आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे

Submitted by तिलकधारी on 30 April, 2013 - 02:01

आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे
शेपटात शेरबीर माळतात गाढवे

बोध आकलन खुमार कामयाब नाट्यमय
शब्द पाहिजेत ते विटाळतात गाढवे

ना गुरू सभोवती बघून भीड चेपली
गझललाथ झाडुनी पिसाळतात गाढवे

शेर दोन ओळ आणि ग्रंथ या प्रतिक्रिया
फुकट सर्व्हरामुळे उफाळतात गाढवे

इग्नरास्त्र मारल्यास गप्प राहतात ती
तेच तेच अन्यथा उगाळतात गाढवे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

Am happy you are here Tilakdhari. फक्त आता शहाण्याला शब्दाचा मार पुरतो का ते पहायचं. दुसर्‍या आणि चौथ्या शेरातले षट्कार आवडले Lol

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

अनन्यशून्या गरळविशिष्टा
मंतरलेली चरणप्रतिष्ठा
अल्लडढोली धोतरजोडी
चित्तरबद्धा जळमंजिष्ठा

चपळ्शरीरी आटापीटा
अल्फाबीटाग्यामाथीटा
शोधनभंजक वरबालंटा
कुठे कोणासी सचित्रघंटा

अभिजाताची मंत्रसमाधी
थिल्लर घोटा अतिकोलांटी
कांक्षितबुद्धी धरणललाटी
मेंदूक्रांती मेंदूक्रांती

- मेलमधून साभार.
(कवीचं नाव कळालं नाही)

वरील हझल वाचताना थोडीशी मजा वाटली.

“आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे”
हे वाचल्यावर काहीसा वैचारिक गोंधळ झाला होता.
म्हणजे, "आजकाल गाढवं देखील वृत्त पाळतात" असा अर्थ,
की "आजकाल वृत्त पाळणारे गाढव असतात/ठरतात" असा अर्थ ??
सदर वैचारिक गोंधळ काही काळाने मिटला.
------------------------------------------------------------------------------------------------------
मलाही दोन ओळी सुचल्या :

लेउनी मृगेंद्रचर्म रेकतात गाढवे
डुप्लिकेट आयड्यांत हिंडतात गाढवे

या ओळी वाचून कुणाचे मन दुखावेल की काय असा एक विचार मनात आला.
पण दुसर्याच क्षणी लक्षात आलं की मायबोलीमधे डुप्लिकेट आयडी नाहीच्चेत मुळी.
त्यामुळे मन बिन दुखावण्याचा प्रश्नच नाही.

तिलकधारी ड्युआय नाही.

माफ करा. मधेच दिवे गेले. पोस्ट झालं का अर्धवटच ?
मला म्हणायचं होतं तिलकधारी हे ड्युआय नाहीत. तिलकधारी, मी भास्कर, खवचट खान आणि असे अनेक जण ही तर त्या बेफिकीर उपरवाल्याचीच लेकरं नाहीत का ? तुम्ही ड्युआय कि काय म्हणता ते मला समजत नाही. तो फक्त जन्माला घालतो आणि विसरून जातो. फिकीर नसल्यासारखा.

फुकट सर्व्हरामुळे उफाळतात गाढवे

ह्या ओळीवर खरोखर हसलो. Lol अगदी असे.

हजल चांगली आहे. मात्र तिलकधारी ह्या व्यक्तिमत्वाला साजेशी नाही वाटली. Happy

फडतूस, व अतीशय हलकट पोस्ट.

र ला ट लावून बनविलेल्या काव्यप्रकाराला गझल म्हणतात, असे समजणार्‍या व तसे 'शैक्षणिक" लेखांत लिहिणार्‍या इथल्या अनेक तज्ज्ञांपैकी एक हे महोदय दिसताहेत.

"एकमेकांस वाहवा म्हणून आवाज येतात गाढवांचे,
फुकटच्या सर्वरवरती, फुकटात बरळतात गाढवांचे.."

Wink गाढवांचे वर श्लेष आहे Wink

गाढवांना साहित्यिक लाथा मारण्यास सुवर्णसंधी देत आहेत कर्दनकाळ .<<<<<

आत्मप्रीतीतून आलेली असंतुष्ट/अतृप्त आत्म्याची केविलवाणी सल!
हसे करून घेणारा प्रतिसाद !

आत्मप्रीती फक्त तोतयांना असते! जे अनेक नावांची ढाल करून हवेत गोळीबार करत असतात व आपली पाठ आपणच थोपटत बसतात व इतरांची पाठही खाजवत बसतात, हांजीबाबा कुठले!

आत्मप्रीती फक्त तोतयांना असते!<<<<<<

एक विसरताय मिस्टर कर्दनकाळ... आपण देवपूरकरांचे तब्बल ५ वे आयडी आहात हाही तोतया आय डी चा एक प्रकारच !!

आम्ही आमच्या गझलेतून कर्दनकाळ या व्यक्तीच्या वर्तनावर ताशेरे ओढले त्याबद्दल देवपूरकरांनी वाईट वाटून घेणे म्हणजे स्वतःस त्या "मी गझलांचा कर्दनकाळ" मधे पाहण्यासारखेच

आपण मूळात देवपूरकर आहात हे विसरू नये कर्दनकाळ खोटा आहे सतीश देवपूरकर खरा आहे

स्वतःतील सतीश देवपूरकरचा शोध घ्या
कर्दनकाळ् वगैरे बनणे हा टाईम्पास असतो हो फक्त

असो

आम्हास वदायचे ते वदून झाले

पुढे नाही मला सांगायचे
कशाला फारसे सांगू तुला
__________इति वैवकु

Happy

एक विसरताय मिस्टर कर्दनकाळ... आपण देवपूरकरांचे तब्बल ५ वे आयडी आहात

ही सगळी तुझ्यासारख्या तोतयांची कृपा! आम्ही प्रा.सतीश देवपूरकर आहोत हे कधीच अमान्य केलेले नाही!
उलट आम्हाला आमच्या नावाचा अभिमान आहे शिंदे, क्ष.य.ज्ञ. एक नावाचा कुणी तरी ........अशा झुली फक्त भेकडांना घालाव्या लागतात! आमचा मूळ आय.डी. अनेक तोतयांच्या डोळ्यावर येत होता, म्हणून त्यास शहीद व्हावे लागले! असो. आम्ही नाइलाजाने घेतलेल्या आय.डी वर ज्या गझला पोस्ट करतो त्याच गझला इतर अनेक संकेतस्थळांवर आम्ही पोस्ट करतो कारण आम्हाला काही तुझ्यासारखे आतबाहेर करायचे नसते!
तेव्हा तुझ्याशी नाहक आमची तुलना करू नको व तुला न शोभणारा अनाहूत ढुढ्ढाचारी सल्लाही देऊ नकोस!
केवढा घेतोस मोठा घास बाळा!
काय वय अन् काय हा भलताच चाळा!!............इति कर्दनकाळ/प्रा.सतीश देवपूरकर

अवांतर: कर्दनकाळचा अर्थ सांगशील का?

Pages