan.JPG

वरील सर्व जेवणाबद्दल स्पॉन्सरर सुशांतदा चे सर्व उपस्थितांकडुन आभार!!!

बाकी शा गं आणि अप्सरा यांच्यासह गटग प्रितीभोजन पार पडल्यावर सर्वांचेच डोळे जडावु लागल्याने सर्वांनी आपला मोर्चा ग्रुप फोटोकडे वळविला. अजुनही माबोकरभेटीचा ओघ पुर्णपणे ओसरला नसल्याने
एका छोट्या विद्यार्थीमैत्रिणीने गटगला वर्णी लावली आणि पुन्हा एकदा सर्वांनी आपापली नावे बदलवुन तिला गोंधळात टाकले. ती बाळगगोकर मैत्रिण शा गं आणि पेणकरांनी आणलेल्या चॉकलेटस साठीच आली असेल काय? हा प्रश्न मात्र इतर सर्वांच्या मनात रूंजी घालत राहिला असावा. Wink तिचे चॉकलेटप्रेम पाहुन इतक्यावेळ सर्वांकडे विनातक्रार जाणारा बाळ शा गं तिच्या जवळपासही फिरकायला तयार होईना! (थोड्याफार [चॉकलेट] त्यागाने हे शक्य झाले असते हे वेगळे सांगणे न लगे!)

असो, एकुणच गटग यथोचित पार पडले, गोड सुरवातीबरोबरच प्रितीभोजन झाले आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी प्रचिदेखील काढली व त्यानंतर मात्र दस्तुरखुद्द संयोजकांनीच केलेल्या पलायनावर भाष्य न करता जडावल्या डोळ्यांनी आणि मनानेसुद्धा सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

गटग भेटीत रंगलेले माबोकर (इथेही मुंबैकर झोपेतच Wink )
Sagale.JPGKatil.JPG

कातिल पोझ
Sr.& Jr. Sha ga.JPG

त. टी. : पहिलाच प्रयत्न असल्याने आपलेपणाने चु भु दे घे. सर्वांनी दिवे घ्या हो!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया तु ही छानच लिहिलस.
फायनली तुला कोणी चॉ ठेवले होते की नाही??? Wink

रिया खुप मनाला भावणार असं लिहीतेस तु परत गटगच्या आठवणी समोर घडताय या प्रमाणे दिसत होत्या, मस्तच
animated-gifs-flowers-180.gifChocolate-Festival-longbeach.jpg

झकोबा Wink
शागंनी एक बॉक्स भरुन चॉकलेट्स ठेवले होते माझ्यासाठी... केदारदादाने सिल्क ठेवलेली...
आणि एक लिहायचंच राहिलं! तो बॉक्स बाहेर येताच हे सगळे म्हणे आम्ही खाल्ले नाहीयेत चॉकलेट्स! मग जड अंतःकरणाने मी सगळ्यांसोबत चॉकलेट्स वाटून खाल्ली!
पण वरती फोटोत बघा! यांचा एक राऊंड आधीच झालेला.... दुष्ट कुणीकडले

सगळ्यांना धन्स!
केदारदादा Blush
धन्स रे Happy

आदिती आपल्याला मिळण्यासाठी नाही काही. जर तिच्या चॉक्लेट पापड्या घालुन झाल्या असतील तर चॉक्लेट कुरडयांची तयारी करायला घे अस सांगायच मला.....

गिरी अरे खरच तिन उन्हाळी काम चालु केलय
चॉक्लेट पापड्या / कुरडया
मिल्क चॉक्लेटच्या शेवया
डार्क चॉक्लेटचे सांडगे
सिल्क चॉक्लेट मिरच्या.......

आदिती रीया १०-१५ मि. आली शेवटची आणि छोट्या शा ग पेक्षा जास्त दंगा करुन चॉक्लेट घेऊन गेली.... बिच्चारा छोटा शाग नंतर गाडीत किती रडला .....

आदिती रीया १०-१५ मि. आली शेवटची आणि छोट्या शा ग पेक्षा जास्त दंगा करुन चॉक्लेट घेऊन गेली.... बिच्चारा छोटा शाग नंतर गाडीत किती रडला .....>>> हो ना, नंतर शा गं चा फोन आलेला संयोजकांना परत त्याची समजुन काढायला एक गटग कराव लागेल Wink तेंव्हा रिया चॉकलेट्स वाटेल असही जाहीर केलय संयोजकांनी....

