मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी मी ही १५ हजार घालणार नाहिच्चे.. Sad सध्या सॅमसंग मोन्टे आहे माझ्याकडे.
साडेतीन वर्ष इमानदारीत वापरलाय, इतका की त्याच्यावरचं स्क्रॅचगार्ड सुद्धा निघालेलं नाहिये आजून.

दक्षे, मग तू स्क्रॅचगार्ड काढून अजून साडेतीन वर्ष का वापरत नाहीस तो फोन ?

फिचर्सवरुन फोन शोधण्यासाठी लिन्क

http://www.gsmarena.com/search.php3

५००० च्या रेन्जमध्ये कार्बन http://www.gsmarena.com/karbonn_a6-5380.php

सँमसंग मधे पण पाच ते दहा हजारात मिळतील अशी माँडेल्स आहेत ना
ज्यामधे व्हाँटस अप आणि नेट असेल त्यात

फोन, चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा, स्टायलस (चित्रे काढणे, नोटस स्क्रिबल करून ठेवणे इत्यादीसाठी), माझे चार्टस आणि रेफ फोटोज बघण्यासाठी इनफ मोठा स्क्रीन पण फोन म्हणून अति बल्कीही नाही, HDMI केबल घेतल्यावर प्रोजेक्टरला कनेक्ट करता येणे अश्या सगळ्या फिचर्ससाठी मी आज नोट २ घेतला.

इथल्या बर्‍याच प्रतिसादांचा खूप चांगला उपयोग झाला. धन्स लोकहो.

हो मला हवे होते ते फिचर्स खूप स्पेसिफिक होते आणि जे काय घ्यायचं त्यात रिक्वायरमेंटस कॉम्प्रोमाइझ करण्यात अर्थ नव्हता. तसे करायचे तर काहीच न घेणे हे जास्त सयुक्तिक ठरले असते.
तस्मात घेतला नोट २.

नोकिआ ल्युमिआ बद्दल काय मत लोक्स?? मी घ्यायच्या विचारात आहे. मॉडेल बहुधा ५१०. तसेच भावाने एचटीसी चा घे अस?ं सुचवलय...काय करू??

नी कितीला पडला? मला पहिल्यापासून त्या फोनने भुरळ घातली आहे. पण इतका खिसा ढिल्ला करावा हे जरा जड जात होतं.
पण खरंच खूप अभिनंदन. तुला मस्त उपयोग होईल त्याचा. आर्टिस्ट लोकांचा मोबाईल आहे तो.

टोके नोकिया नको घेऊ.. माझ्या एका बसमेट कडे आहे ल्युमिया.. तो म्हणाला बरा आहे, इतका काही खास नाही. सध्या मायक्रोमॅक्स आणि सॅमसंग ने मार्केट खाल्लेलं आहे.

दक्षे फीचर्स बरे वाटताहेत, आणि माझा नोकिआबाबत चांगला अनुभव आहे, दीराकडे सॅमसंग ड्युओस आहे, पण हँग होतो सारखा.

मला १० हजारात फोन-मेसेज-क्यामेरा-वॉट्सप+ गाणीबिणी मिळेल असा हवाय फोन. इंटर्नेट ऑप्शनल. असेल तर उत्तम, नसेल तरी ठीक.

टोकूरीका, नोकिया ल्युमिआ घेण्यामागे काही विशेष कारण आहे का? नसल्यास शक्यतो अँड्रॉइडचा फोन बघावा.

टोकुरिका, मायक्रोमॅक्स कॅनवास २ उत्तम आहे. या धाग्याच्या मालकाला विचारून बघ. खूप ग्राफिक्स हेवी गेम्स नसतील तर हँग होताना मी तरी पाहिलेला नाहीये. ११००० ला आहे.

वॉव मायक्रोमॅक्स कॅनव्हास टू चे फीचर्स अमेझिंग आहेत Happy लव्ह्ड इट Happy घेऊ का हाच?
एक बाळबोध प्रश्न :व्हॉट्सॅप चालतं का त्यात? (माझ्या सोनी एक्सपीरीया मिनी मध्ये चालत नाही म्हणून विचारते.)

