मासे २४) पालकं

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 April, 2011 - 06:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकं
५ ते ६ लसुण पाकळ्या ठेचुन
१ ते २ कांदे चिरुन
हिंग, हळद
मसाला १ ते २ चमचे
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण १ ते २ लहान चमचे
सुके खोबरे + कांदा भाजुन केलेले वाटण ४ ते ५ चमचे
तेल, मिठ
गरम मसाला १ चमचा.

क्रमवार पाककृती: 

पालकं साफ करणे हे खुप किचकट काम आहे. पालक ही खडबडीत असतात त्यात रेती चिकटलेली असते. ही पालकं खडबडीत दगडावर मधुन मधुन पाणी टाकुन हाताने घासुन गुळगुळीत करावी लागतात. मग ही पालके चिरुन त्यातील घाण काढून टाकुन चिरुन घ्यावीत.

आता तेलावर लसुण टाकुन कांदा गुलाबी रंगावर तळावा मग त्यात हिंग, आल लसुण पेस्ट, मसाला घालावा. आता पालक घालुन थोड पाणी घालुन शिजवावीत. जर सुकी करायची असतील तर पाणी नाही घातल तरी चालेल. नुसत्या वाफेवर शिजवावीत. मग साधारण १५ ते विस मिनीटांनी शिजली का पाहून त्यात कांदा खोबर वाटण, मिठ, गरम मसाला घालुन थोडे शिजु द्यावे जर रस हवा असेल तर थोडे पाणी टाका. उकळल्यावर गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
५ ते ६ जणांसाठी
अधिक टिपा: 

पालकांच्या दिसण्यावर जाऊ नका. ही पालकं दिसायला ओबड धोबड असली तरी चविला तर छान असतातच शिवाय कॅल्शियम युक्तही असतात. खुबड्यांप्रमाणे समुद्रात दगडांवर चिकटलेली किंवा वळवळताना सापडतात. ही भरपुर घासुन आणि बर्‍याच पाण्यात धुवुन घ्यावीत म्हणजे ह्यात अडकलेली रेती निघुन जाते.

पालकांचा रस्सा मटणाच्या रस्श्याप्रमाणे करतात. पालकांच्या बेसन घालुन वड्याही छान होतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आहेत पालके रेतीने भरलेली
palake.JPG

नशिबाने त्या दिवशी माझी कामवाली उशिरापर्यंत थांबली होती. तिने मस्त दगडावर घासली.
palake1.JPG

ही गुळगुळीत साफ झालेली पालकं
palake2.JPG

हे पालकांचे सुके.
palake3.JPG

..

जागुतै, नविन प्रकार आहे माझ्यासाठी.
इथे "फिलिपिन्स" आणि "चायनिज" लोकं 'दुबई क्रिक' च्या किनार्‍यावर दगडी उचलुन उचलुन कहीतरी शोधत फिरत राहतात. पण, काय आहे ते, कधी जवळुन पाहीलं नव्हतं. आज कळलं, ते या "पालकांचा" शिकार करत फिरत असतात बहुतेक.

तु कुठून हुड्कलेस Happy

ए.भा प्र., नक्की हा प्राणि आहे की मासा ? Sad

विजय Lol

अमी नाही ग. कालव पांढरी असतात आणि हे काळे.

चातक आमच्याइथे हे लोकप्रिय आहेत. म्हणजे ज्यांना माहीत आहेत ते लोक खुप आवडीने खातात. हे मार्केटमधुनच आणले मी.

दिनेशदा, भ्रमर Happy

सिंडरेला हल्ली इथे पण प्लास्टीकच्या पिशवीत वाटे ठेउन विकतात.

विजय चडू कसे असतात ? आमच्याकडे वेगळे नाव असेल किंवा मला माहीत नसेल.

मामी अजुन बरेच आहेत मला माहीत असणारे मासे. पण मला अजुन त्यांचे फोटो घेता नाही आलेत त्यामुळे वेटिंगलिस्टवर आहेत. शिवाय काही मासे सिझनल असतात तेही यायचे आहेत.

लले Happy

जागूले, लगे रहो.

जिकडे मिळत असतील तिकडे नक्की खात जाल्ले असतील हे सगळे प्रकार. नाव वेगवेगळी असतील एव्हढच.

जागू तू अजून एक कलेक्शन बनवून ठेव. माशांचे (खायच्या) फोटो आणि त्यांची (वेगवेगळी) नावं. मत्स्यप्रेमी माबोकरं कमी नाहीयेत. एकाच प्रकाराला वेगवेगळी नावं असतील तरीही समजून येतील आपल्याला.

जागु,
हे मासे दगडावर घासून गुळगुळित करायचे? Uhoh त्यांचे मूळ टेक्श्चर कसे असते? कठिण असतात का हे मासे? आणि शिजायला किती वेळ लागतो?
बाकी तुझ्याकडे किती खजिना आहे ना? समुद्रभाज्या काय, मासे काय..
धन्य आहे तुझी __/\__

ए पण वाचायला जाम मजा येते मला.. Happy

दक्षे अग खरखरीत आणि बुळबूळीत असतात. आधी बुळबुळीत असतात मग घासल्यावर जरा खरखरीत होतात.
शिजायला थोडा वेळच लागतो. साधारण २० मिनीटे तरी.
खजीना कधी आकड्यात सांगता येतो का ग ? Happy

वर्षा मला पण असच वाटत आहे. की आता दक्षीणा आपल्याला करुन खायला घालणार आहे.

जागू.. पालकं.. हा पहिल्यांदाच पाह्यला प्रकार.. आज माझ्याकडे पालक आणलाय म्म मला वाटलं तू काहीतरी पालक घालून फिश ची रेसिपी लिवलीयेस.. Uhoh

दक्षी.. तेरे लिये बीजिन्ग खाऊगल्लीच फिट्ट है Proud
बघ हां जास्त प्रश्न विचारलेस तर नेक्स्ट मासे गटग तुझ्याच कडे..

जागू, खडक पालव म्हणतात तो हाच मासा का? मी खडक पालवच सुक खाल्लं होत पण कर्ली पेक्षाही चविष्ट मासा, पण खरच करली पेक्षा चविष्ट होता. पण तो मास्या सारखा होता हे काहीतरी वेगळ दिसतय.

जागु फोटॉ कुठे मिळणार एक छोटा तुकडा चवी पुरती मिळाला होता, गावी गेलो असताना चुलभावाने स्पेशल म्हणुन खाउ घातला होता. तेंव्हा पासून शोध घेतो आहे.
माबोच्या मत्स्य प्रेमीन्नो मदत करा.. डोक्याला ताण द्या..

सत्यजीत ही पालके माशासारखी नसतात. वरती फोटोत आहेत.
तुम्ही खडक पालव म्हणता त्याला कोळणी खडप्पालू म्हणतात.

सत्यजित मी अजुन खाऊन नाही पाहीला. हे मासे मी मुरुडच्या मासळी बाजारात पाहीले. तिथल्या कोळणीने मला हे नाव सांगितले. तुम्ही म्हणताय चविष्ट लागतो तर आता ह्याचा शोध आमच्या लोकल मार्केट मध्ये घेते.

जागु, कालवं,तिसर्‍या ह्या प्रकारात मोडणाराच हा प्रकार दिसतोय. पालकं नाव वाचून मला मोदकं(माश्याचा प्रकार उकडीचे नव्हेत Wink ) प्रमाणे असेल आसे वाटले पण हे नवीन दिसतेय.आमच्या बाजारात मिळते का ते बघेन.