प्राण!!

Submitted by नंदिनी on 13 April, 2013 - 00:38

काही काही चेहर्‍यांमधेच एक जादू असते. असाच एक जादूभरा चेहरा प्राण यांचा. गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमधे "व्हिलन्"चे काम करत असणारा हा अभिनेता जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितक्याच त्याच्या सहृदयतेसाठीदेखील.

यावर्षीचा चित्रपट्सृष्टीत सर्वात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राण यांना देण्यात आलेला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन.

इथे लिहूया त्यांच्या ४०० हून अधिक असलेल्या चित्रपटांतील आपले काही आवडते क्षण.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहृदयी..नम्र अशी अगणित नायकाची विशेषणे प्रत्यक्ष जीवनात असणारा पहिला खलनायक..त्यांची खलनायकी इतकी प्रसिध्द झाली की लोकांनी स्वतःच्या मुलांची नाव "प्राण" ठेवणे बंद केले Happy

प्राणसाहेबांचे अभिनंदन!
पण हा पुरस्कार इतक्या उशीराच का देतात? निदान घेणार्‍याला त्याचं कौतूक तरी वाटू दे. राज कपूरच्या वेळीही हेच झाले.
प्राणची एक जबरदस्त आठवण जावेद अख्तरने सांगितली आहे - १९७३च्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्यावेळी 'पाकिजा'ला डावलून दुसर्‍याच सिनेमाला 'बेस्ट म्युझिक'चे अवॉर्ड देण्यात आले याचा निषेध म्हणून प्राणने त्याला मिळालेले 'बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्टर' अवॉर्ड नाकारले. 'इथे अन्याय झाला आहे आणि मी माझे अवॉर्ड स्वीकारले तर त्या अन्यायाचे समर्थन होईल' अशी भुमिका त्याने घेतली, आणि ते देखील त्याचा पाकिजा सिनेमाशी कसलाही संबंध नसताना.

`परिचय ' मधली त्यांची व्यक्तीरेखा अतिशय आवडती ! सुरेख भुमिका केली आहे त्यांनी.

प्राण हा अत्यंत आवडता खलनायक असून त्याच्या भूमिका तो इतक्या हुबेहूब वठवतो कि प्रेक्षकांच्या मनात तिरस्कार, भीती या भावना निर्माण झाल्याच पाहिजेत, हाच त्याचा खरा पुरस्कार..

प्राण यांच्या जीवनावर बनी रुबेन ने लिहिलेली बायोग्राफी , "अ‍ॅण्ड प्राण..." इज अ मस्ट रीड

पटकन सापडावं हे पुस्तक म्हणून हा I S B N number 978-93-5029-057-6

हे पुस्तक वाचताना पुन्हा पुन्हा प्राण च्या प्रेमात पडायला होतं..

आता काही आवडलेल्या भूमिका.. मिलन , जिस देश मे गंगा बहती है, मधुमती,छलिया, हाफ टिकट्,कश्मीर की कली, खानदान्,राम और शाम , हटके भूमिकां मधे कालिया, उपकार, परिचय ... बापरे किती किती आणी काय काय मेन्शन करायचं!!!
थोड्याश्या शब्दांत प्राण ची काराकीर्द , आवडलेल्या भूमिका मांडणं अशक्यप्राय गोष्ट आहे माझ्याकरता.. Happy

प्राणचा अजून एक किस्सा- प्रकाश मेहरांनी त्याला जंजीरमधल्या 'शेरखान पठाण'च्या अजरामर भूमिकेसाठी साईन केल्यावर काही दिवसांनी मनोजकुमारने त्याला तशीच पठाणाची भूमिका 'शोर' साठी देऊ केली. त्यावेळी मनोजकुमार एक अत्यंत यशस्वी निर्माता-दिग्दर्शक होता ज्याने प्राणला 'उपकार'मधल्या मलंगचाचासारखी करिअर डिफायनिंग भूमिका दिली होती आणि त्यापुढे प्रकाश मेहरा अगदीच नवोदित. पण प्राणने रोल रिपीट होतो आणि पहिला शब्द मेहरांना दिला आहे या कारणासाठी 'शोर' सोडला!

त्यांची खलनायकी इतकी प्रसिध्द झाली की लोकांनी स्वतःच्या मुलांची नाव "प्राण" ठेवणे बंद केले >> हो. आणि हे खरंदेखील असावं. कारण, प्राण हे नाव इतकं सोपं असून्पण कॉमन नाव नाहीये. Happy

असं म्हणतात की राजेश खन्नाच्या खालोखाल मानधन प्राण घ्यायचे, पण त्याचा नखरा अथवा मिजास त्यांनी कधीच मिरवली नाही...

