सतावे सारखी चणचण!

Submitted by कर्दनकाळ on 2 May, 2013 - 11:16

सतावे सारखी चणचण!
करावी मी किती वणवण?

नको हे श्वास कर्जाऊ....
कुठे माझ्याकडे तारण?

शिकवले वाळवंटाने......
कशी सोसायची रणरण!

किती मी बोचतो आहे!
किती करतात ते तणतण!!

सणाणे शेर गझलेचा!
गझल माझी जणू सणसण!!

कसा मी बातमी झालो?
पहा ती फोनची खणखण!

किती मी आडवा-तिडवा....
जगाला जाहलो अडचण!

मला पाहून मंचावर.....
कवी घेतात का दडपण?

पसरलो मी इथे तेथे.....
कसे हे आवरू गचपण?

गझलप्रतिभा न ही माझी!
मिळाले हे मला आंदण!!

खडे मखरामधे बसती!
हि-यांना ना मिळे कोंदण!!

न या साध्यासुध्या जखमा!
दिले हे तू मला गोंदण!!

गझल श्वासांमधे माझ्या!
जगायाला मिळे कारण!!

उगा ना गुंफले अश्रू;
जगाला जाहले तोरण!

कुठे मी धोरणी इतका?
कळायाला तुझे धोरण!

तुझ्या झुळुकीमुळे माझे....
सकाळी दरवळे अंगण!

नको भांडूस माझ्याशी!
मला ना परवडे भांडण!!

मनाचा मळ धुण्यासाठी;
कुठे मिळतात का साबण?

गझलमय जिंदगी माझी!
तिचे मी बांधले कंकण!!

न कोणी भोवती तेव्हा.....
करे छमछम तुझे पैंजण!

फुले ऐकायला बसली!
तुझेमाझेच संभाषण!!

भुकेलेला बळीराजा....
गुरांना टाकतो वैरण!

किती कुरबूरती शायर!
तिलकधारी करा वंगण!!

विचारा प्रश्न बेताने!
अरे तो ठोकतो भाषण!!

तुझा आजार कवितेचा....
तुला घे हे गझलचाटण!

मुबारक बाटली त्याला!
जया ये लावता झाकण!!

******************************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवरचे लोक इतके वाईट आहेत, त्यांना गझल समजण्याची अक्कल नाही वगैरे सर्व तुम्हाला माहित आहे ना? मग तुमचातरी इथेच गझल पोस्ट करेन असा अट्टहास कशापायी? नाही आवडत इथल्या लोकांना.. तर नका लिहू. मायबोलीबाहेरचे जे लोक सौंदर्यबोध घेऊ शकतात, रसिक आहेत, गझलकळकळ दाखवतात, त्यांच्याचसाठी लिहा. एक ब्लॉग चालू करून तिथे तुम्ही किती हव्या तितक्या गझल प्रकाशित करू शकता. वर कमेंट्स काय प्रसिद्ध करायचे हेदेखील तुम्हीच ठरवू शकता. इथे हांजीबाबा करणारे लोक तुम्हाला पसंद नसतील तर तुम्हीतरी त्यांना "माझी गझल वाचाच" असा हट्ट कशासाठी धरताय? मायबोली हे काही एकच व्यासपीठ नाही व्यक्त होण्यासाठी.

तुम्ही वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने इथे ज्येष्ठ आहात, मग तरी तुमचा(च) आयडी इथे तीन चारवेळेला रद्द होऊनही का इथे लिहिता? इतर जे कुणी तुमची टवाळी करतात त्यांचे आयडी रद्द होत नाहीत. तुमचा होतोय्, यावरून काय बोध घ्याल तुम्ही? तुमचे स्वतःचे इथे हसे होतंय सतत. आणि तुम्ही इरेला पेटल्यासारखे त्या प्रत्येक टवाळीवरती गझल रचत अजूनच हसे करवून घेताय. यामधून तुम्हाला काय मिळतंय नक्की? दिवसातला किती वेळ तुम्ही मायबोलीवरच्या टवाळखोरांसाठी रचल्या जाणार्‍या गझलेमधे वाया घालवताय याचा कधीतरी विचार करा. हाच वेळ तुम्हाला चिंतन, साधना आराधना आणि इतर सुंदर अर्थपूर्ण गझला रचण्यासठी वापरता येणार नाही का हे स्वतःलाच विचारून बघा कधीतरी.

