एक सिगारेट पिणारी मुलगी

Submitted by तुमचा अभिषेक on 28 April, 2013 - 09:31

आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..

ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत..

वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच. दिवसभराच्या दगदगीने आलेला शीणवटा म्हणा, खाडीवरून येणारा खार्‍या चवीचा थंडगार वारा अंगाखांद्यावरून खेळू लागताच, बायको खिडकीला डोके टेकवून लवंडली. मी मात्र जागाच होतो.. नेहमीप्रमाणेच.. बोटांची नखे खात.. हातात नावाला म्हणून पेपर, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. एका नजरेतच ओळखले. आजही तशीच तर दिसत होती.. जशी तीन-साडेतीन वर्षांपूर्वी..

रिलायन्समधील नेहमीसारखीच एक सकाळ. नाश्त्याच्या ऑर्डरची वाट बघत कॅटीन काउंटरला रेलून उभा होतो. हातात नावालाच म्हणून मेनूकार्ड धरलेले, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. माझ्याच दिशेने येताना. खरे तर काऊंटरच्या दिशेने येताना. अगदी बाजूलाच येऊन उभी राहिली. तिच्या एका कटाक्षाच्या अपेक्षेत तिला न्याहाळत असलेलो मी. पहिल्या नजरेत भरावेत ते तिचे कुरळे कुरळे आखूड केस.. कानांमागे ओढलेले.. मानेवर रुळणारे.. थोडासा टॉमबॉईश लूक देणारे. अन साजेसाच पेहराव. निळ्याशार जीन्सवर पांढरी आखूड कुर्ती. डाव्या हाताच्या मुठीत घट्ट धरलेली पर्स अन तिलाच जणू मॅचिंग असे मनगटी घड्याळ. दुसर्‍या मनगटात मात्र जाडसर काळे कडे.. हो कडेच.. बांगडी तरी कशी म्हणावे त्याला. इतक्यात अचानक तिने माझ्या दिशेने पाहिले. अन मी अनुभवले ते आतापर्यंतच्या सार्‍या वर्णनाला छेद देऊन जाणारे, समोरच्याचा मनाचा भेद घेऊन जाणारे, तिचे काळेभोर डोळे.. आखीव रेखीव भुवयांच्या कोंदणात. त्या नजरेच्या कैचीत अडकणार नाही ते मन कसले.. कितीही चंचल का असेना, काही काळ रेंगाळणारच. त्या नजरेला कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाने मढवलेले.. ते तिचे डोळे.

हसली तशी माझे आणखीनच भान हरपले. हाताला काहीसा झटका बसून भानावर आलो तेव्हा लक्षात आले की हातातले मेनूकार्ड खेचले जात होते. किंचित ओशाळल्यासारखे सॉरी पुटपुटलो खरे, पण तीचे लक्ष कुठे होते त्याकडे. कसलीशी ऑर्डर देऊन निघून गेली ती. अन तिला पाठमोरा न्याहाळणारा मी. केस अगदीही काही आखूड नव्हते. जीन्स-कुर्तीचा पेहराव तिला किती शोभत होता हे पाठीमागूनच समजावे.

अन मग हे रोजचेच झाले. तीच वेळ तीच जागा. तिचे बदलणारे कपडे पण तेच तसेच रुपडे. अन नजर, कातिल की काय म्हणतात अगदी तश्शीच. ज्यूस अन सॅंडवीचशिवाय वेगळे काही घेताना तिला कधी पाहिले नाही. ती मला बघते की नाही हे कधी कळले नाही. पण एकदा मी सुद्धा चीज सॅंडवीच घेऊन तिच्या जवळच्याच टेबलवर बसलो. मी मागायच्या आधीच हसून तिने सॉसची बाटली माझ्यापुढे सरकवली. पुन्हा ती आपल्या खाण्यात मग्न. मी हलकेच अंदाज घेत होतो, पण पुन्हा काही तिने माझ्याकडे पाहिले नाही. तिचे उरकले अन पर्स उचलून ती निघून गेली. कॅंटीनबाहेर पडून दिसेनाशी होईपर्यंत तिला नजरेनेच सोबत देत, सावकाशपणे मग मी देखील उठलो. ती उजवीकडे "ए" "बी" "सी" ब्लॉकच्या दिशेने आणि माझी पावले वळली डावीकडच्या "डी" ब्लॉककडे.