नर्गिसच्या अदालत मधली प्राण ची भुमिका आवर्जून पहावी अशी आहे. खुप वेगवेगळ्या गेटप मधे आहेत.
कसौटी ( हेमा- अमिताभ ) मजबूर ( परवीन-अमिताभ ) पत्थर के सनम ( मनोजकुमार - वहिदा - मुमताज )
गुमनाम ( मनोजकुमार- नंदा - हेलन ) जंजीर ( अमिताभ - जया ) जंगल मे मंगल ( किरण कुमार - रीना रॉय )..
या माझ्या काही आवडत्या !

प्राण यांची एक अजरामर अदा म्हणजे "हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है"

किशोरचा खट्याळ आवाज आणि प्राणचा मिस्किल चेहरा..

प्राणसाहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन.

काही वेळा हिरोपेक्षा व्हिलनच जास्त भाव खाऊन जातो, तेच प्राण यांचे झाले. अर्थात, अमिताभच्या बरोबरीने गाजलेली भूमिका ( जंजीर) मात्र हिरो आणी त्याचा मित्र दोघांना समान न्याय देणारी होती.

माझ्या मैत्रिणीने हा किस्सा सांगीतला होता. ( मासिकात वाचलेली सत्य घटना)

प्राण एकदा रेसकोर्सवर गेले होते. त्यांच्या पुढच्या रांगेत बसलेल्या माणसाचे पाकिट त्याच्या खिशातुन खाली पडले, ते प्राण यांनी उचलले आणी त्या माणसास योग्य रितीने संबोधुन त्याच्या हवाली केले. तो माणुस प्राण यांना पाहुन हादरलाच, कितीतरी वेळ तो अवाक होऊन त्यांचे निरीक्षण करत होता. शेवटी प्राण यांनीच हसुन स्वतःची ओळख त्याला देऊन ती विचीत्र परिस्थिती दूर केली.

पण त्या मुलाखतीत त्यांचा विषाद लपला नव्हता की त्या माणसाने चक्क त्यांना विचारले की खलनायकाचे काम करुन देखील तुम्ही एवढे प्रामाणिक कसे? त्यांनी त्यावेळेस उत्तर दिले, पण त्यांना त्यावेळी वाईटच वाटले होते की प्रत्यक्ष जीवनात सुद्धा लोक खलनायकांना खलनायकच का समजतात.

प्राणचे अभिनंदन!

कालियामधला अमिताभ व त्याचा एक जबरी शॉट, प्राण अमिताभपुढे स्वतःचा तोरा टिकवून उभा राहिला आहे.
http://www.youtube.com/watch?v=h7bfaCbJxWs

मजबूर, व्हिक्टोरिया नंबर २०३ आणि मधुमती मधल्या भूमिका खास लक्षात राहिल्यात. आणखी एक म्हणजे गुड्डी चित्रपटात : प्राण स्वतः प्राण म्हणून.

खरंतर एखाद्या खलनायकाचा अतोनात राग यावा.. हिच त्याच्या अभिनयाला पावती. लहानपणी संध्याकाळे जुने चित्रपट लागत, ते एकत्र बसून पाहताना बायका प्राण ला भयंकर शिव्या देऊन त्याच्या नावाने बोटं मोडायच्या.. अगदी मुडदा बसवला याचा वगैरे... तेव्हा काय कळतंय अभिनय कशाशी खातात ते? पुढे पुढे कळू लागलं तसं हिरोपेक्षा जास्त खलनायक अधिक आवडू लागले त्यात प्राण आणि अजित हे विशेष. बघण्याची विशिष्ट पद्धत, ओठात चिरूट पकडण्याची पद्धत, हॅट्/मिशीची स्टाईल, हातात छोटीशी काठी.. जुन्या काळचे खलनायक हे खरे खलनायक. Happy

"मालिक के सामने आंख निचे करके बात कर बदतमीज." मधली मग्रुरी असो किंवा "फिर ना कहना मायकेल दारु पिके दंगा करता है." मधून फक्त डोळ्यांमधून दारू प्यायलेली दाखवणं असो सगळंच ग्रेट.
अभिनंदन प्राण साहेब!!!!!

प्राण - एक "सभ्य" खलनायक ! त्यान्चा खलनायक दुष्ट वाटायचा, पण विकॄत / हिणकस नाही... काय दरारा होता तो !!

टॉय स्टोरी - २ मध्ये एक वाक्य आहे - falling with style. थोडे बदलून ते वाक्य प्राणसाहेबांना तंतोतंत लागू होते - villain with grace.

