मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 25 March, 2008 - 17:41

मायबोलीवर लेखन करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांशी संबंधीत अनेक ग्रूप आहेत. या ग्रूपमध्ये, तुमचे लेखन तुम्ही स्वत:च प्रकाशीत करू शकता. मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

१. मायबोलीवरच्या ग्रूपमधून योग्य तो ग्रूप निवडा.
२. तुम्ही त्या ग्रूपचे सभासद नसाल तर सभासद व्हा. सभासद झाल्यावरच ग्रूपमधे लेखन करण्याची सुविधा तुम्हाला दिसायला लागेल.
३. ग्रूपच्या मेनू मधून योग्य तो पर्याय निवडून लेखन करा. ते साठवल्या वर (सेव्ह केल्यावर) लगेच प्रकाशीत होईल.

उदाहरणः
मायबोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर सदस्य नामाखाली 'नवीन लेखन करा' असा पर्याय दिसेल.

त्यावर टिचकी मारली असता नवीन लेखनाचे पान येईल

यातील योग्य तो पर्याय निवडा आणि त्यावर टिचकी मारा. आता तुम्ही त्या ग्रुपच्या पानावर जाल.

तुम्ही ग्रूपचे सभासद नसाल तर आधी सभासद व्हा. सभासद झाल्यावर तुम्हाला लेखनाचे पर्याय दिसू लागतील.

येथे नवीन लेखनाचा धागा हा पर्याय निवडून त्यावर टिचकी मारा की नवीन लेखनाचे पान समोर येईल.

नवीन लेखनाचा धागा, गप्पांचे पान, कार्यक्रम, पाककृती या पर्यायांविषयी अधिक माहिती मदतपुस्तिकेतल्या या धाग्यावर उपलब्ध आहे.

तुमच्या लेखनाला योग्य ते शीर्षक दिल्यावर "गुलमोहर"च्या पर्यायांमधून आपल्या लेखनाला पूरक व योग्य तो साहित्यप्रकार निवडा. (उदा. कथा, कविता, मराठी गझल इत्यादी).

हितगुज विभागात विविध ग्रुपमध्ये त्या त्या विषयानुसार लेखन करता येते.
रंगीबेरंगी ह्या विभागात लिहीण्यासाठी तेथील सभासदत्व विकत घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतला हा धागा बघा.

कृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

मायबोलीवरचे जुने साहित्य कसे शोधावे? पूर्वी मी 'शोध' वापरला होता, पण आता तेथे शोध घेतला तर तो गूगल वर रिडायरेक्ट करतो. दुसरा काही उपाय आहे का?

शंतनू, कुठल्याही रॅन्डम धाग्यावर प्रतिसादात जे काही शोधायचे आहे ते टाईप करा.
ते सिलेक्ट कॉपी करुन शोधच्या रकान्यत पेस्ट करा. सर्च वर क्लिक करा.
माबोचे शोध रीझल्ट येतात.

सस्मित, उत्तराबद्दल आभारी आहे. मी तुमचाच वरचा प्रतिसाद, त्यातील 'माबोचे शोध रीझल्ट येतात' हे शब्द कॉपी करून वरती 'शोध' या रकान्यात पेस्ट केले. तर त्यावर इन्ग्रजीत 'नो रिझल्टस्' असे उत्तर आले.

'माबोचे शोध रीझल्ट येतात' हे शब्द कॉपी करून वरती 'शोध' या रकान्यात पेस्ट केले. तर त्यावर इन्ग्रजीत 'नो रिझल्टस्' असे उत्तर आले.>>>> Uhoh

अच्छा! मला एक विशेष फरक दिसला ह्यात. तुमच्या चित्रात 'शोध' च्या खाली जिथे आपण टाईप करतो, त्यात देवनागरीत 'शोध' दिसते आहे. पण माझ्याकडे ते तसे न दिसता इन्ग्रजीत 'गूगल सर्च' दिसते. काहीतरी घोळ आहे नक्की!Capture.PNG

शेतकरी राजा
दगडाला पाझर फुटेल पण माणसाला नाही,
दिवसभर काम करणार्या शेतकर्याची किंमत नाही .
करतो शेतात राब- राब कष्ट ,
सोसतो तो हाल आणि अपेष्ट .
शेतात पिक असताना स्वस्थ बसत नाही,
रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही .
एवढं सगळ सोसाव लागत त्याला ,
पण सरकार बघत बसतो त्याला.
शेतकरी संपूर्ण जगाचा राजा आहे,
त्याने पिकवलेल्या धान्यांवर आपण जगत आहे.
शेतकर्याच्या कामाला कमी समजतात,
मग त्याने पिकवलेल धान्य का खातात.
-समृद्धी विठ्ठल खोत.

शेतकरी राजा
दगडाला पाझर फुटेल पण माणसाला नाही,
दिवसभर काम करणार्या शेतकर्याची किंमत नाही .
करतो शेतात राब- राब कष्ट ,
सोसतो तो हाल आणि अपेष्ट .
शेतात पिक असताना स्वस्थ बसत नाही,
रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही .
एवढं सगळ सोसाव लागत त्याला ,
पण सरकार बघत बसतो त्याला.
शेतकरी संपूर्ण जगाचा राजा आहे,
त्याने पिकवलेल्या धान्यांवर आपण जगत आहे.
शेतकर्याच्या कामाला कमी समजतात,
मग त्याने पिकवलेल धान्य का खातात.
-समृद्धी विठ्ठल खोत.

ग्रुप्सचे वर्गीकरण पाहिले. विषयानुसार हा सेक्शन पाहिला. पण वेबसीरीज बद्दल माहिती कुठे लिहावी हे काही समजले नाही. दोन तीनदा ही यादी पाहिली. कृपया मदत करा.

महोदय
अनेक वर्षांपूर्वी मायबोलीची देवनागरीत लिहीण्याची लिंक वापरून मी सदस्यत्व न घेताही देवनागरीत लिहून ते लिखाण अन्यत्र वापरू शकत असे. नंतर मराठी एडीटर वापरले. अलिकडेच मायबोलीची लिंक वापरायचा प्रयत्न केला असता ती सुविधा सापडली नाही. सदस्यत्व घेणे अनिवार्य केले आहे असे दिसते. आता मी सदस्यत्व घेतलेच आहे. त्यामुळे माझा प्रश्न नाही. परंतु ती सुविधा पुन्हा सुरू केल्यास एक चांगली सोय मायबोलीच्या बाहेर देखील उपलब्ध होईल. कृपया विचार व्हावा ही नम्र विनंती.

Pages