नंदिनीबाई, टाळी एका हाताने वाजते का? दिसतं तसं नसतं. प्रोफेसरांचा वापर करून इथले काही गझलपंडित स्वतःचा फायदा करून घेत आहेत. फक्त प्रोफेसरांचा आयडि ब्यान होतो, गझलपंडितांचा होत नाही कारण तेवढ्या चतुराईने प्रोफेसरांना पोस्टी टाकता येत नाही. बॅडलक हे की प्रोफेसरांना ते कळत नाही. ते बिच्चारे लिहित सुटतात. Wink

आपल्याला बॅडलक वाटतं की यात मायबोलीची जागा वाया जातेय इत्यादी. मायबोलीच्या अ‍ॅडमीनलाही तसं वाटत असतं तर आतापर्यंत प्रोब्लेमच्या मुळावर घाव घालणारा उपाय नसता का केला त्यांनी? Wink

उगाच काय एकट्या प्रोफेसरांना दोष देताय? Proud

राऊंड मारून येतो.

जगदंब!!

तणतण, चणचण, कणकण, अडचण वगैरे!

गंभीर समीक्षक रचित इसवीसन २०१३ व पुढे गझलपुराण खंड पहिला अध्याय दुसरा यात भाविकांचे स्वागत आहे.

त्याकाळी 'ण'कारान्त व 'ळ'कारान्त ओळींच्या गझलांना अधिक रसिकाश्रय मिळत असे. रसिकाश्रय या शब्दाची त्या काळातील व्याख्या थोडी भिन्न होती. रसिकांनी स्वतःहून काफिये सुचवणे, रसिकांमध्येच काफिया-सुचवणी उपक्रमाअंतर्गत मारामार्‍या, कागाळ्या, हेवेदावे, मत्सर, क्रोध हे सर्व उफाळून यायचे. कवीला चारचौघांसमोर हतबुद्ध व हतबल करणे यास त्याकाळी रसिकाश्रय मानत असत. रसिकांना थोडे तरी भय वाटावे यासाठी त्याकाळी कवी काही भयावह टोपणनांवे घेऊन वावरत असत. कर्दनकाळ, बाजीराव, पुरुष, खवटुन्निसा अशी काही भयावह नांवे त्या काळी गाजून गेली. या नावांपुढे वैवकु, स्वाती अशी तद्दन तरल व नाजूक नांवे असलेले रसिक खरे तर घाबरणे अपेक्षित असायचे. पण एखाद्या उंदराला मांजराने खेळवावे तसे कर्दनकाळ वगैरेंना हे नाजूक नावांचे रसिक खेळवत असत. यावरून रसिकाश्रय या शब्दाच्या काहीश्या भिन्न अर्थाची साधारण कल्पना यावी.

एक प्रसंग सांगतो. मोठा गंमतीशीर प्रसंग असून वाचकांना त्यात शिकण्यासारखे खूप काही आहे.

कवी कर्दनकाळांच्या एका 'ण'कारान्त गझलेवर स्वाती व वैवकु या हळव्या मनाच्या रसिकांनी एकदा मराठीतील त्या काळी प्रचलीत असलेल्या शब्दांपैकी जवळपास सर्व काफियांची यादी लिहिली. त्यांच्या या भयावह हल्ल्याला कर्दनकाळ नावाच्या ससा-स्वभावी कवीला तोंड देता येणार नाही याची योग्य ती जाणीव होऊन प्रशासन नावाच्या एका निद्रिस्त राक्षसाने कर्दनकाळ यांना 'कारवाई' नावाच्या तुरुंगात लपवून सुरक्षा प्रदान केली. या तुरुंगात हे कर्दनकाळ आधीच दोनचारदा जाऊन आलेले होते व त्यामुळे आतील कैद्यांनी त्यांना पूर्ण ओळखलेले होते. त्या कैद्यांनी कर्दनकाळांचे पाचवे आगमन अमान्य करत त्यांना परत 'महारथी भीष्म' या नावाने मैदानात ढकलले व त्यांचा देह शेरपंजरी पडेपर्यंत त्यांची मजा पाहिली.