त्यांचा खलनायक मला आवडतो कारण तो पूर्ण काळा कधीच नसतो.

प्राणचा अभिनय मला कायम जरा स्टायलाइज्ड वाटायचा. त्याच्याबद्दल खास आवडनावड अशी कधी जाणवली नव्हती. पण नवीन डॉन बघताना 'मैं तुझसे इतनी नफरत नहीं करता जितनी अपने बच्चोंसे मुहब्बत करता हूँ' हा डायलॉग अर्जुन रामपालच्या तोंडून ऐकला आणि प्राणची थोरवी एकदमच पटली मला. Happy

स्टायलिश व्हिलन. अभिनंदन, प्राणसाब. Happy

'बर्खुर्दार' प्राण साहेब गेले. जाणारच होते. त्यांची अवस्था पाहता जायलाही हवे होते. जाताना आयुष्याचा तुकडा तुटून पडावा असे वाटले. लहानपणापासून मी त्यांचा प्रचन्ड फॅन्.एखाद्या चित्रपटात एखाद्या मिनिटाचा रोल असला तरी तो मी काय वाट्टेल ते करून पहात असे. त्याकाळी पिक्चरची तिकीटे काढणे एक 'युद्ध 'च असे. मारामार्‍या, खरचटणे, ब्लॅक, लाईनी लावणे काय वाट्टेल ते. इतकी दशके प्राण साहेब आयुष्याचा भाग बनून गेले होते. स्वातीने म्हटल्याप्रमाने त्या काळच्या पद्धतीप्रमाणे 'स्टाईलाइज्ड '' होतेच. कारण बहुसंख्य नट थिएतरमधून आलेले असल्याने त्यांच्यात आणि एकूणच डायलॉगबाजी, स्टाईल यांचाह काळ होता तो. पण वापरले असते तर प्राण साहेब नैसर्गिक अभिनय, तरल परफॉर्मन्सही देऊ शकले असते ...

प्राणसाहेबाना आदरांजली.
मीं राजकपूरच्या खूप जुन्या " आह"मधली प्राणची डॉक्टरची भूमिका पाहिली असल्याने ह्या अत्यंत जातीवंत रुबाबदार अभिनेत्याला व्हीलनच म्हणून पहाणं आयुष्यभर मला खटकतच राहिलं.

व्हिटोरिया नं. २०३ मधले विनोदी प्रसंग छान रंगवले होते प्राण यांनी.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अटल बिहारी वाजपेयींबरोबर देव आनंद बस मधे बसून पाकिस्तानात गेला पण प्राण गेला नाही. कारण तो म्हणत असे, "ज्या लोकांनी आम्हाला आमच्याच घरातून हुसकावून लावले तिथे मी परत जाणार नाही."

And Pran या त्यांच्या चरित्रात हे वाचून प्राणसाहेबांविषयी आदर प्रचंड वाढला होता.

परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो ही प्रार्थना.

खलनायक हा जुन्या सिनेमांचा प्राण होता. त्याशिवाय कथा पुढेच सरकू शकत नव्हती. त्या वेळी चारचौघांसारखा वाटणारा आणि पाहताक्षणीच न आवडणारा माणूस सिनेमाचा प्राण बनून आला.

प्राण यांच्या खलनायकी कारकिर्दीबद्दल सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं. एक चरित्र अभिनेते म्हणून ओळख होती. घरात सर्वात लहान काका सिनेमा पहायचा. त्याने जंजीर पुन्हा आल्यावर दाखवतो असं आश्वासन दिलं होतं. कुठल्या थेटरात पाहीला ते आठवत नाही पण शेरखानवाला प्राण भलताच आवडला, लक्षात राहीला. मग टीव्हीवर प्राणची भूमिका असलेले सिनेमे पाहताना हटकून त्याच्याकडे लक्ष जायचं. जुन्या सिनेमात तो व्हिलनगिरी करताना दिसायचा. मधूमती मधली भूमिका अजून लक्षात आहे. जुनी पिढी प्राण आला कि "आला" असा सहजोद्गार काढताना पाहून गंमत वाटायची.

