मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 25 March, 2008 - 17:41

मायबोलीवर लेखन करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांशी संबंधीत अनेक ग्रूप आहेत. या ग्रूपमध्ये, तुमचे लेखन तुम्ही स्वत:च प्रकाशीत करू शकता. मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

१. मायबोलीवरच्या ग्रूपमधून योग्य तो ग्रूप निवडा.
२. तुम्ही त्या ग्रूपचे सभासद नसाल तर सभासद व्हा. सभासद झाल्यावरच ग्रूपमधे लेखन करण्याची सुविधा तुम्हाला दिसायला लागेल.
३. ग्रूपच्या मेनू मधून योग्य तो पर्याय निवडून लेखन करा. ते साठवल्या वर (सेव्ह केल्यावर) लगेच प्रकाशीत होईल.

उदाहरणः
मायबोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर सदस्य नामाखाली 'नवीन लेखन करा' असा पर्याय दिसेल.

त्यावर टिचकी मारली असता नवीन लेखनाचे पान येईल

यातील योग्य तो पर्याय निवडा आणि त्यावर टिचकी मारा. आता तुम्ही त्या ग्रुपच्या पानावर जाल.

तुम्ही ग्रूपचे सभासद नसाल तर आधी सभासद व्हा. सभासद झाल्यावर तुम्हाला लेखनाचे पर्याय दिसू लागतील.

येथे नवीन लेखनाचा धागा हा पर्याय निवडून त्यावर टिचकी मारा की नवीन लेखनाचे पान समोर येईल.

नवीन लेखनाचा धागा, गप्पांचे पान, कार्यक्रम, पाककृती या पर्यायांविषयी अधिक माहिती मदतपुस्तिकेतल्या या धाग्यावर उपलब्ध आहे.

तुमच्या लेखनाला योग्य ते शीर्षक दिल्यावर "गुलमोहर"च्या पर्यायांमधून आपल्या लेखनाला पूरक व योग्य तो साहित्यप्रकार निवडा. (उदा. कथा, कविता, मराठी गझल इत्यादी).

हितगुज विभागात विविध ग्रुपमध्ये त्या त्या विषयानुसार लेखन करता येते.
रंगीबेरंगी ह्या विभागात लिहीण्यासाठी तेथील सभासदत्व विकत घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतला हा धागा बघा.

कृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

मी मायबोलि वर नविन सभास्द झाले आहे. पुजेत वाप्र्र्ल्या जान्यार्रा पत्ररि व पूज्अनिय व्रुक्शान सम्ब्धधि माहिति देउ इछिते . ह्या लेखान चे scanned copies माझ्याक्ड॓ आहे, ती माहीति एथे देन्याचि procedure कळ्वावे.

bnlele

वरती दाखवलेल्या चित्रात [लाल, निळा, भगवा आणि हिरवा असे] ४ रंगीबेरंगी चौकोन आहेत. त्या चौकोनात ज्या गोष्टी आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे

  1. लाल चौकोन : यामध्ये धाग्याला प्रतिसाद देण्याकरिता 'मजकूर' लिहायचा असतो.
  2. निळा चौकोन : प्रतिसाद देण्याकरिता लिहीलेला मजकूर सुशोभित /सुवाच्य करण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत ती साधने येथे दर्शविली आहेत.
  3. भगवा चौकोनः निळ्या चौकोनाने दर्शविलेल्या प्रत्येक बटणाचे कार्य या बाबतची मदत किंवा देवनागरी लिहीण्याचा तक्ता दर्शविण्यासाठी हे बटण आहे.
  4. हिरवा चौकोनः स्मितचित्रे कशी द्यावीत हे दाखवणारी लिंक दर्शविली आहे.

प्रतिसादाचा मजकूर लाल चौकोनाने दर्शविलेल्या जागेत भरून त्याखालील जागेत असलेले save बटण दाबले असता, तुमचा प्रतिसाद धाग्यावरती नोंदविला जातो. मजकूर न भरता save बटण दाबल्यास अशाप्रकारे संदेश येतो.

प्रतिसाद field is required.

तुम्हाला येणारा संदेश हा, प्रतिसादाचा मजकूर न लिहीता save बटण दाबल्याने येत असावा असा माझा अंदाज आहे. कृपया वरील चूकदर्शकसंदेश येण्यापूर्वी आपण काय क्लिकक्लिकाट केला होता ते कळवल्यास मदत करणे सोपे जाईल. धन्यवाद.

अर्चना दातार, मायबोलीवर स्वागत आहे !
मायबोलीच्या विविध भागांची थोडक्यात ओळख करून घ्या. देवनागरी लिहीण्याची चाचणी करण्यासाठी इथे जागा आहे.

आपण म्हणता ते स्कॅन टाकण्याकरिता धार्मिक ग्रुपमध्ये नवीन लेखनाचा धागा निवडा.

सतीश देवपूरकर, मायबोलीवर स्वागत आहे. धाग्याच्यावर मदत_समितीने लिहीलेल्या माहितीतल्या क्रमाने त्या त्या गोष्टी करत गेल्यास गज़ल प्रकाशित करता यावी. त्या क्रमाबाबत काही शंका असल्यास या धाग्यावर नि:संकोचपणे विचारा.

