सात वर्ष, तब्बल सात वर्ष ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण काही तासांवर येऊन ठेपाला आहे. आत्ता या क्षणाला मी मुंबई विमानतळावर आहे आणि काही तासात काठमांडु विमानतळावर उतरल्यावर सात वर्ष स्वप्न म्हणुन उराशी बाळगलेल्या माझ्या अविस्मरणीय एव्हरेस्ट बेस कँप ट्रेक ला सुरवात होणार आहे.
२००६ मधे एव्हरेस्ट बेस कँप ट्रेकची कल्पना प्रथम मनात आल्या नंतर ती कल्पना प्रत्यक्षात उतरायला आज २०१३ साल उजाडावे लागले. गेल्या सहा वर्षात २/३ वेळा बेस कँप ट्रेक चा बेत आखला पण या न त्या कारणाने तो बारगळतच होता. या वर्षी तो योग जुळवून आणलाच. मी आणि संदिप (हा माबोकर नाही) असे आम्ही दोघेच या ट्रेकवर निघालो आहोत. (आर्थातच ट्रेकच्या अलिखीत नियमाप्रमाणे टांगारुंनी टांग दिल्या नंतर आम्ही दोघेच उरलो आहोत हा भाग वेगळा). आम्हा दोघांपैकी कोणिही हा ट्रेक आधी केलेला नाही किंवा ज्या व्यक्तीने हा ट्रेक केला आहे अशा कोणत्याही व्यक्तीला आम्ही प्रत्यक्षात भेटलेलो नाही. जी काही माहिती गोळा केली आहे ती सगळी आंतरजालावरुन. मुंबई ते काठमांडु या परतिच्या विमान प्रवासा व्यतिरीक्त कुठेलेही बुकिंग केलेले नाही त्यामुळे हा ट्रेक रोमांचकारी होणार हे तर निश्चित. ही रीस्क नाही का? खरे तर आहे पण तेच या ट्रेक चे प्रमुख आकर्षण आहे असे आम्हाला वाटते. अनोळखी वाटेवर समोर येणार्या अनोळखी संकटांना त्या त्या क्षणाला योग्य वाटेल तसे तोंड देत हा ट्रेक पुर्ण करण्यातच खरं थ्रिल आहे. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणुन काम करतांना मी बर्याच जणांना समुपदेशन करतो. आयुष्यात येणार्या अडचणींना तोंड कसं द्याव ते सांगतो. आनंदाने कसं जगावं हेही सांगत असतो. पण त्याच अडचणींना मला सामोरं जाव लागलं किंवा अचानक संकटं समोर आली तर मी कसा वागेन? काय निर्णय घेईन? हे तपासायचय. दुसर्यांना सल्ला देण सोप्प असतं पण तीच परिस्थीती स्वत: वर ओढावल्यावर निर्णय घेण वेगळ. हे वेगळपण आजमवण्या साठीच हा सगळा खटाटोप. पुर्वी केलेल्या अनेक ट्रेक्स मधुन कटु-गोड आठवणींची शिदोरी जमा झालिच आहे, त्या शिदोरीत या प्रवासाने मोलाची भर पडेल.
एव्हरेस्ट वर चढाई दोन वेगवेगळ्या दिशांनी करता येते. नॉर्थकोल-उत्तर दिशेने म्हणजे तिबेट (चिन) कडुन आणि साऊथकोल-दक्षिण दिशेने म्हणजे नेपाळ कडुन.
त्या मुळे अर्थातच एव्हरेस्ट चे दोन बेस कॅंप आहेत. एक तिबेट मधे आणि एक नेपाळ मधे. उन्हाळ्याच्या दिवसात तिबेट बेसकँप पर्यंत जिपने जाता येते पण तिबेट/चिन सरकारच्या परवानग्या मिळवणे हे एक जिकरीचे काम आहे. आणि नुसतेच जिप मधे बसुन प्रवास कारायाचा म्हणजे तो काही ट्रेक नाही. त्या मानाने नेपाळ सरकारच्या परवानग्या सोईस्कररीत्या मिळतात. त्यामुळे दक्षिण बेसकँप जास्त लोकप्रिय आहे. आम्ही ही हाच करणार आहोत.