तात्पर्य - कोमल स्त्री मनाचे रसिक व लग्नाळू विठ्ठल भाविक असलेले गझलप्रतिसादक यांची दहशत इतकी असे की सर्व यंत्रणाच कोलमडून पडत.

गंभीर समीक्षक रचित इसवीसन २०१३ व पुढे गझलपुराण खंड पहिला अध्याय दुसरा समाप्त'

कळावे

गं स

मायबोलीवरचे लोक इतके वाईट आहेत, त्यांना गझल समजण्याची अक्कल नाही वगैरे सर्व तुम्हाला माहित आहे ना? मग तुमचातरी इथेच गझल पोस्ट करेन असा अट्टहास कशापायी? नाही आवडत इथल्या लोकांना.. तर नका लिहू. मायबोलीबाहेरचे जे लोक सौंदर्यबोध घेऊ शकतात, रसिक आहेत, गझलकळकळ दाखवतात, त्यांच्याचसाठी लिहा. एक ब्लॉग चालू करून तिथे तुम्ही किती हव्या तितक्या गझल प्रकाशित करू शकता. वर कमेंट्स काय प्रसिद्ध करायचे हेदेखील तुम्हीच ठरवू शकता. इथे हांजीबाबा करणारे लोक तुम्हाला पसंद नसतील तर तुम्हीतरी त्यांना "माझी गझल वाचाच" असा हट्ट कशासाठी धरताय? मायबोली हे काही एकच व्यासपीठ नाही व्यक्त होण्यासाठी.

तारे तोडण्याची हद्द झाली!
वर अनाहूत, अनुचित, स्वत:च्या वकुबाला न शोभणारा, बिनबुडाचा सल्ला!
मायबोली हा ओपन फोरम आहे!

कुणीही सोम्यागोम्या/सोमीगोमी इथे गझल प्रकाशित करू शकते, प्रतिसाद लिहू शकते!
मायबोली ही कोणत्याही मायबोलीकराची मक्तेदारी नाही!
इथे गझल टाका, टाकू नका हे कुणीही कुणाला सांगू शकत नाही!
इतक्याच गझला टाका, इतक्या गझला का लिहिता असे निर्बुद्ध प्रश्न हे अप्रशस्त आहेत!
आपल्याला एखाद्या नावचे वावडे आहे तर त्याचा धागा उघडायचाच कशाला, बर उघडला तर निर्बुद्ध प्रश्न व निर्बुद्ध अनाहूत सल्ले आपली पातळी न बघता कशाला द्यायचे! निदान काही लिहिले नसते तर झाकली मूठ म्हणून पितळ उघडे तरी नसते पडले!

व्यक्त व्हायला किती व्यासपीठे आहेत ही बाळबोध माहिती देऊन गझलबालिशपणाही वर दाखवून द्यायचा, म्हणजे हसावे, की, रडावे असा प्रश्न पडत आहे!

तुम्ही वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने इथे ज्येष्ठ आहात, मग तरी तुमचा(च) आयडी इथे तीन चारवेळेला रद्द होऊनही का इथे लिहिता?

हा अजून एक हास्यास्पद मतिमंद प्रश्न ज्याच्याशी प्रश्नकर्त्याचा काडीचा संबंध नाही!

नाही आवडत इथल्या लोकांना.एक बिनबुडाचे दरिद्री अनुमान!

"माझी गझल वाचाच" असा हट्ट कशासाठी धरताय?किती मोठा दरिद्री विनोद हा?
कोण कुणाला वाचा असे म्हणतय? आम्ही फक्त गझला प्रकाशित करतो! ज्याच्या त्याच्या पिंडाप्रमाणे, व वकुबाप्रमाणे जो तो त्याच्याचर झालेल्या संस्कारांनुसार प्रतिसाद देत असतो!

एका व्यक्तीस एखादा शेर जरी पोचला तरी आम्ही गझल इथे प्रकाशित करूच करू!

कुणाला आवडावे , कुणाला खुश करावे, कुणाचे ताल/तोल/मर्जी सांभाळण्यासाठी आम्ही कधीच लिहित नाही!

आमचा कोणताही कळप/कंपू नाही! व कोणत्याही कळपांना/कंपूंना आम्ही भीक घालत नाही!