ठरवले तर कंपनीच्या पोर्टलवर तिची माहिती मिळवणे सोपे होते. तिचे नाव, तिची बसायची जागा, तिची कामाची पोस्ट, तिचे वयच नव्हे तर तिचा रक्तगट कोणता या सारखी वैयक्तिक माहिती सुद्धा सहज उपलब्ध होती. गरज होती ती फक्त पंधरा-वीस मिनिटांचा वेळ काढून पोर्टलवर फीड असलेला डेटा चाळायची. पण तशी गरज आहे हे मन कबूल करत नव्हते. कदाचित त्याला गुंतायची भिती वाटत असावी.

दिवस सरत होते. फारसे काही वेगळे घडत नव्हते. तरीही या नात्यातील वीण घट्ट होतेय असे जाणवत होते. येणार्‍या सकाळची वाट आदल्या रात्री डोळे मिटण्यापासून बघू लागलो होतो. सकाळचे तिचे दर्शन पुढच्या दिवसभराला पुरत होते. मध्ये एकदा तिला सुट्टे पैसे कमी पडत होते, तेव्हा मी माझ्याकडचे दोन रुपयांचे कूपन पुढे सरकवल्याचे आठवतेय. हात किंचित थरथरतच होता माझा त्यावेळी. तिने त्याकडे दुर्लक्ष करतच ते स्विकारले. त्या कूपनाची परतफेड म्हणून तिचे ते हसणे.. नंतरही कित्येकदा आम्ही एकमेकांना सामोरे गेलो. नजरेतील ते ओळखीचे भाव, ना लपवायचे प्रयत्न ना दाखवायची ओढ.. कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही, किनार्‍यावर उभे राहूनही लाटांशी खेळायचा आनंद लुटू शकते तेच खरे मन.. एकेक घर करत आमच्यातील नाते पुढे सरकत होते एवढे मात्र खरे..

या दिवसांत एखादा दिवस असाही यायचा जेव्हा ती दिसायची नाही. मन खट्टू तर व्हायचेच पण आयुष्यातील एक दिवस फुकट ही गेल्यासारखे वाटायचे. दुसरा दिवस येणार हेच काय ते समाधान. एखादा दिवस आपणही तिच्या नजरेस न पडून तिलाही तसेच वाटते का बघावे, असा विचार मनात यायचा. पण तिला काय वाटेल हे समजण्याचा मार्ग नसल्याने त्या विचाराला बगल दिली जायची.

अन अश्यातच एक दिवस मी तिचे वेगळे रूप पाहिले...

दुपारच्या वेळेला जेवण आटोपून काही कामानिमित्त "ए" ब्लॉकला जाणे झाले. उन्हाची झळ लागू नये म्हणून थोडेसे लांब पडत असले तरी पायवाटेवर केलेल्या शेडखालूनच मी सहसा जातो. पण आज आभाळ भरून आल्याने शॉर्टकट घ्यायची संधी साधली. थोड्याश्या अडनाड्या रस्त्याने जिथे चिटपाखरांचा अड्डा वसावा, खुरटी झुडपे तुडवत चालता चालता हातातल्या मोबाईलशी चाळा.. नेहमीप्रमाणेच.. मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. आपल्याच धुंदीत, बरोबर तीनचार मित्र. ऑफिसचेच असावेत. हातात सिगारेट अन तोंडातून निघणारा धूर.. सर्वांच्याच.. अन हो, तिच्याही. धूराच्या वलयात धूरकट धूरकट होत जाणारा तिचा चेहरा, अन नकळत मंद झालेली माझी पावले. परत परत मान वळवून तिला पाहताना, अखेरच्या वळणावर तिची माझ्याकडे नजर गेलीच.. झटक्यात मान वळवली.. पण नजरानजर झालीच.

बस्स, तीच शेवटची नजरानजर.. पुढेही काही सकाळ आल्या, पुढेही नजरेच्या भेटी झाल्या. पण नजरेतील अर्थ आता बदलले होते. जाणूनबुझून मी तिच्यापासून नजर चोरू लागलो होतो. अन ती काही फरक पडत नाही असे दाखवत असली तरी तिची नजर खरं काय ते बोलत होती.

