''आणि अचानक लाईट गेले''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 7 April, 2013 - 03:26

मी रात्री अमुक करत होतो.टी.व्ही.वर अमकं-ढमकं लागलं होतं. अमकं -ढमकं ऐन रंगात आलं होतं...

आणि अचानक लाईट गेले .

असं काही वाचलं की माझं डोकंच सणकतं.
अचानक लाईट गेली म्हणजे काय्?लाईट काय पूर्वकल्पना देवून जाते?की शनवारी मी ८.३२ ला जाणार आहे.मग लिहीणारा ''अचानक'' शब्द वगळून लिहेल की रात्री ८.३२ ला टाटा म्हणून लाईट गेली.

आपल्या भाषेच्या अशा काही गमती जमती मजेशीर वाटतात...मात्र काही वेळा काही प्रकार वाचून डोकं ठणकायला लागतं .( मघाशी सणकलं होतं....आता ठणकलं )

उदा...--- घरी आल्या आल्या मी अंगातला शर्ट काढून हँगरला लावला. ( शर्ट अंगात असतो की अंग शर्टात ? )

--- पायात चप्पल घातली . Uhoh
---डोक्यात टोपी घातली . Uhoh

---हे आलं आपलं गाव. ( आपण गावात नाही आलो??? )

किंवा काही शब्दांना विशेषणे अगदी गळूसारखी ( हे आणखी एक विशेषण ) चिकटलेली असतात.

उदा. नियम म्हटला म्हणजे तो ''अलिखित''च असतो.
वर्णनातील आकाश ''निरभ्र''च असतं.
कादंबरीतील तरुणी ''टंच'' च असते.
सासू खाष्ट असते...... यार हा लंगोटीच असतो वगैरे वगैरे...

हम्म्म्म

विचार करकरुन डोकं उठलं ( सणकलं,ठणकलं.....आता उठलं ( ? ) )

म्हटलं आता एक मोट्ठा लेखच लिहीतो यावर...

पीसी ऑन केला.
कीबोर्ड बडवायला सुरुवात केली.

.
.
.
.
.
.
'' आणि अचानक लाईट गेले''.

--डॉ.कैलास गायकवाड

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाईट गेल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आले, की ते लॅपटॉपवर होते, मग त्यांनी तो लेख पोस्टून टाकला.

रच्याकने. मला लाईट 'गेले' म्हटलेले योग्य वाटते. गेली हे चहा पिली सारखं वाटतं. असो.

लाईट गेल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आले, की ते लॅपटॉपवर होते, मग त्यांनी तो लेख पोस्टून टाकला.

Biggrin

लाईट गेले योग्य आहे.

Biggrin

हा नवीनच मुद्दा आहे....आपण बोलताना या गोष्टींचा तेव्हडा विचार नाही करत......नै?
मला आवडलं लिखाण. Happy

लाईट = दिवा असा अर्थ घेतला तर दिवे गेले असे बरोबर आहे
वीज असा घेतला तर गेली असे बरोबर आहे

अक्कलकोट्चे लोक माझी पेन असे म्हणतात पेन=लेखणी असा अर्थ घेतल्यास ते बरोबर वाटते

इंग्लिश शब्दांचा मराठीत वापर हा सखोल अभ्यासाचा विषय आहे

धागा फार सही आहे डॉ.. साहेब अतीशय उपयुक्तही

डॉक साहेबांनी योग्य व्याकरण वापरले आहे.:फिदी:

इथे माझ्याच नात्यातले काही हट्टी लोक चहा पिली ( चहा पिला ऐवजी ), मध खाल्ली ( मध खाल्ला ऐवजी ), लाईट गेली असे शब्द सर्रास वापरतात ( मला गरगरते हे रोज ऐकुन ). आणी चहा नव्हे तर चाय ( बाकी लोकांना नावे ठेवतात, भाषेवरुन ) वापरतात. देवा!

आमचा नोकर म्हणतो बाइसाहेब साहेबांची पाण्याची वॉटर -ब्याग भरली का?
सकाळच मॉर्निंग-वॉक करुन आलो.
मी रायटिंग मधे लिहुन दिल साहेबांना .
मायली ग्र्यंड-मम्मी आली बाइ .ते माय पोरीले मुर्दे [ म्रुदुला] च हाक मारते.साजर लागते का?
अशी आपली लेकुरवाळी भाषा.

