सतावे सारखी चणचण!

Submitted by कर्दनकाळ on 2 May, 2013 - 11:16

सतावे सारखी चणचण!
करावी मी किती वणवण?

नको हे श्वास कर्जाऊ....
कुठे माझ्याकडे तारण?

शिकवले वाळवंटाने......
कशी सोसायची रणरण!

किती मी बोचतो आहे!
किती करतात ते तणतण!!

सणाणे शेर गझलेचा!
गझल माझी जणू सणसण!!

कसा मी बातमी झालो?
पहा ती फोनची खणखण!

किती मी आडवा-तिडवा....
जगाला जाहलो अडचण!

मला पाहून मंचावर.....
कवी घेतात का दडपण?

पसरलो मी इथे तेथे.....
कसे हे आवरू गचपण?

गझलप्रतिभा न ही माझी!
मिळाले हे मला आंदण!!

खडे मखरामधे बसती!
हि-यांना ना मिळे कोंदण!!

न या साध्यासुध्या जखमा!
दिले हे तू मला गोंदण!!

गझल श्वासांमधे माझ्या!
जगायाला मिळे कारण!!

उगा ना गुंफले अश्रू;
जगाला जाहले तोरण!

कुठे मी धोरणी इतका?
कळायाला तुझे धोरण!

तुझ्या झुळुकीमुळे माझे....
सकाळी दरवळे अंगण!

नको भांडूस माझ्याशी!
मला ना परवडे भांडण!!

मनाचा मळ धुण्यासाठी;
कुठे मिळतात का साबण?

गझलमय जिंदगी माझी!
तिचे मी बांधले कंकण!!

न कोणी भोवती तेव्हा.....
करे छमछम तुझे पैंजण!

फुले ऐकायला बसली!
तुझेमाझेच संभाषण!!

भुकेलेला बळीराजा....
गुरांना टाकतो वैरण!

किती कुरबूरती शायर!
तिलकधारी करा वंगण!!

विचारा प्रश्न बेताने!
अरे तो ठोकतो भाषण!!

तुझा आजार कवितेचा....
तुला घे हे गझलचाटण!

मुबारक बाटली त्याला!
जया ये लावता झाकण!!

******************************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुबारक बाटली त्याला!
जया ये लावता झाकण!!<<<<

हा समजला Happy ....आपली या मुद्द्यावर फोनवरून चर्चा झालेली एकदा पूर्वी
तुमचा हा खयाल छान आहे; गझलेत आणा असे मी म्हणालोही होतो (तुम्हाला आठवत असेल क नाही माहीत नाही .....अगदी एखाद वर्षही झालं असेल आता त्याला )

असो

मला संभाषण हा शेर सर्वाधिक आवडला

.

आपल्या यापूर्वीच्या काही यापेक्षा चांगल्या रचना पाहता ही अतीशयच सुमार आहे असेच वाटले

क्षमस्व

२७ काफिया...

व्वा सर !
<<<<<<<

यला म्हणतात् प्रोस्ताहनपर प्रतिसाद !!!
प्रतिसादही नाही आवडला

२७ काफिया...
>>> गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स काय आहे गझलेतल्या काफियांचा?
ककाकाका,
तुम्ही तो रेकॉर्ड नक्की मोडाल याची खात्रीच आहे.
रच्याकने तुम्ही १०० काफियांची गझल करु शकता काय?
फक्त ७३ तर करायचे आहेत. शुभेच्छा

मी परवा माबोबाह्य ज्येष्ठ गझलकारास भेट्लो
ते सांगत होते की त्यांनी ५० काफियांची गझल केलेली व ती भटाना दाखवलेली (त्यांचेही गुरू भट् साहेबच असले तरी मी देवपूरकरांबद्दल बोलत नाही आहे )

गुरुदेवांनी त्यातील ३१ शेर निवडले व ते चांगले आहेत असे म्हटले व तरीही पुन्हा त्यातील १५ शेरच् मैफिलेतून आलटॄन पालटून सादर कारावेत व त्यातीलही ७ ते ९ च स्वतः मनाने फायनल करावेत असे म्हटले

आता ककाकाकानी ही जी गझल केलेये ती त्यांच्या गुरुदेवाना दाखवली असती तर किती शेर गुरुदेवानी पहिल्या फेरीत बाद करवले असते काय माहीत Wink

असो

मला म्हणायचेय की १०० हा आकडा काहीच नाही आहे गिनिस बुकासाठी !!!!!

सर-पण सरपण राहिलंय.
अंगण आलं पण कुंपण राहिलंय.
झालंच तर खोबण, गाभण, तामण, बोडण, घसरण, पसरण, पखरण, कोकण, मीपण, रापण, शिंपण, ढापण ...

टोपण

नवाच एक, त्यांच्या गुरुदेवांनी बाराखडीत दिलेल्या कमान्डमेन्ट्समुळे तुमचे काही पर्याय अवैध ठरतात.

