त्यांचाच जीव घे तू ..

Submitted by अभय आर्वीकर on 21 April, 2013 - 01:09

त्यांचाच जीव घे तू .....

हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता

मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना
त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता

शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता

- गंगाधर मुटे
--------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडली
सर्वच शेर फार मौल्यवान झाले आहेत
यांच्यासाठी तुम्ही मोजत असलेली खर्‍याखुर्‍या आयुष्याची किंमत फार मोठी आहे मुटे सर

खास गंगाधर मुटे शैलीची गझल !!!!!

मस्त

अरविंदजी, वैभवजी, शुभाननजी, बेफिकीरजी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Happy

ही गझलसुद्धा आंतरजालावर तुरळकप्रमाणावर का होईना पण स्वीकारली गेली, ही बाब माझ्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.

बेफिकीरजी, "सस्ता" हा रदीफ़ घेतल्याने गझल फीकी झाली आहे. तरीही मी हा रदीफ़ जाणिवपुर्वक निवडला आहे.

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!
>> सुरेख!!
खोल जखमा?

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

चांगला झालाय हा शेर.

खोल जखमाही फार चान वाटते आहे
मला जरा वेगळाच बदल (अंगच्या आगाऊपणामुळे) सुचतो आहे

फुकटात ठोक जखमा (किरकोळ -ठोक या अर्थाने 'व्होल् -सेल!!' )

Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. Happy

------------------------------------------------
<<< खोल जखमा? >>>
<<< फुकटात ठोक जखमा >>>

हा शेर रचताना योगायोगाने हे दोन्ही पर्याय मी विचारात घेतले होते. प्रेमकाव्यात जखमा हा शब्दच एवढा लोकप्रिय आणि सर्वविदीत आहे की त्यामुळे "खोल जखमा" यातून प्रेमभंगातून होणार्‍या जखमा असा संदेश जाइल अशी मला भिती वाटली. त्यामुळे तो शब्द मी टाळला.
मात्र
ठोक हा शब्द मला वापरायचा होता. त्यासाठी मी पहिल्यांदा लिहिलेली ओळ अशी होती;

घाऊक "सेल" येथे! प्रत्येक घाव सस्ता!!

पण या ओळीतून थेट आशय साधणार नाही, असे काहिसे वाटले, म्हणून ती ओळ

फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!! अशी केली.

ठोक पेक्षा ठोस हा शब्द मला हवा तो आशय अधिक चांगल्यारितीने व्यक्त करतो, असे वाटत आहे.

------------------------------------------

नागरिकांना व्यापारी लुटतात मात्र पुढारी/शासक जनतेचे मायबाप असतात असा सर्वत्र ठाम समज दृढ असताना

घामास सस्ता भाव पुढारी लावतात, मी असे लिहिले तरी यावर कुठेही खळबळ झाली नाही, मला याचे अजूनही आश्चर्य वाटत आहे. कदाचित आता सर्वांना खरेखुरे अर्थशास्त्र कळायला लागले असावे आणि पुस्तकी पांडित्यावरचा विश्वास उडाला असावा.
------------------------------------------
शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना
त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता

हा शेर वाचकांनी स्विकारल्याबद्दल लाख-लाख धन्यवाद.!

असा शेर नाही करणार तर काय करणार? वेळच तशी आलीये.

३ लाख शेतकरी आत्महत्त्या करून मेलेत पण कुण्णाला म्हणून काळजी नाहीये.

पण ज्या दिवशी त्या आत्महत्या करणार्‍याला हे गमक कळेल की, अरे आपण स्वतःच मरणे म्हणजे निष्कारणच जीव गमावणे आहे. पण सोबत अन्यायी व्यवस्थेतल्या एखाद्याला घेऊन मेलो तर हा देश हादरेल.मरणोप्रांत आपला फोटो टीव्हीवर झळकेल, ब्रेकींग न्यूज होईल. पेपरचे रकानेच्या रकाने भरून येईल.... तर त्यास सोबत एखाद्याला घेऊन मरणे केव्हाही परवडेल. Wink
-----------------------------------------
आशयच या गझलेचा गाभा व्हावा म्हणून मी गझलेच्या तमाम सर्व बाह्यसौंदर्याला जाणूनबुजून फिके करण्याचा प्रयोग करून बघितला आहे. याच पठडीतील एक गझल उद्याला पोस्ट करतोय. याविषयी त्याच गझलेवर सविस्तर आणि मनमोकळे पणाने बोलुयात.

नाटकी बोलतात साले!

३ लाख शेतकरी आत्महत्त्या करून मेलेत पण कुण्णाला म्हणून काळजी नाहीये.>> अगदीच राहवले नाही म्हणून लिहितो. त्यांच्या मरणाने कोणाला मत मिळून सत्ता मिळाली तरच काळजी. घेतली जाईल नाहीतर काही होणार नाही. बाकी कविता आणि गझल ह्या मध्ये मोठा भोपळा असल्याने काहीच बोलत नाही.

<< शेवटल्या २-३ शेरात ‘सस्ता’चा अर्थ लागत नाहीये >>

गजलुमियां, त्या शेरांना अगदी परफेक्ट अर्थ आहे. मात्र तुम्हाला हा विषय नवीन किंवा फारसा परिचीत नसल्याने तसे होत असेल कदाचित. शिवाय हे असले जहाल विचार मांडताना बटबटीतपणा येऊ नये, म्हणून जे व्यक्त करायचे आहे ते तर करायचे पण थोड्याशा आडवळणाने, म्हणून मी हा रदिफ निवडला आहे.

<<< त्यांच्या मरणाने कोणाला मत मिळून सत्ता मिळाली तरच काळजी घेतली जाईल नाहीतर काही होणार नाही.>>>

प्रचंड सहमत. Happy

आशयच या गझलेचा गाभा व्हावा म्हणून मी गझलेच्या तमाम सर्व बाह्यसौंदर्याला जाणूनबुजून फिके करण्याचा प्रयोग करून बघितला आहे. याच पठडीतील एक गझल आज पोस्ट केलीय. याविषयी त्याच गझलेवर सविस्तर आणि मनमोकळे पणाने बोलायला आवडेल.

नाटकी बोलतात साले!

लोकसत्ता बातमी
दिनांक १९/१०/२०१२

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक ऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक ऱ्यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे.
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक ऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

--------------------------------------------------------------------
आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो.

त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो.
---------------------------------------------------------------------