Submitted by कर्दनकाळ on 17 April, 2013 - 11:24
लाभला ना जरी रुकार तुझा;
वाटतो दागिना नकार तुझा!
तूच ओंकार हे जगास कळे.....
ना कळे मात्र...मी उकार तुझा!
वाट चुकतो मधेच वाटसरू!
भक्त मी हा असा चुकार तुझा!!
हे अहोभाग्य लाभले मजला...
हा मला लागला विकार तुझा!
का भिकारी न वाटणार अता?
आज अवतारही भिकार तुझा!
पाहिला रागही बराच तुझा!
लाभला स्नेहही चिकार तुझा!!
शायरी ऐकवू किती तुजला?
ऐकला मी अता डकार तुझा!
हात देतेस तू मधेच मला!
पाहिला हा नवा प्रकार तुझा!!
*********************कर्दनकाळ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भिकार. डकार. सोडून बाकी सर्व
भिकार. डकार. सोडून बाकी सर्व शेर तुमच्या स्टाईलला एकदम हटके झाले आहेत मला आवडले
त्यातही उकार विकार व चिकार हे जास्त आवडले
सर. क्षमा करा. पण सहज नाही
सर.
क्षमा करा. पण सहज नाही वाटली. मी काही gajhal tutelar नाही. वै.म. समजावे.
तिलकधारी आला आहे. कर्दनकाळा,
तिलकधारी आला आहे.
कर्दनकाळा, उत्तम गझल
निघावेसे वाटत नाही, पण तिलकधारी निघत आहे.
गझल ट्युटलर पण म्हणजे काय
गझल ट्युटलर
पण म्हणजे काय हो विस्मयाजी ?
Kiran - EQ 7th Pass (Marathi Medium)
तिलकधारी निघत आहे.
चल अकेला, चल अकेला चल अकेला
अकेले अकेले कहां जा रहे हो २
हमें साथ ले लो जहां जा रहे हो
जानेवालें जरा होशियार
यहां कि जनता है दोधार
जाते हो जाने जा ना
आखरी सलाम लेते जाना
जानेवाले.....कभी ई ई ई नही आते
अभी ना जाओ छोडकर
के दिल अभी भरा नही
:नारायण पेशवे मोड
:नारायण पेशवे मोड ऑनः
कर्दनकाळ काका गझल वाचली. मला झटकन आवडली म्हणता येत नाही. पण दागिना, प्रकार हे शेर आवडले.
:नापे मोड ऑफः
सर्व रसिकांचे आभार!
सर्व रसिकांचे आभार!
चांगली गझल आहे !
चांगली गझल आहे !
धन्यवाद मुक्तेश्वर!
धन्यवाद मुक्तेश्वर!
पहिले तीन शेर विशेष आवडले...
पहिले तीन शेर विशेष आवडले...
दुसरा-तिसरा मस्त...
दुसरा-तिसरा मस्त...
धन्यवाद सुशांत, शिवम!
धन्यवाद सुशांत, शिवम!
पाहिला रागही बराच तुझा! लाभला
पाहिला रागही बराच तुझा!
लाभला स्नेहही चिकार तुझा
खूप आवडला. खूप सहजता आहे या शेरात.
धन्यवाद प्रसादजी! वृत्ताचे
धन्यवाद प्रसादजी!
वृत्ताचे नाव माहिती असल्यास सांगावे!
लज्जिता वृत्त आहे.
लज्जिता वृत्त आहे.
छान वाटली...
छान वाटली...
धन्यवाद कैलासराव! गझलेबाबत
धन्यवाद कैलासराव! गझलेबाबत काही वदला नाहीत?
धन्यवाद अरविंदराव!
धन्यवाद अरविंदराव!
केली क्षमा! विस्मयाजी!
केली क्षमा! विस्मयाजी!