एच्टीसी डिझायर?? >> फिचर्स चांगली वाटताहेत. पण थोडे जास्त पैसे घालून कॅनवास २ घेणे मला तरी आवडेल.

व्हॉट्सॅप चालतं का त्यात? >> पळतं Happy

टीपः मायक्रोमॅक्स फोनबरोबर मेमरी कार्ड देत नाही. ते वेगळे आपल्याला घ्यावे लागते. आधीच्या फोनचे (एसडी)) असेल तर ते पण चालेल.

मला तरी नोकिया लुमिया खूप मस्त वाटतो. विंडोज ८ , ओवि स्टोअर (गाण्यांसाठी) आणि हिअर मॅप्स (फ्री ऑफलाइन जीपीएस) मस्त आहेत. दिसायला तर एक नंबर आहे. जर अँड्रॉइडचे फार अ‍ॅप्स वापरायचे नसतील तर लुमिया खूपच मस्त आहे. माझ्या एका मित्राकडे आहे आणि तो एकदम खूष आहे लुमियावर. मला लुमिया न घेता एक्सपरिया घ्यावा लागला कारण लुमिया मध्ये ड्युएल सीम नाहिये आणि मला ड्युएल सीमच पाहिजे होता.

मेमरी कार्ड का देत नाहीत म्हणे??? :कंबरेवर हात ठेऊन डोळे वटारणारी बाहुली:
अँड्रॉईड फिचर्स वापरायचे नसतील तर ल्युमिआ चांगलाय म्हणजे..

टोके ....................अँड्रोईड फोन घे ......कुठला पण... फक्त त्यात रॅम आणि प्रोसेसर चांगला बघ...

मायक्रोमॅक्स कॅनव्हास २ म्हणजेच ए ११० का? Uhoh
की दोन वेगवेगळी मॉडेल्स आहेत? आणि पुण्यात त्याची किंमत किती पर्यंत जाईल? (दोन्हीची सांगा)
आय अ‍ॅम ऑन फॉर मायक्रोमॅक्स.. सॅमसंग सध्या वापरतेय त्यामुळे काहीतरी नवे ट्राय करावे म्हणतेय. पण पैसे जास्ती खर्च करायचे नाहियेत.

माधव, थँक्स.. आय थिंक मायक्रोमॅक्स कॅनव्हास एच डी १५K सिम्स टू बी कन्व्हिन्सिंग Happy

दक्षिणा, आजच स्नॅपडीलवर बघितला तर १५५०० झालाय तो. दुकानात पण तेवढ्यालाच मिळाला पाहिजे (मुंबईत तरी मिळतोय).

वर फ्लॅप कव्हर, स्क्रॅचगार्ड आणि मेमरी कार्ड (१६ जिबी) असे अंदाजे १२०० - १५०० लागतील.

याचे आणि गॅलेक्सी नोट २ चे काही फिचर्स मिळते जुळते आहेत. कॅमेरे सुद्धा दोन्हीत ८ मेपि चे आहेत.

कॅन्व्हास एचडी....:(
मागच्या महीन्यात या फोनने जीव घेतला माझा...
पुर्ण महीनाभर डोकेफोड करुनही मला मिळाला नाही
आणि मागच्याच महिन्यात हवा होता Sad
तेंव्हा लावाचा झोलो घेतला...इतकाच मस्त आहे...आणि १२ हजाराला...
पण जर घाई नसती तर मी कधीही कॅन्व्हास एचडी प्रेफर केला असता..
आय जस्ट लव्ह दॅट फोन!

कोणालाही तो मोबाईल घ्यायचा असल्यास डोळे झाकुन घ्या(च)
ग्रॅण्डसारखाच आहे पण स्वस्त आहे.. मस्त आहे Happy
ग्रॅण्ड आता बर्‍यापैकी कॉमन झाला Wink

टोक्स बाकी एचटीसी पण मस्त आहे पण आय विल सजेस्ट मामॅच

आणि कोणाचं बजेट ३४ पर्यंत असेल तर गो फॉर सोनी एक्पेरिया झेड
मला जाम आवडलाय तो ही मोबाईल....

काश कोणी मला विचारलं "बोल तुला कुठला मोबाईल गिफ्ट करू?" :स्वप्नात रमलेली बाहुली: Proud

Pages