आमचा आयडी रद्द व्हायला इथलेच टवाळखोर महाभाग कारणीभूत आहेत हे आम्ही जाणतो!
पण अशा क्षूद्र, भ्याड गनिमी काव्याने आम्ही मागे हटणा-यातील
नाही!

गेली गळून काही पाने तरी अम्हाला......
निष्पर्ण बनविण्याची ताकद हवेत नाही.............इति कर्दनकाळ

हांजीबाबांची भलावण करणे पाहिल्यावर राग नव्हे तर कीव आली!

इतर जे कुणी तुमची टवाळी करतात त्यांचे आयडी रद्द होत नाहीत.

कळपांचे/कळपामधील मेंढरांचे आयडी रद्द होत नसतात!

यावरून काय बोध घ्याल तुम्ही?

आम्ही घेतलेला बोध तुमच्या डोक्यावरून जाणारा आहे!

तुमचे स्वतःचे इथे हसे होतंय सतत
हा अजून एक भ्रम आहे तुमचा! अख्खे जग पाहते आहे कोण काय तारे तोडते आहे, कुणाचे हसू होत आहे ते!
प्रतिसादात तोंड उचकटले की प्रतिसाद देणा-याची पोच/पोची जग ओळखते!

तुम्ही इरेला पेटल्यासारखे त्या प्रत्येक टवाळीवरती गझल रचत अजूनच हसे करवून घेताय. यामधून तुम्हाला काय मिळतंय नक्की? दिवसातला किती वेळ तुम्ही मायबोलीवरच्या टवाळखोरांसाठी रचल्या जाणार्‍या गझलेमधे वाया घालवताय याचा कधीतरी विचार करा

मग काय टवाळखोरांची आर्ती म्हणत त्यांना ओवाळत बसायचे?

स्टिच इन टाइम सेव्हज द नाइन! कट टू साइज करणा-यातील आम्ही आहोत!

यामधून तुम्हाला काय मिळतंय नक्की?

जे टवाळखोरांना मिळते ते!

दिवसातला किती वेळ तुम्ही मायबोलीवरच्या टवाळखोरांसाठी रचल्या जाणार्‍या गझलेमधे वाया घालवताय याचा कधीतरी विचार करा

कुणाचा दिनक्रम/अनुक्रम कय असावा हे ज्याचे त्याचे डिस्क्रिशन असते! त्याची काळजी दुस-या कुणी न केलेलीच त्याच्या/तिच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे!

हाच वेळ तुम्हाला चिंतन, साधना आराधना आणि इतर सुंदर अर्थपूर्ण गझला रचण्यासठी वापरता येणार नाही का हे स्वतःलाच विचारून बघा कधीतरी.

आम्ही पेशाने प्राध्यापक आहोत............चिंतन/साधना/आराधना..........हा आमचा स्थायीभाव आहे!
उगाचच ढूढ्ढाचा-याप्रमाणे माशास पोहायला शिकवायचा पोरकटपणा करू नये!

हा आमचा प्रतिसाद वाचल्यावर स्वत:ला मात्र प्रश्न विचारायला विसरू नये! उत्तरे आपल्याच मनास द्यावीत!
असे झाले तर एका प्राध्यापकाच्या वेळेची पदरमोड सार्थकी लागली समजू! नाही तर आहेच पालथ्या घड्यावर पाणी!

गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता असे न होवो इतकीच ईश्वर चरणी प्रार्थना!

********************इति कर्दनकाळ

काय ही रचना, काय ह्या चर्चा<<<<<<<<<<<<

जरा फोड कराल काय? प्रतिसाद फारच आशयघन आहे म्हणून म्हणत आहोत!

या नावांपुढे वैवकु, स्वाती अशी तद्दन तरल व नाजूक नांवे असलेले रसिक खरे तर घाबरणे अपेक्षित असायचे. पण एखाद्या उंदराला मांजराने खेळवावे तसे कर्दनकाळ वगैरेंना हे नाजूक नावांचे रसिक खेळवत असत.

केवढे विनोदी आहात आपण ग. स.?