कधी कधी शब्दांना पर्याय नसतो.. नजरेची भाषा नातं जुळवण्यास कितीही समर्थ असली तरी जेव्हा तुटायची वेळ येते, तिथे शब्दच हवे असतात.. पण तो संवाद आमच्यात कधी झालाच नाही. इतक्यात तिची नजर माझ्याकडे गेली. आणखी एक नजरानजर, जवळपास तीन साडेतीन वर्षांनी.. पण नजरेत तेच तेव्हाचे ओळखीचे भाव. यावेळी मात्र लपवायचे प्रयत्न.. दोघांकडूनही.. शेजारी माझी बायको आहे याचे भान होते मला.. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझी बायकोच असणार याची जाण होती तिला.. तरीही नजर अडकली होती.. अन सोबतीला निर्विकार चेहरा.

पुढचे स्टेशन आली तशी ती उठली. नजरेची साखळी नाही म्हटले तरी तुटलीच. मुद्दामच ती उतरायला माझ्या विरुद्ध दिशेच्या दरवाज्याला गेली असावी. आजही ती पाठमोरीच छान दिसत होती. आजही सिगारेट पित असावी का.. तिला उतरताना पाहून माझ्या मनात आलेला शेवटचा विचार, मन पुन्हा एकदा चलबिचल करून गेला. खिडकीच्या बाहेर नजर टाकून ती दिसते का याचा शोध घेतला. मात्र ट्रेनने वेग पकडला तसे त्या गर्दीत हरवलेल्या तिला शोधणे अशक्यच.. कदाचित तिचे ते शेवटचे अपेक्षित दिसणे समाधान देऊन गेले असते. पण नशीबात नव्हतेच.. होती ती एक हलकीशी चुटपूट.. नकळत हात खिश्यात गेला.. सवयीप्रमाणेच.. पाकीटातून सिगारेट काढून तोंडात सरकवली.. नेहमीप्रमाणेच.. ट्रेनमध्ये आहे याचा विसर पडून ती शिलगावणार इतक्यातच..........

.
.
.

चुरगाळलेली ती सिगारेट खिडकीबाहेर जाताना पाहून........... किती बरे झाले असते ना, जर मनातल्या आठवणीही अश्याच काढून फेकणे सोपे असते तर..

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकशे एकोणपन्नास >>> छ्या...मग 'एक आप्पे खाणारी मुलगी' अशी गोष्ट लिहायची न. नक्की मायबोलीवर दोनशे एकोणपन्नास पर्यंत गेला असता.

झंपी बाई आहे हे आज कळले
त्यातून सिगारेट पीणारी आहे हे वाचून फार वाईट वाटले

मला व्यसनी बायका आवडत नाहीत
व्यसन करणेच मुळात वाईट

त्यात बायकाना व्यसन लागले की झालेच घरादाराचा विस्कोट् करतात त्या .....पुढच्या ५ पिढया नरकात गेल्याच म्हणून समजा

Happy

सायो, मलई बर्फी खाताना कोणीही छानच दिसेल ग. मुलगी मनातून उतरायला हवीये ना. अस अप्प्याचा बोकणा भरलेली, मित्राच्या चटणीतच उष्टा अप्पा बुडवून बुडवून खाणारी, आणि थोडे आप्पे (चुरा) प्लेटमध्येच टाकून देणारी मुलगी पहिली की तमाम आप्पेभक्त मायबोलीकर कसे ग शांत बसतील...

अच्छा म्हणुन.. आप्पेवाली.. नाहीतर मी बापडी 'श्रावणघेवडा बरोब्बर ओळ्खणारी मुलगी' ह्यावर लिहा असे लिहिणार होते.

'श्रावणघेवडा बरोब्बर ओळ्खणारी मुलगी'<<<<<<

उलट् अशा मुलीला पसंतीसाठी फुल्ल मार्क द्यायला हवेत!!!!!

घेवडा कुठल्या प्रकारचा हे अज्जीबात न ओळखण्नारी मुलगी असे हवे
_________________________________________
उगाच विरोधाला विरोध म्हणून ही पोस्ट् Wink

मी तिथे होतो, "डी" ब्लॉकला.. जॉब सोडून दीडेक वर्षे झाली अन्यथा भेट झाली असती.. पण अजूनही तेथील फूडकोर्ट अन तलाव आठवणीत आहे..

असो, प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. Happy

सिगारेट.
मी तर म्हणतो अजून पुढे जावून ड्रग,दारू, सर्व व्यसन चालू करून स्वतःचे मॉडर्न पण सिद्ध करावे आणि पुरुषांचे थोपड फोडावे.