माझं तर यायचं नक्कीच नव्हत.
सर्व पुणेकरांना आदल्या दिवशी फोन करुन सतवत होते
पण आयता वेळी रुशु आली म्हणुन येउ शकली पहिल्यांदाच सगळ्यानां भेटनार होती म्हणुन खुप भिती वाटत होती आणि त्याबरोबर सर्वांना भेट्ण्याची मनात प्रबळ इच्छा Happy

सकाळी ७ वाजता ची ट्रेन पकडली, पुण्याला माझं पहिल्यांदाच येण होत म्हणून जीवाची घालमेल चालु होती
सकाळी समजलं की कल्याणी येणार नाहीये ते Sad ( तिने प्रोमिस केलयं मेला की ति मुंबईला आली की नक्की भेटणार आहे)
पुण्यात आली ११:१५ ला मला वाटल गटग आटपत आले असणार, पण (पुणेकर ते पुणेकरच) असं मनात म्ह्ट्ल
वैभव दादाला कॉल केला (आता त्याच आणि माझं बोलण झाल असेल ते समजलच असेल ज्यांना समजल नसेल त्यांनी दिवे घ्या)

आदिती किती क्युट आहे ती मला न्यायला आलेली (उशीरा) Proud

फायनली आम्ही पोहचलो Happy
केदार दादा बाहेरच भेटला. मी बरोबर ओळखलं त्याला
शांग दादाने त्याच्या अप्सरेशी माझी ओळ्ख महाडीक काकु करुन दिली Angry (असं वाटल आता गगोवर असता तर Angry ही स्मायली टाकली असती Proud )
आणि वहिणी तर अप्सराच आहे मला वाटत म्हणुनच त्याने शापित गंधर्व हा आयडी घेतला असावा
शांग दादा चा मुलगा क्युट आहे आणि खुप शांत आहे. केदार दादा ला त्याच्या मुलीची गैरहजेरीची कमी भासत नसणारच पण मला तिला भेटायच होत
मी तर सर्वांना बरोबर ओळखल फक्त सुशांत दादा, विशाल दादा आणि आशु दादा ओळखल नव्हत.
त्यातच लगेच किश्या ने सांगितल हिच्या थोपु मध्ये जेवढे त्यानांच बरोबर ओळ्खते Proud
केदार दादा माझा फेवरेट दादा आहे त्याने मला सिल्क आणि डेरीमिल्क दिली. (गपचुप) Proud
अतुल दादाने पण त्याच्याकडेची डेरीमिल्क मला दिली Happy
शांग दादा ने पण चोकलेट्स आणलेली पण मी ठाण्या ला जाउन आणखीन घेणार आहे असं बोलले
पण चाप्टर आहे तो त्याचा नंबरच नव्हता माझ्याकडे Sad
आणि आता गेला आफ्रिकेत Sad ( शांग दादा मी नाराज आहे तुझ्यावर)
ओवी ने मला बरोबर ओळखल Happy
मनीमाउ शी माझी नवीन ओळख झाल्याने जास्त बोलता आले नाही
सचिनने आणलेला केक मला आणखीन हवा होता पण उरलेला केक तो परत घेउन गेला Proud
रियाशी पण खुप बोलायच होत पण टाईमच नव्हता. रिया नेस्ट टाईम पक्का वेळ काढून येईन Happy

अंकु, आर्या तै, शोभा तै, दक्षिणा तै यांना भेटायच होत

किश्या ची स्वाती खुप मस्त आहे तिच्याशी पण बोलायच राहिल

बाकी मी खुप शांत आहे असं सर्व बोलत..... तर सांगते असं खरच नाहीये मी खुप बड्बडी आहे
नेस्ट टाईम पक्का दंगा Happy

च्यायला, ह्या गटगचे नामकरण चॉकलेट गटग करायला हवे आता.>>> +१११ अगदी अगदी Happy
मउ, सचिन ने केक परत नाही नेला त्याने तो रियासाठी ठेवला होता गुपचुप Wink

शांग दादा चा मुलगा क्युट आहे आणि खुप शांत आहे
>>>
हरे राम! Proud
सुशांतदादा सांग हिला तो किती शांत आहे ते Proud

चॉकलेटची उन्हाळी काम??? Uhoh
यक कसलं लागेल ते !

हरे राम!
सुशांतदादा सांग हिला तो किती शांत आहे ते

>>>>>

रीया, खरेच (तु भेटेस्तोवर) तो खुप शांत बसला होता. शा. गं. व अप्सरेला त्याने जेवताना त्रास दिला नाही, कोणाकडेही बीनदिक्कत खुप वर्षांची ओळख असल्याप्रमाणे जात होता. पण तु आल्यावर त्याचे काय बीनसले कोण जाणे? खोटे वाटत असेल तर ओवीला विचार हवे तर.

अतुलदादा Proud

माझा फ्रिज म्हणे लहान मुलांच्यात होतो बर्‍याचदा अ‍ॅटीट्युड प्रॉब्लेम एकमेकांमध्ये म्हणून नसेल बोलला तो Lol

मजा आली सगळ्यांना भेटून ....
पण सगळ्या गोंधळात धीरजबरोबर त्याच्या ट्रेकबद्दल फ़ारसं बोलणं नाही होवू शकलं Sad

आदीती पहीलाच प्रयत्न छाने. Happy

प्रतिसादातले चँपियन आशु, रिया आणि मउ यांचे मिनी वृत्तांत पण मस्ताहेत.

पुढील गटगसाठी शुभेच्छा. Happy

Pages