Submitted by समीर चव्हाण on 2 April, 2013 - 07:23
संशयाचं भूत वसकन अंगावर येताना,
चार चिमुकले जीव भेदरून जाताना
पाहिलयं मी.
तशी जुनीच आठवण
काल-परवासारखी डोळ्यांपुढे तरळताना,
पाहतोय मी
संशयाचं भूत वसकन अंगावर येताना...
आम्ही मोठे झालो, नावारुपाला आलो
आतातरी बोलशील, सगळी भडास काढशील
ह्या आशेवर कधी विचारलं नाही
किंबहुना आम्हाला बोलवलं नाही.
तू बोलली नाहीस, आम्हाला बोलवलं नाही,
तू पिरगळली गेलीस, मोडली नाहीस
आम्ही भेदरत गेलो, गुरगुरलो नाही.
जास्तीतजास्त काळीज पिळवटुन रडलो असेल
दोनेक मिनिटं
तुलासुध्दा बरं वाटलं असेल
दोनेक मिनिटंच.
आता परिस्थिती सुधरलीय,
आणि त्याचं डोकंही.
मात्र कधीकधी पाहतो त्या भूताच्या नजरा
वसकन अंगावर येताना,
आमचा ससेमिरा चुकवत का होईना.
तुला थोडेसे निर्ढावलेले,
आणि प्रसंगी तोंडाला तोंड देताना पाहून
होणारा आंनद लपवू कसा!
समीर चव्हाण
(पूर्वप्रकाशित, ऐलपैल)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
धन्यवाद, आनंद.
धन्यवाद, आनंद.
काही विशिष्ट कारणाने होत
काही विशिष्ट कारणाने होत असलेली मनाची घुसमट आणि तशातही काही गोष्टींमुळे मिळणारा दिलासा हा आशय चांगला व्यक्त झालाय.
दु:खद कोंडमारा कधीकधी
उत्तम कविता.
उत्तम कविता.
मस्त.. आवडली कविता.
मस्त.. आवडली कविता.
धन्यवाद, मित्रांनो. समीर
धन्यवाद, मित्रांनो.
समीर
समजली नाही की कशावर आहे
समजली नाही की कशावर आहे वगैरे
शायद मी मन लावून वाचली नसेल त्यामुळेच
वैभवः समजली नाही की कशावर आहे
वैभवः
समजली नाही की कशावर आहे वगैरे
गावातल्या वा लोअर-क्लास कुटुंबांत स्त्रीच्या चरित्रावर संशय घेणे सर्रास घडते.
ह्यात स्त्रीची, पोराबाळांची कशी घुसमट होते, त्यावर ही कविता.
सुदैवाने एक आनंदाची किनार काहींना लाभते, मुलं मोठी झाल्यावर.
प्रभावी आहे.
प्रभावी आहे.
धन्यवाद समीरजी आता थोडीथोडी
धन्यवाद समीरजी आता थोडीथोडी समजू लागली आहे
अजून एकदा वाचून पाहतो