काय आहे हे साजिरा?
>>>
तिथं कोपर्‍यात दिसतंय की मौज दिवाळी अंक.
किरण येलेकर हे नवीन पिढीतले महत्वाचे लेखक आहेत

व्यसनी स्त्री असू किंवा पुरुष कोणाची बोट नाजूक नसतात .
अनेक रोगांनी ग्रस्त असतात.
.

साजिरा ओके,
ती माहिती वाचली.
पण मला विचारायचे होते की या दोन्ही कथानकात साम्य आहे का? की केवळ शीर्षक साधर्म्य...

हेमंत 333
+786
Why should boyz have all the fun Happy

साम्य आहे का
>>>
असेल बुवा. तुझं शीर्षक चोरलं तशी कथाही ढापली असेल.

साजिरा ओके,
लेखक कुठे आढळले तर धन्यवाद जरूर बोलतो Happy

प्रथम म्हात्रे ग्रेट
काम कमी आणि ग्रूप छान असेल तर मजा होती तिथे..
आताही जवळच राहतो तिथे पण आता त्या गेटच्या आता जाणे होत नाही. इच्छा तर फार आहे...

चुरगाळलेली ती सिगारेट खिडकीबाहेर जाताना पाहून........
>>> सिगारेट कुणी खिडकी बाहेर फेकली, काय कळलं नाही

चुरगाळुन फेकुन दिली म्हणजे लेखक नियमीत सिगरेट ओढणारा नाही. अन्यथा आपण ट्रेन मध्ये आहोत हे लक्षात आल्यावर त्याने ती पाकीटात परत ठेवली असती. व्यसनी व्यक्ती वैतागली/उदास झाली/आंदनली/कंटाळली की तिला सिगरेट अधिक प्रिय वाटते अणि त्यावेळी ओढु शकत नसली तर अधिक किमतीही वाटते.

प्रत्येकाच्या पसंतीचा प्रश्न शेवटी . पुरुषांचे क्रायटेरिया आणि स्त्रियांचे क्रायटेरिया वेगळे असणारच .. प्रत्येकाने कुठल्या बाबतीत तडजोड करायची आहे की नाही हे तो ठरवत असतो , म्हणजे ज्यांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे ते लोक . मुलगी काळी नको , चष्मा नको , जाड नको .. त्याचप्रमाणे मुलगा बुटका नको , टक्कल नको , जाड नको अशा कारणांस्तव अरेंज मॅरेज मध्येही स्थळं नाकारली जात असतील ... आणि लव्ह / रोमॅण्टिक रिलेशनशिप बाबतीत अशांना मनातच रिजेक्ट केलं जात असेल .

हुद्दा , मिळकत , शिक्षण हेही मुद्दे मनात तोलून , तुलना करून पसंती ठरवली जाते .. पुरुषांना सोज्वळ प्रतिमेत बसणारी बायको हवी असण्यात आश्चर्य काहीच नाही .. उलट बऱ्याच स्त्रियांची लाईफ पार्टनरने सिगरेट पिण्याला काही हरकत नसते असा माझा अंदाज आहे . काहींची इतर व्यसनं नको असा आग्रह असू शकतो किंवा चालवून घेण्याची तयारी असू शकते ... शेवटी प्रत्येकीची चॉइस आहे ...

ज्यांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे असा प्रत्येकजण आपण कशाने सुखी होणार आहोत या दृष्टिकोनातून पुढची निवड करत असतो ...

मी सुंदर , देखणी बायको मिळाल्याने सुखी होईन .

किंवा

मी सुगरण , साधीसुधी , काकुबाई , सगळ्यांना धरून राहणारी , मिळूनमिसळून राहणारी बायको मिळाली की सुखी होईन .

किंवा

मला उंच , उच्चशिक्षित नवरा मिळाला की मी सुखी होईन .

किंवा

मला श्रीमंत नवरा मिळाला की मी सुखी होईन

किंवा मला मनमिळावू , समजूतदार , प्रेमळ नवरा मिळाला की मी सुखी होईन .

यातल्या कोणत्याच अपेक्षांना आपण जज करू शकत नाही . कारण सुख हे मानण्यावर असतं . त्यामुळे अपेक्षा एक आणि जोडीदार इतरांच्या दृष्टीने गुणी , लाखात एक जरी मिळाला पण आपल्या अपेक्षेत बसणारा नाही तर ती व्यक्ती सुखी होईलच याची गॅरंटी नाही ... कदाचित होईलही , पण नाही होऊ शकली तर त्या जोडीदाराचं आयुष्यही कारण नसताना तापदायक बनेल .