रावण ,घण, रांजण, कांजण, खाजण ,आपण ,रोपण, गंगावण ........

हे ही राहिले
________________________________________________________________
गुरुदेवांच्या मतानुसारच्या आक्षेपार्ह काफियाना पर्यायी सुचवावेत मग आम्ही मानू !!!!!!!!!!

मी व स्वातीआज्जीनी आतापर्यंत दिलेले काफिये सुमारे ३७ आधीचे गझलेतील २७ एकूण ६४ च !!!!

अर्रे यार छे !!

इतरांनीही हातभार लावाना राव !!!!

सर्व रसिकांचे आभार!
राहिलेल्या सर्व काफियांवर प्रतिभावान/प्रज्ञावान/कल्पक कवी/कवियत्रींनी शेर रचावेत!

टीप: या गझलेत एकंदर २६ शेर आहेत म्हणजेच २६ स्वयंपूर्ण कविता आहेत!

कोणत्याही कवीला तू इतक्याच कविता कर, इतक्या का केल्यास असे विचारण्यात आलेले ऐकिवात नाही!
तो त्या कवीचा प्रश्न आहे! एका गझलेत कमीत कमी ५ शेर असावेत, ५चा पेक्षा जास्त किती असावेत असे काही कुठे लिखित वा मुद्रित नाही! गझलकारसापेक्ष प्रतिासाद हे एकंदर मराठी गझलेच्या भवितव्याच्या दृष्टीने घातक आहे, जे फक्त आणि फक्त मायबोलीवरच पहायला मिळते!

वरील काही प्रतिसादवरून प्रतिसाद देणा-यांचे एकंदर गझलगांभिर्य/ गझलआस/ नसलेला ध्यास/ टवाळखोरी इत्यादिंचे दर्शन होत आहे असे खेदाने म्हणावे लागत आहे!.............इति कर्दनकाळ

आवरण , भलावण , रामायण ,

हुश्श !! ४३ झालेत आताशी +आधीचे २७ = ७०

असो
अजून ३० च हवेत आता

प्लीज तुम्ही लोक्स ही मदत काराना राव माझा घाम निघायलाय इथे

नवाच एक, आवरण आणि भलावण कसे कोंबणार या वृत्तात?
'नवखेपण' कोंबा.
मग काय - परकेपण, कोतेपण, हळवेपण, मोठेपण, कोठेपण, काहीपण, केव्हापण अशी आणखी एक माळ लावता येईल.

नुसते काफिये सुचविण्यात काय हुशारी आहे व कसली फुशारकी आहे?
शेर करवेत व मग आहेतच तुम्ही आणि आम्ही! प्रेक्षक आहे अख्खे जग!

समस्त टवाळखोरांना आव्हान आहे की, त्यांनी शेपूट न घालता सकस/समर्थ शेर करावेत!
चांगले असतील तर आम्ही वंदनच करू! कारण जे जे दिव्य तेथे आमचे हात जोडले जातात!
हे आहेत आमच्यावरील संस्कार!.....................इति कर्दनकाळ

टीप:
शेर लिहिणा-यांनी आम्ही केलेल्या सौंदर्यशास्त्रीय विश्लेषणास सोसायची तयारी ठेवावी!
मग पाहू यात कुणाचे नाव गिनिज पुस्तकात पाठवायचे ते! मग पाहू या हुशारी व फुशारकी!
तर्कशुद्ध बोलणा-यांनीच या फंदात पडावे!

हवेत गोळीबार करणा-यांनी, पलायनवाद्यांनी,साहित्यिक माथेफिरूंनी इकडे न फिरकलेले त्यांच्या दृष्टीने श्रेयस्कर!

तुमच्यावर अशी वेळ का यावी याचा विचार व्हावा सर,
इथे बरेच लोक गझल लिहितात, पण कुणालाच इतके टोकाचे प्रतिसाद येत नाहीत.
टाळी एका हाताने वाजत नाही, याला तुम्हीही तितकेच जबाबदार आहात.
मला माबोवर येवुन १ वर्ष नक्कीच झालय, मी खात्रीने सांगु शकतो की चांगले लिहिले की प्रतिसाद चांगलाच मिळतो इथे.
बाकी तुम्ही सुज्ञ आहात, अपेक्षा आहे की विचार कराल.

आम्ही काय लिहितो, कुठे उभे आहोत, कुठे चाललो आहोत, आम्ही काय वाचतो, इथे काय लिहिले जाते, इथल्या लोकांची मानसिकता वगैरे सर्व काही आम्ही जाणतो! कलाकृती आवडणे/न आवडणे आम्ही समजू शकतो! पण टवाळखोरांनी कितीही साळसूदपणाची झूल पांघरली तरी त्यांचा चेहरा, त्यांची उद्दिष्टे, हेतू हे साफ दिसतात हो!
आश्चर्य म्हणजे जे काही चारदोन खरे शहाणे असतील तेही यावर काही बोलत नाहीत! वाईटपणा कोण घेणार?