प्रत्येक सिनेमात वेगळी लकब ही प्राण यांची शैली लोकप्रिय होती. जरासा थिएट्रिकल वावर वाटायचा. पण खलनायकाला न आवडलेली गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी निविवाद. आता हा खुन्नस काढणार ही खूणगाठ प्रेक्षक मनाशी बांधत असे. जयंत, अमजद खान यांच्यासारखं उरात धडकी भरवणारं व्यक्तीमत्त्व त्यांच्याकडे नव्हतं. पण बोलक्या डोळ्यांचा, खाली मान करून सिगरेट शिलगावत असताना चेहरा वर आणत सूक्ष्म छटा दाखवण्याच्या प्राण यांच्या कौशल्याला तोड नाही. कॅमे-याचं उत्तम ज्ञान असलेले राजेश खन्नासारखे काही मोजके अभिनेते होते त्यात प्राण यांचा ही समावेश होतो. कॅमे-याचा पुरेपूर वापर करताना कुठल्या कोनातून कुठला भाव दाखवायचा याचं भान विलक्षणच म्हणावं लागेल. अशा गोष्टींतून त्यांचा खलनायक उभा राहीला तसाच उप नायक किंवा चरित्र अभिनेताही. खलनायकी करताना ज्या डोळ्यात नकारात्मक भावना उमटायच्या त्याच डोळ्यांत चरित्र भूमिका करतांना माया, जिव्हाळा, काळजी उत्कटनेने उमटायच्या. प्राण यांचा अगदी न चाललेला सिनेमा पाहिला तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल ती म्हणजे त्या त्या भूमिकेतला त्यांचा उत्कट अभिनय ! कालीचरण मधला गोलू गवाह असो कि आणखी कुठलीही भूमिका. प्राण यांच्या स्पर्शाने ते पात्र अतिशय महत्वाचं वाटू लागायचं आणि मग सुभाष घई सारख्या नामचीन दिग्दर्शकालाही खास प्राण यांच्यासाठी एखादा भावखाऊ हाणामारीचा सीन टाकावा लागत असे.

उपकार मधलं राम ने हर युग मे जनम लिया है, लेकिन लक्ष्मण फिर पैदा नही हुआ.. हे वाक्यं प्राण यांनी जीव ओतून म्हटलंय. संपूर्ण नाटकी ढंगातलं आणि भावखाऊ वाक्यं दुस-या कुणी म्हटलं असतं तर आज ते हास्यास्पद वाटलं असतं. पण चेह-यावरची प्रत्येक रेष बोलत असलेला प्राणचा मुद्राभिनय आणि डोळ्यात गोळा झालेले व्याकुळतेचे भाव यामुळं आजही ते खटकत नाही. एखादी वाइट बातमी समजल्यावर दोन्ही डोळे मिटून घेण्याची अदा (आठवा जंजीर ) देखील नाटकी असूनही प्राण यांच्या बाबतीत सुसह्य वाटणारी.

त्या त्या भूमिकेत विरघळून गेलेला अभिनेता असं प्राण यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं. स्वाती आंबोळे, रॉबीनहूड यांच्या पोस्टस आवडल्या.

या अभिनेत्याला विनम्र श्रद्धांजली !

जुन्या पिढीतल्या कन्हैयाला, जीवन, के.एन.सिंग यांच्या तुलनेत प्राण नक्कीच खूप स्टाइलिश होता. वेळीच चरित्र भूमिकांकडे वळल्याने त्याच्या अभिनयात रेन्जही आली.

मला बॉबीमधला एक सीन आठवतो. ऋषी कपूर काश्मिरमधून नाचत-बागडत घरी आलेला असतो आणि प्राण-अंबिका सोनी भांडत असतात. ऋषी कपूर निरागसपणे सांगतो वहां का मौसम बडा अच्छा था. आणि त्यावर प्राण त्याची ती टिपिकल भुवई उंचावून बोलण्याची एक्स्प्रेशन देत गरजतो- और यहा आग लगी हूइ है. ऋषीकपूर अक्षरशः भिजलेल्या कोकरासारखा दिसतो प्राणसमोर. Proud

प्राणची एक्स्प्रेशन्स आणि संवाद म्हणण्याची लकब खास होती. मात्र मला त्यांच्या विनोदी भूमिका नाही आवडल्या. व्हिक्टोरिया नं. २०३ मधे वगैरे. कधी कधी सिक्स्टीजमधल्या हिंदी व्हिलनना काही विनोदी लकबी देत. प्राण त्यात कम्फर्टेबल नसे.

आत्ता जाणवतय की सिक्स्टीजच्या गोल्डन एराच्या काळातल्या मला आवडणार्‍या प्रत्येक फिल्ममधे प्राण किती महत्वाचा घटक होता. त्या प्रत्येक फिल्मचा विचार केला की त्यातली प्राणची भूमिकाही जशीच्या तशी आठवतेय. इतकी वर्षं कधी त्याबद्दल वेगळा विचारच केला नव्हता.

श्रद्धांजली प्राणसाहेब!

Pages