मराठीमधे तरी लाईट जातात. Happy कानडीतमिळमधे "करंट जातो" Proud

मंगळूरमधे मी कामवालीला "आज लाईट कधी जाणार" असं कानडीतून विचारल्यावर तिने "लाईट कशाला जाईल? तो तिथेच असतो (स्ट्रीट लॅम्प). पण करंट मात्र पाच वाचता जाईल" असं उत्तर दिलं होतं. Happy

मंगळूरमधे मी कामवालीला "आज लाईट कधी जाणार" असं कानडीतून विचारल्यावर तिने "लाईट कशाला जाईल? तो तिथेच असतो (स्ट्रीट लॅम्प). पण करंट मात्र पाच वाचता जाईल" असं उत्तर दिलं होतं.<<<

Lol Lol

मंगळूरमधे मी कामवालीला "आज लाईट कधी जाणार" असं कानडीतून विचारल्यावर तिने "लाईट कशाला जाईल? तो तिथेच असतो (स्ट्रीट लॅम्प). पण करंट मात्र पाच वाचता जाईल" असं उत्तर दिलं होतं............

काही लोकांकडे नळाच्या पाण्याऐवजी नळच जातात आणि येतात..........

हे सहीच ......... Lol

मला लाईट 'गेले' म्हटलेले योग्य वाटते. >> हो मलाही.

काही गावांकडे 'लाईन' गेली म्हणतात.
लाईट 'गेले' , 'लाईन' गेली Happy

तेलुगु मध्येपण "करंट जातो" (करंट पोइंदी) Happy

मंगळूरमधे मी कामवालीला "आज लाईट कधी जाणार" असं कानडीतून विचारल्यावर तिने "लाईट कशाला जाईल? तो तिथेच असतो (स्ट्रीट लॅम्प). पण करंट मात्र पाच वाचता जाईल" असं उत्तर दिलं होतं. >> असाच काहिसा अनुभव आम्हाला हैद्राबाद मध्ये आला होता.. Happy

आम्ही ब्वा लाईट गेली / लाईट आली असंच म्हणतो.

>> मी पण.. Happy

मूंबईतली मराठी ही इंग्रजोद्भव आहे (इति पु.लं.)

त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जाते तशी लाईट Happy

दचकलो !!

नुकतीच "दादांनी " लाईट जाण्याविषयी दिलेली कंमेंट (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19437088.cms)

ही कमेंट वाचनात आली अन डॉक्टरांचा धागा दिसला ...म्हणलं आता डॉकटर काय लिहिताहेत ...लाईट गेल्यावर .....देव जाणे Wink

Rofl

Biggrin

आम्ही लाईट आली / लाईट गेली असच बोलतो.
ठाण्यात राहायला आल्यावर पहिल्यांदा लाईट गेले / लाईट आले असही लोक बोलतात हे मला कळल.

आणखीन विचित्र म्हणजे. ठाण्यात आल्यावर बरेच जण दादर, चर्चगेट वैगेरेला जायच असल तरी आज मुंबईला चाललोय असच म्हणायचे. मुळचा मुंबईकर असल्याने ते तर जामच विचित्र वाटायच. एकदम गावात आल्यासारख वाटायच.
ठाण्यात गुढीपाडव्याला गोखले रोड वर अस्सल मराठी संस्कृतीमध्ये मिरवणुका निघतात....तो प्रकारसुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलेला. पण तो अनुभव जाम अप्रुप असा वाटलेला.

थोडकयात काय आपण ज्या शहरात राहतो तिथल्या संस्कॄतीचा आपल्या भाषेवरसुद्धा परिणाम होतो.

>>>>>>>गिरीजा...... Rofl

ओये चहा पिली हेच योग्य आहे.... आमच्या बबैंय्या भाषेत तरी यहीच सही है...

लेख बाकी भारीच ह राव.. Wink

बरेचदा मी स्वतः "नाकाला सर्दी झालीय, घशात खोकला झालाय" असे वाक्यप्रचारात आणून घरच्यांच्या शिव्या खात असतो..

Pages