आहो ज्यांना गझल म्हणजेच पोरखेळ वाटतो, ज्यांचा बाळबोधपणा शब्दशब्दात ओतप्रोत भरलेला जगाला दिसतो, जे कुबड्यांशिवाय व कळपांशिवाय खुरडू देखिल शकत नाहीत, ज्यांना भाटगिरीशिवाय करमतच नाही, अशा माणसांना तुम्ही मांजराचा दर्जा देत आहत वरून उंदराला खेळवणारे मांजर असेही म्हणताय! आहो उंदरालाच काय चिलटांना/झुरळांनाही घाबरणारी ही नावे, कर्दनकाळाच्या पासंगालाही पुरणारी नाहीत!
हे आमचे दुर्दैव की, हे आम्हाला असे लिहावे लागत आहे! नाही तर झाकली मूठ सव्वालाखाची होती!

कवी कर्दनकाळांच्या एका 'ण'कारान्त गझलेवर स्वाती व वैवकु या हळव्या मनाच्या रसिकांनी एकदा मराठीतील त्या काळी प्रचलीत असलेल्या शब्दांपैकी जवळपास सर्व काफियांची यादी लिहिली. त्यांच्या या भयावह हल्ल्याला कर्दनकाळ नावाच्या ससा-स्वभावी कवीला तोंड देता येणार नाही याची योग्य ती जाणीव होऊन प्रशासन नावाच्या एका निद्रिस्त राक्षसाने कर्दनकाळ यांना 'कारवाई' नावाच्या तुरुंगात लपवून सुरक्षा प्रदान केली. या तुरुंगात हे कर्दनकाळ आधीच दोनचारदा जाऊन आलेले होते व त्यामुळे आतील कैद्यांनी त्यांना पूर्ण ओळखलेले होते. त्या कैद्यांनी कर्दनकाळांचे पाचवे आगमन अमान्य करत त्यांना परत 'महारथी भीष्म' या नावाने मैदानात ढकलले व त्यांचा देह शेरपंजरी पडेपर्यंत त्यांची मजा पाहिली.

काफियांची यादी देण्यात कसली आली मर्दुमकी? जर कर्दनकाळांच्या शेरास जवळ जाणारा शेर लिहिला असता तर स्वत: कर्दनलाळांनी त्यांना नावाजले असते!

भयावह हल्ला? चिलटे कधी भयावह हल्ला करत नसतात, व अशा चिलटांना मारायला कर्दनकाळ नावाच्या तोफा व रणगाड्यांची आवश्यकताच नाही! कुणीही सोम्यागोम्या असल्या चिलटांना सहज पिटाळू शकतो!
हळव्या मनाच्या रसिकांनी?????
आहो हे हांजीबाबा फक्त आणि फक्त स्वत:च्या बाबतीत हळवे असतात! कितीही कुंथले तरी शेरांत काही संवेदनशीलता म्हंणून उतरत नाही त्यांच्या!

कर्दनकाळ मैदानातच असतात! पाठ कधीही दाखवत नाहीत व पलायन कधीही करत नाहीत!

कर्दनकाळांची मजा पहाणे/करणे सोम्यागोम्याचे काम नाही!
वेळेतच ते योग्य टोला पद्यातच देतात!

ससा-स्वभावी कवी???????
अगदीच कासवासारखे बोलत आहात आपण!


तोंड देता येणार नाही??????
कर्दनकाळांच्या गझलेची प्रतिसादाची धार आपण पाहिलेली दिसत नाही!

तात्पर्य - कोमल स्त्री मनाचे रसिक व लग्नाळू विठ्ठल भाविक असलेले गझलप्रतिसादक यांची दहशत ?????????

आहो फुंकरीचे देखिल नाहीत ते कर्दनकाळांच्या, त्यांची दहशत?????

काढली त्यांनीच माझ्या आज ओठांची कडी!
बोललो मी काय त्यांची पार वळली बोबडी!!
इति कर्दनकाळ

ज्यांची मुळात अशी बोबडी वळते अशांची दहशत? आहो काहीही हास्यास्पद बरळताय ग.स. आपण!

यंत्रणाच कोलमडून पडत.<<<<<<<आहो हे स्वत:च आडवे तोंडावर पडलेले हांजीबाबा, यंत्रणा कसली डोंबलाची कोलमडणार? त्यांची अदखलपात्र लुडबुड व खुडबुड मात्र इथे कडमडत असते!

ग.स.कृतगझलपुराण खंड पहिला अध्याय दुसरा ....

याची कर्दनकाळ लिखित खरडपट्टी समाप्त! कळावे, कर्दनकाळ.,

Pages