इतक्या वर्षांनी योग जुळुन आल्यामुळे खर तर मला हा लुप ट्रेक करायचा होता जेणे करुन संपुर्ण एव्हरेस्ट रिजन कव्हर होईल. जातांना गोक्यो लेक, चोला पास या मार्गाने आणि येतांना पानबोचे, स्यांगबोचे मार्गे परत. त्याला १८ दिवस लागणार होते. पण संदिपला इतके दिवस सुट्टी मिळु न शकल्याने आम्ही आता हा ट्रेक सरळसोट मार्गाने करणार आहोत. त्यामुळे आमचा हा ट्रेक १५ दिवसांचा असेल.
आमच्या ट्रेकची ठरवलेली रुपरेषा:
नकाशा:दिवस १ - मुंबई ते काठमांडु विमान प्रवास. काठमांडु आणि आजुबाजुच्या परीसरात भटकंती.
दिवस २ - काठमांडु ते लुकला विमान प्रवास आणि लुकला ते फकडींग ट्रेक (२६५६ मिटर)
दिवस ३ - फकडींग ते नामचे बाझार ट्रेक (३४५० मिटर)
दिवस ४ - आत्ता पर्यंत आम्ही समुद्र सपाटी पसुन ३४५० मिटरची उंची गाठलेली असेल. सहाजिकच हवा खुप विरळ असणार आणि हवेतिल प्राणवायुचे (ऑक्सिजन) प्रमाणही. इथुन पुढे आणखी उंचावर जाण्या आधी आमच्या शरीराला विरळ हवेची सवय होणे गरजेचे आहे (अॅक्लमटायझेशन) म्हणुन चौथ्या दिवशी नामचे बाझार येथे मुक्काम.
दिवस ५ - नामचे बाझार ते तेंगबोचे ट्रेक (३८६७ मिटर)
दिवस ६ - तेंगबोचे ते डिंगबोचे ट्रेक (४५३० मिटर)
दिवस ७ - आत्ता पर्यंत आम्ही समुद्र सापाटी पासुन ४५३० मिटरची उंची गाठलेली असेल. परत एकदा आणखी विरळ होत जाणार्या हवेची शरीराला सवय (अॅक्लमटायझेशन) व्हावी म्हणुन ७ व्या दिवशी डिंगबोचे येथे मुक्काम.
दिवस ८ - डिंगबोचे ते लोबुचे ट्रेक (४७५० मिटर)
दिवस ९ - लोबुचे ते गोराख शेप ट्रेक (५१८४ मिटर)
दिवस १० - गोराखशेप ते एव्हरेस्ट बेस कँप आणि परत (५४०० मिटर). शक्य झाल्यास कालापथ्थर वर चढाई (५५४५ मिटर)
दिवस ११ - गोराखशेप ते पानबोचे (३९८५ मिटर) (परतीचा प्रवास चालु)
दिवस १२ - पानबोचे ते नामचे बाझार (३४५० मिटर)
दिवस १३ - नामचे बाझार ते लुकला (२८०० मिटर)
दिवस १४ - लुकला ते काठमांडु विमान प्रवास
दिवस १५ - काठमांडु ते मुंबई विमान प्रवास
अर्थातच या रुपरेषेला आम्ही कितपत न्याय देऊ शकलो? आमचा ट्रेक ठरवल्या प्रमाणे पार पडला का? काय काय अडचणी आल्या? काय काय बघितलं? या आणि अशा बर्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ट्रेक पुर्ण झाल्यावरच देऊ शकतो.
चला तर मग मंडळी, आता विमानात बसण्याची वेळ झाली. भेटुच परत १५/२० दिवसात. तेही ट्रेक चा संपुर्ण वृत्तांत आणि भरपुर प्रची सह. तो पर्यंत तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा याच धाग्याच्या प्रतिसादातुन कळवत रहा..... टा टा 
आमच्या ट्रेकचे गुगल अर्थवर बनवलेले चित्रः
प्रचि १:
प्रचि २:
तळ टिप
एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक बद्दल आंतरजालावर बरिच माहिती उपलब्ध आहे. पण ती सगळी साहेबाच्या भाषेत. मराठीत मला तितकीशी माहिती मिळाली नाही. म्हणुनच शक्य होईल तितकी माहीती मायबोली वर उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.
