लाभला ना जरी रुकार तुझा;

Submitted by कर्दनकाळ on 17 April, 2013 - 11:24

लाभला ना जरी रुकार तुझा;
वाटतो दागिना नकार तुझा!

तूच ओंकार हे जगास कळे.....
ना कळे मात्र...मी उकार तुझा!

वाट चुकतो मधेच वाटसरू!
भक्त मी हा असा चुकार तुझा!!

हे अहोभाग्य लाभले मजला...
हा मला लागला विकार तुझा!

का भिकारी न वाटणार अता?
आज अवतारही भिकार तुझा!

पाहिला रागही बराच तुझा!
लाभला स्नेहही चिकार तुझा!!

शायरी ऐकवू किती तुजला?
ऐकला मी अता डकार तुझा!

हात देतेस तू मधेच मला!
पाहिला हा नवा प्रकार तुझा!!

*********************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिकार. डकार. सोडून बाकी सर्व शेर तुमच्या स्टाईलला एकदम हटके झाले आहेत मला आवडले

त्यातही उकार विकार व चिकार हे जास्त आवडले

गझल ट्युटलर Lol
पण म्हणजे काय हो विस्मयाजी ? Uhoh

Kiran - EQ 7th Pass (Marathi Medium)

तिलकधारी निघत आहे. Lol
चल अकेला, चल अकेला चल अकेला

अकेले अकेले कहां जा रहे हो २
हमें साथ ले लो जहां जा रहे हो

जानेवालें जरा होशियार
यहां कि जनता है दोधार

जाते हो जाने जा ना
आखरी सलाम लेते जाना

जानेवाले.....कभी ई ई ई नही आते

अभी ना जाओ छोडकर
के दिल अभी भरा नही

:नारायण पेशवे मोड ऑनः

कर्दनकाळ काका गझल वाचली. मला झटकन आवडली म्हणता येत नाही. पण दागिना, प्रकार हे शेर आवडले.

:नापे मोड ऑफः