उदा . मनमिळाऊ स्वभाव काय चाटायचा आहे , मेली एक जादा मोलकरीण ठेवणं यांच्या पगारात परवडत नाही , मलाच पाठ मोडून येईपर्यंत राबावं लागतं . प्रत्यक्ष बोललं नाही तरी मनात बोललं जाऊ शकतं .

किंवा हिच्यापेक्षा आमच्या ऑफिसातली अमुक तमुक कितीतरी देखणी होती . पण जात वेगळी पडली , घरच्यांनी हो म्हटलं नसतं ..

एका बाईंना नवरा इंजिनिअरच हवा होता , बाकी कुठलं प्रोफेशन नको .. 30 वर्षांपूर्वी . तसा त्यांना मिळाला आणि संसार सुखाचा झाला .

एका मुलीचं लग्न ठरण्यात अडचण येत होती .. तिला उच्चशिक्षित , उत्तम कमावणाऱ्या प्रोफेसरचं स्थळ सुचवलं गेलं ... ती नकार देऊन म्हणाली , मास्तरडा नको , मैत्रिणींना सांगायला लाज वाटते मास्तर आहेत म्हणून .

शेवटी ज्याचा त्याचा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन आणि अपेक्षा .. त्याच्या बऱ्यावाईट परिणामांची जबाबदारी त्या माणसाची .. आपण तिऱ्हाईत व्यक्ती चूक किंवा बरोबर असं लेबल लावू शकत नाही .

मागे कधीतरी फेसबुकवर एक कमेंट वाचली होती .. एका उच्चशिक्षित , उत्तम कमावणाऱ्या मुलाने अतिशय सुंदर अशा मुलीशी लग्न केलं .. तिने भरपूर त्रास दिल्यावरही नवऱ्याची तिला सोडायची इच्छा नव्हती , सगळं सहन करत लग्न टिकवून ठेवण्याची तयारी होती . तीच हट्टाला पेटली म्हणून नाईलाजाने घटस्फोट द्यावा लागला वर भरपूर ऍलिमनी . आता दुसरी बायको साधी , मनमिळावू आहे ... पण दिसायला सुंदर नाही म्हणून तोच माणूस ज्याने पहिलीला राणीसारखी ठेवली होती , तो हिला कस्पटासमान वागणूक देतो . .

मनुष्य स्वभावाचे अक्षरशः असंख्य नमुने दिसून येतात . त्यामुळे कोणाच्या अपेक्षा चूक की बरोबर हे दुसऱ्याने ठरवायला जाऊ नये ..

नंतर वाद , नाराजी वगैरे होऊन मोडण्यापेक्षा जुळुन न आलेलं चांगलंच की .

सिगारेट ओढणाऱ्या बायकोसोबत मी सुखी होऊ शकणार नाही असं बहुसंख्य पुरुषांना वाटत असू शकतं .

तसं सिगारेट ओढणाऱ्या नवऱ्यासोबत सुखी व्हायला काही अडचण येण्याचं कारण नाही असं बहुसंख्य स्त्रियांना वाटत असू शकतं .. म्हणजे ज्यांना जोडीदार निवडण्याची चॉइस आहे त्यांना ...

ह्याला डबल स्टँडर्ड म्हणणं योग्य वाटत नाही . पर्सनल चॉइसचा प्रश्न आहे .

प्रतिसाद भरकटलेला वाटला तर क्षमस्व .

कथा चांगली होती .

राधानिशा छान सविस्तर प्रतिसाद
एखाद्या कथेवर मोठा प्रतिसाद येतो तेव्हा कुठल्याही लेखकाला सर्वात पहिले आनंदच होत असावा,. पटणे न पटणे हे नंतर Happy

बाकी मला पटला आपला प्रतिसाद

नायक सिगारेट ओढनारा असो किंवा नसो, पण कुठल्याही पुरुषाने जर लग्नासाठी निर्व्यसनी मुलीचा आग्रह धरला तर या अपेक्षेत गैर काही नाही... किंबहुना असेच असावे ना. कारण सिगारेट हे वाईटच व्यसन आहे.

Pages