या ट्रेक बद्दल मनात येणार्या सहाजिक प्रशनांची (FAQ) उत्तरे देण्या साठी मी एक स्वतंत्र धागा करणार आहे. त्यात खालिल प्रश्नांचा समावेश असेल. त्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतिल तर जरुर कळवा, ट्रेक दरम्यान मी त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करेन.
१) बेस कँप म्हणजे काय?
२) एव्हरेस्ट बेस कँप ट्रेक करण्यासाठी योग्य काळ कोणता?
३) हा ट्रेक कोण करु शकतं?
४) पासपोर्ट - व्हिसा?
५) गाईड आणि हमाल (पोर्टर) आवश्यक आहे का?
६) प्रत्यक्ष ट्रेक कसा आहे?
७) ट्रेक दरम्यान रहाण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय?
८) प्रसाधनगृह सुविधांबद्दल काय?
९) ट्रेक च्या काळातली दिनचर्या काय होती?
१०) उंचीचा आणि थंडीचा त्रास कसा टाळावा?
११) सोबत काय काय न्यावे?
१२) टेलिफोन सुविधा कश्या आहेत? तिथे आपले सेलफोन चालतात का?
१३) कॅमेरा/लॅपटॉप/टॅबलेट बॅटरी चार्जींगच्या सुविधा.
१४) नेपाळ चे चलन कोणते? भारतिय चलन त्या चलनात बदलुन घेणे आवश्यक आहे का?
१५) संपुर्ण ट्रेक ला किती खर्च आला?
हार्दिक शुभेच्छा. मस्त होणार.
हार्दिक शुभेच्छा. मस्त होणार.
अरे वा.. खूप अभिनंदन!! तुझं
अरे वा.. खूप अभिनंदन!!
तुझं स्वप्न आता लौकरच वास्तव्यात अवतरणार आहे, तुला खूपसार्या शुभेच्छा...
शुभेच्छा!
शुभेच्छा!
खूप सार्या शुभेच्छा!!!
खूप सार्या शुभेच्छा!!!
एक फु.स. : दिनेशदांच्या
एक फु.स. : दिनेशदांच्या थोरल्या बंधूंचे प्रेम इथेच जुळले होते. तेव्हा सांभाळून बरं का! >>>>> गामा त्याचे लग्न झाले आहे...विसरलात का ? आणि परत त्याला द आफ्रिकेला जायचे आहे हे देखील चांगलेच ठाउक आहे
खूप म्हणजे अगदी ढिगाने
खूप म्हणजे अगदी ढिगाने शुभेच्छा.
नीट चाला, मज्जा करा, मोटिव्हेशन टिकवुन ठेवा, तब्येतीची काळजी घ्या. It will be an experience of a lifetime. याचि देही याचि डोळा हिमालय पाहता येण्यासारखे भाग्य नाही.
The journey is the destination.
तुम्हाला खुप खुप
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..
आयुष्यात अस काहीतरी एकदा करायच आहे..
निर्विघ्नपणे ट्रेक पडू दे ही
निर्विघ्नपणे ट्रेक पडू दे ही मनापासून शुभेच्छा!
अरे वा! अभिनंदन आणि ट्रेकसाठी
अरे वा! अभिनंदन आणि ट्रेकसाठी शुभेच्छा!
छान लेख.
खुप खुप शुभेच्छा!!!! काल
खुप खुप शुभेच्छा!!!! काल भेटुन छान वाटलं रे
नीट चाला, मज्जा करा, मोटिव्हेशन टिकवुन ठेवा, तब्येतीची काळजी घ्या. It will be an experience of a lifetime. याचि देही याचि डोळा हिमालय पाहता येण्यासारखे भाग्य नाही. >>>>>रैना, +१
खुप खुप शुभेच्छा! निट
खुप खुप शुभेच्छा! निट सांभाळुन राहा. तुमचा दोघांचाही प्रवास कसलाही त्रास न होता निट होउ देत. पुर्ण वृत्तांत, फोटो लवकर टाका.