धन्यवाद !

इथे जा http://www.maayboli.com/node/2548 आणि सदस्य व्हा. मग उजवीकडे 'नवीन पाककृती' अशी लिन्क दिसेल त्यावर क्लिक करा आणि पाककृती लिहा.
(तीच आधी कोणी लिहिली आहे का बघा. Wink )

नमस्कार....मी आठवणीच कपाट भाग -४ टाकायचा प्रयत्न करते आहे...पण मला ते जमत नाही मी लेखन करा यावर क्लिक करते.....नंतर तिथे वेग-वेगळे ओप्शन्स येतात मी कथा/कादंबरीवर क्लिक करताच थेट गुलमोहर ग्रुपम्धे पोहचते....तिथे आधी सारखे...शिर्षक.....गाभा...यासारखी माहिती दिसत नाही......मी या ग्रुपची सभासद नाही म्हणून असे होत आहे का? असे असेल तर सभासद होण्यासाठी मला काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे.
विनीता

विनीता देशपांडे नमस्कार,
बदलानुसार नवीन माहितीचा भरणा केला आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यात सापडेल अशी आशा आहे.
वाचल्यानंतरही काही प्रश्न असल्यास इथे नि:संकोच विचारा.

मदत_समिती.

नमस्कार

मी एक कादंबरी पोस्टते आहे. पण धागा पुढे कसा ओढावा ते कळत नाहीये. Sad
मी रोज नविनच धागा काढ़ते कृपया मार्गदर्शन करावे.

http://www.maayboli.com/node/37474

धन्यवाद

नमस्कार
माझा दूसरा एक प्रॉब्लम म्हणजे नविन पोस्ट केलेले लेखन, नविन लेखन मधे दिसते.पण गुलमोहर कथा / कादंबरी मधे दिसत नाही
कृपया मदत करा

मी अपूर्ण लेख पूर्ण करण्यासाठी पाऊलखुणा वर क्लिक केले. तर पॅरेग्राफ दिसत नव्ह्ते. संपादन वर क्लिक केले असता ते आले. मग लेख प्रकाशित केल्यानंतर ते पॅरेग्राफ दिसणार नाहीत का? त्यासाठी काय करावे?

.

मी 'तांदळाची उकड (लहानांचा खाऊ)' ही पा.कृ. लिहिली आहे.
ही पा.कृ. आहारशास्त्र आणि पाककृती मध्ये कशी हलवायची?
पा.कृ. लिहिताना 'आहारशास्त्र आणि पाककृती' असा ऑप्शनच मिळाला नव्हता :-/

नमस्कार चेरी,

>> पा.कृ. लिहिताना 'आहारशास्त्र आणि पाककृती' असा ऑप्शनच मिळाला नव्हता :-/

तुम्ही आहारशास्त्र आणि पाककृती या ग्रुपचे सदस्य असले पाहिजे. सदस्य झाल्यावर [म्हणजेत ग्रुपात सामील झाल्यावर] उजव्या बाजूला दिसणारा मेन्यू वापरून नवीन रेसिपी तेथे तुम्ही लिहू शकाल. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतला हा दुवा बघा
हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?

>> ही पा.कृ. आहारशास्त्र आणि पाककृती मध्ये कशी हलवायची?

यासाठी तुम्ही प्रशासकांना त्यांच्या विचारपूशीत विनंती करू शकता.

धन्यवाद !
-मदत_समिती

नमस्कार मदतसमिती,

मी अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या काही कथांचा अनुवाद केला आहे. त्या कथा मायबोलीवर प्रकाशित केल्या तर चालेल का?

काही टेक्निकल कारणामुळे माझ्या एकाच लेखाचे तीन भाग पोस्ट झाले आहेत. बाकीचे दोन कसे डिलीट करता येतील??

नमस्कार
मी माबो ची नवीन सदस्य.
आज मी हितगुज- भटकंती मधे लेख लिहायला घेतला आणि लिहिता लिहिता काय झाले माहीत नाही पण लेख प्रकाशित झाला. त्यामुळे तो लेख कसबसा नाहीसा होईपर्यंत मी पूर्ण panic मोड मधे. असो, मला वाटते की मी save केले आणि लेख प्रकाशित झाला. प्लीज़ मला सांगाल का की मी काय गडबड केली ते? दुसरी गोष्ट- लेख प्रकाशित करा किंवा अपूर्ण हा पर्याय कुठेही दिसत नाही आहे. लेख preview कसा करायचा तेही सांगाल का प्लीज़.
फोटोविषयी- माझे सदस्यत्व मधे मी जर फोटो स्टोर केले ते आपोआप साइज़ माबो च्या निकषाप्रमाणे होतो का? प्लीज़ फोटो टाकण्याविषयी पण मार्गदर्शन हवे आहे.
सॉरी, पण इथे नवीन असल्यामुळे फार गडबडल्यासारखे होत आहे. प्लीज़ मार्गदर्शन करा.

Pages