आहो, एखादा शेर, एखादी रचना आवडली नाही तर काही बिघडत नाही पण ज्या द्वेशमूलक व मत्सरी हेतूने इथे काहीही असंबद्ध लिहिले जाते त्याला मात्र तोड नाही!

आजवर मायबोलीवर आम्ही मनापासून वावरत आहोत! २५०-३००गझला आम्ही प्रकाशित केल्या असतील ! शिवाय प्रतिसादाकरता वेळेची व बुद्धीची पदरमोड केली ते वेगळेच! या सर्वांचा इतरांना किती फायदा झाला माहीत नाही, पण आम्हास मात्र मायबोलीवरील लिखाणाचा प्रचंड फायदा झाला आहे, होत आहे!

आम्हास फक्त आणि फक्त निखळ गझलेत रुची आहे! आता किती गझला कोण लिहितो, कधी लिहितो, किती प्रकाशित करतो हा काही वादाचा वा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो काय? लिहा ना, कितीही लिहा व प्रकाशित करा! कोणी आडवले आहे कुणाला? या सगळ्यामधे आम्हास व्यक्तिपूजेचा/व्यक्तिद्वेषाचा/मत्सराचा/ अर्थशून्य राजकारणाचा व केवळ हुल्लडबाजीचाच वास येत आहे! पण आम्हीही जातीवंत मास्तर आहोत! नाउमेद होणार नाही! गझललेखनाचे घेतलेले व्रत व अग्निहोत्र शेवटच्या श्वासापर्यंत चालूच ठेवू!

मायबोलीबाहेरील लोकांचे प्रतिसाद, त्यांच्यावरील साहित्याचे झालेले संस्कार, गझलेचा ध्यास, शिकण्याची उर्मी यांचा प्रत्यय आम्ही रोज घेतो! शेकडो मेल रोज जगातून येत असतात, स्काइपवर अनेक जण संवाद करत असतात! आम्हाला दैनंदिन कामकाजातून वेळ काढावा लागतो, पण लोकांची गझलकळकळ बघून आम्हाला नाही म्हणवत नाही फोनवर, मेलने, ब-याच मार्गाने निखळ गझलेवरील संवाद चालूच असतो आमचा! रात्री १वाजता आम्ही झोपतो व सकाळी ५.३०ला उठतो! दिवसभर गझलेची धुंदी असतेच! सर्व मेल्सना उत्तरे देता देता तोंडाला फेस येतो! पण आम्हास दिसतो तो तयार होणारा गझललेखक! त्यामुळे हे सर्व कष्ट आम्हास सुखदच वाटतात!

फक्त आणि फक्त मायबोलीवरच अशी टवाळखोरी आम्हास दिसते, पण आम्ही दुर्लक्ष करतो व अशा लोकांना देव चांगली बुद्धी देवो म्हणून प्रार्थना करतो!

एकाच माणसास टारगेट करणे, सुमार शेरांची खोटी वाहवा करणे, हुल्लडबाजी करणे कळपांनी इथे वावरणे, अनेक नावांच्या अकारण झुली पांघरून अत्यंत भ्याडपणे काहीही लिहिणे हे सर्व फक्त मायबोलीवरच दिसते! आमच्या १०-११ महिन्यांच्या येथील वावरात असे अनेकजण भेटले जे मायबोलीवरील कळपशाहीला, झुंडशाहीला, व टवाळखोरीला कंटाळून मायबोली सोडून गेले वा क्वचितच इथे येतात!
याचा अर्थ येथील भक्कम पाय रोवलेले, अनेक भक्तांचा लवाजामा असणारे, अनेक हांजीबाबा पाळणारे लोक यशस्वी वा जिकले/कामयाब झाले असे नाही! कोणावाचून कोणाचे अडत नाही! काळाचे चक्र हे फिरतच असते! काळ कोणासाठी थांबत नसतो! स्वत: हातपाय मारल्याशिवाय तरता येत नाही! कुणाच्या मेहरबानीने/ कृपेने गझलकार मोठा होत नसतो, तर अखंड व्यासंगाने, चिंतनाने, रियाजाने, ध्यासाने तो घडतो व मोठा होत असतो!

........................इति कर्दनकाळ

ते सगळं ठीक आहे पण आधी हा वरचा प्रतिसाद जो संपुर्ण बोल्ड आहे तो बोल्डपणा काढुन पुन्हा प्रकाशित करा ना प्लीज, म्ह्ण्जे नीट वाचता येईल

बोल्ड अशासाठी आहे की, सोयिस्कर दुर्लक्ष करणा-या संभावितांनाही वाचायची बुद्धी व्हावी!

आाम्ही जे वरती म्हटले आहे यात काय चुकीचे आहे?

आमच्या चुकांची यादी दे, मग बोलू आपण आमच्या चुका आहेत की, अजून कुणाच्या ते!

Pages