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
तु लय खन्ग्री भारी जबरी आहेस
तु लय खन्ग्री भारी जबरी आहेस रे मित्रा
ट्रेकला शुभेच्छा
ट्रेक निर्विघ्न व सुखरूप पार
ट्रेक निर्विघ्न व सुखरूप पार पडो ह्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!
खरे डेअरिंगबाज, जिगरबाज आहात
खरे डेअरिंगबाज, जिगरबाज आहात रे तुम्ही लोक्स.....
खूप खूप हार्दिक शुभेच्छा ......
सहीच. खुप शुभेच्छा!
सहीच. खुप शुभेच्छा!
वा..सहीच! तुमचे उत्तुंग
वा..सहीच!
तुमचे उत्तुंग स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!
खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप शुभेच्छा!
ऑसम ऑपॉर्चुनिटी
ऑसम ऑपॉर्चुनिटी
सर्वप्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
शागं तु जरा हटकेच आहेस रे
शागं तु जरा हटकेच आहेस रे ......खुप धमाल करणार आहेस ....खपु साऱ्या शुभेच्छा आणि केअरला टेक रे......

शुभेच्छा..
शुभेच्छा..
तुला खूप सा-या शुभेच्छा!
तुला खूप सा-या शुभेच्छा! यशस्वी मोहिमेसाठी आणि छान छान अनुभवांसाठी पण!
आमच्यासारख्या लोकांना प्रेरणा मिळो अशी पण (आम्हालाच) शुभेच्छा!
खुप खुप शुभेच्छा.
खुप खुप शुभेच्छा.
मस्तच..............रे
मस्तच..............रे दादा
मनःपूर्वक शुभेच्छा!
आणि काळ्जी घे
मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचा
मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचा ट्रेक सुखरुप पार पडो !
मनःपूर्वक शुभेच्छा ठरवलेल्या
मनःपूर्वक शुभेच्छा ठरवलेल्या रूपरेषेनुसार ट्रेक उत्तम पार पडो .
मी आणि माझी कैलास यात्रेतली
मी आणि माझी कैलास यात्रेतली मैत्रीण नंदिनी, दोघी ह्या ट्रेकची स्वप्न पाहतोय. केव्हा प्रत्यक्षात उतरणार कोणास ठाऊक? आम्ही पुण्यात चौकशी केली, तेव्हा मे-जून आणि आक्टोबर असे दोन सीझन असतात, अस कळल. त्यातला नक्की कुठला सीझन चांगला, ते जाणकार सांगू शकतील का?
शापित गंधर्व आणि त्यांच्या मित्राला मनापासून शुभेच्छा! तुम्हाला निसर्ग, नशीब आणि तब्येत सर्वांची उत्तम साथ लाभेल आणि तुम्ही सुरक्षितपणे परत याल, ही परमेश्वरचरणी प्रार्थना!
याचि देही याचि डोळा हिमालय
याचि देही याचि डोळा हिमालय पाहता येण्यासारखे भाग्य नाही.>>>>>>>>>रैना, +१
एकदा का हिमालय बघितला कि आपण त्याच्या प्रेमातच पडतो.
धाडसी आहात! ऑल द बेस्ट!
धाडसी आहात! ऑल द बेस्ट!
अशा ट्रेकचे नुसते वर्णन
अशा ट्रेकचे नुसते वर्णन वाचायचे, मज्जा नाही. तेथे जाण्याचे थ्रील अनुभवले तर खरी धम्माल.
असो (उसासे टाकणारी बाहुली)
तुर्तासा तुम्ही कराल ते वर्णन व इथे द्याल ते फोटो पाहुन समाधान मिळवणार.
काळजी घ्या. सुखरुप परत या व आम्हाला मेजवानी द्या. ( वृत्तांत व फोटोंची हो
)
Pages