''आणि अचानक लाईट गेले''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 7 April, 2013 - 03:26

मी रात्री अमुक करत होतो.टी.व्ही.वर अमकं-ढमकं लागलं होतं. अमकं -ढमकं ऐन रंगात आलं होतं...

आणि अचानक लाईट गेले .

असं काही वाचलं की माझं डोकंच सणकतं.
अचानक लाईट गेली म्हणजे काय्?लाईट काय पूर्वकल्पना देवून जाते?की शनवारी मी ८.३२ ला जाणार आहे.मग लिहीणारा ''अचानक'' शब्द वगळून लिहेल की रात्री ८.३२ ला टाटा म्हणून लाईट गेली.

आपल्या भाषेच्या अशा काही गमती जमती मजेशीर वाटतात...मात्र काही वेळा काही प्रकार वाचून डोकं ठणकायला लागतं .( मघाशी सणकलं होतं....आता ठणकलं )

उदा...--- घरी आल्या आल्या मी अंगातला शर्ट काढून हँगरला लावला. ( शर्ट अंगात असतो की अंग शर्टात ? )

--- पायात चप्पल घातली . Uhoh
---डोक्यात टोपी घातली . Uhoh

---हे आलं आपलं गाव. ( आपण गावात नाही आलो??? )

किंवा काही शब्दांना विशेषणे अगदी गळूसारखी ( हे आणखी एक विशेषण ) चिकटलेली असतात.

उदा. नियम म्हटला म्हणजे तो ''अलिखित''च असतो.
वर्णनातील आकाश ''निरभ्र''च असतं.
कादंबरीतील तरुणी ''टंच'' च असते.
सासू खाष्ट असते...... यार हा लंगोटीच असतो वगैरे वगैरे...

हम्म्म्म

विचार करकरुन डोकं उठलं ( सणकलं,ठणकलं.....आता उठलं ( ? ) )

म्हटलं आता एक मोट्ठा लेखच लिहीतो यावर...

पीसी ऑन केला.
कीबोर्ड बडवायला सुरुवात केली.

.
.
.
.
.
.
'' आणि अचानक लाईट गेले''.

--डॉ.कैलास गायकवाड

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या एका कानडी मित्राने घसा बसल्याचं वर्णन 'माझा गळा पकडलाय' असं केलं होतं.... :)...मी ही कानडीच आहे पण ...born and brought up in Pune .....त्या मुळे आम्चं म्हराटी थोडं बरं म्हणायचं.....व्है का न्हाई ओ वहिनी साहेब?.... Happy

इब्लिस हे डोक्याला हेडेक झाला असे बरेच लोक म्हणतात. वास्तवीक नुसते हेडेक ( डोक दुखतय/ डोकेदुखी आहे ) म्हणले तरी चालते. पण ज्यांना विंग्लिश बोलले नाही तर समोरच्यावर आपले इंप्रेशन पडले नाही असे वाटते, ते असे अर्धवट विंग्लिश मारतात्.:फिदी:

मध्यंतरी एका मराठी सिरीयलमध्ये एक बाई दुसर्‍या मुलीला सांगते त्या तमकी तमकीचा वेलनेसपणा चांगला नाहीये.:हाहा:

Biggrin

गवतावर..... लाईताभोवती...... दिसणारे किडे....
त्याला ..... ग्रामिण मराठीत..... कधी किटकुल म्हणतात तर कधी पिटकुल.......

Pages