काम, आयुष्य आणि वेळ ह्यांचे योग्य नियोजन

Submitted by पारिजाता on 10 January, 2013 - 04:21

मी कामं लौकर करते पण मला organize करायला अवघड वाटते. एका वेळी खूप गोष्टी अंगावर घ्यायची सवय आहे आणि मला त्या करायला आवडत असतात पण मग organization becomes and issue! विसरणे, procrastinate करणे, काहीतरी dependency असेल तर सोडून देणे, कंटाळा येणे Happy अशा गोष्टी लक्षात आल्यात पण तुम्हाला माहीत असलेले, अनुभवातले, वाचलेले उपाय असतिल तर प्लिज सांगा. इथे ऑफिस आणि personal life दोन्हीसाठी उपयोगी येतील किम्वा general कुठल्याही गोष्टीचे organization करताना फायदा होईल अशा गोष्टी प्लिज शेयर करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅंक्स साक्षी, कवे, गिरीश, _सचिन_, प्रसाद, भरत, सस्मित Happy
>> एकाच वेळी फार जास्त दगडांवर पाय ठेवायची कसरत करत्येस बहुतेक. दगडं कमी कर डोळा मारा फिदीफिदी
चालू केले आहे. मोठेमोठे दगड आहेत. हलत नाहीत. आणि स्वतःच गळ्यात घालून घेतल्यामुळे बुडायची वेळ आली आहे Proud
>> ह्यावेळेस लगेच माबो, थोपु सार्ख्या साइट्स समोर येतात आणि काम तसच रहात.
थोपु बंद केले आहे. पण माबो आत्ता तर चालू केले आहे Uhoh पण addiction नको व्ह्यायला हे बरोबर आहे.
>> Reduce Your Options
होय Happy
सस्मित Lol

स्वयंपाकघरातील मॅनेजमेंटसाठी: http://www.maayboli.com/node/9494

यातल्या बहुतेक टिप्स मी आजही फॉलो करते. त्यामुळे किचनकाम हे आजपर्यंत कधी टेन्शनचे झालेले नाही. एकातासात स्वैपाक हे रोजच जमतं. दिवसातून दोन्ही वेळेला.

बहुतेक बिलं वगैरे नवरा भरतो, माझे क्रेडिट कार्ड, मोबाईल, नेटचे बिल इत्यादि सुद्धा. ते काम त्याच्याकडे आऊटसोर्स केलेले आहे. घरची कामे ठराविक वेळेत पूर्ण व्हायलाच हवीत. ही कामे करत असताना टीव्ही बघणे, गाणी ऐकणे चालू. Happy

नोकरी करत नसल्याने आणि फ्रीलान्सर असल्याने "हे काम वेळेत दिलं नाही तर पुढचं काम मिळणार नाही" अशी डेडलाईन असते त्यामूळे आधी काम मग टीपी. Happy काम करताना अलार्म लावून दहा पंधरा मिनीटाचा टीपी मेंदूला आराम देण्यासाठी... त्याहून जास्त वेळ लावला की स्वतःलाच पनिश करायचं!! एखादं काम वेळेत पूर्ण केलं की कॅडबरी खायची... Happy

स्वयंशिस्तला आयुष्यामधे दुसरा कसलाही पर्याय नाही.

पारिजाता.... फक्त आता जे काही दादाचे सल्ले ताईच्या टिप्स मिळाल्यात.... त्या अंमलात आण....

काही महिन्यांनी "कुणाशी तरी बोलायचंय "त्या सदरातल्या प्रश्नांना तू "ताई" होऊन सल्ले देत असशील.... Proud

थोडक्यात कोणीतरी सूपात तेंव्हा कोणीतरी जात्यात...... Wink

लवकर सल्ले अंमलात आणा......

बेस्ट इज आपणच आपल्या ट्रायल अँड एरर मारत बसायच्या.... Happy

टाईम मॅनेजमेंटवरची काही छान पुस्तके आर्टिकल्स आहेत त्यातल्या थिअरीज फंडे प्रत्यक्ष वापरून पहा (बाबू म्हणाला तसं)

आपले मनोरथ सफल होवो.....!!!

पारे आधी खुप वैताग येतो या शेड्युलचा
तुला माबोची इतकी सवय नाही लागली पण मी ऑलमोस्ट आहारी गेलेले ( काम नव्हतं ना फारसं प्रोजेक्ट मध्ये जुन्या Wink ) नंतर काम सुरू झालं. पण मग रोमात राहू रोमात राहू करत माबो ( स्पेशली गगो) ओपन करायचे. मग कोणी तरी काही तरी भारी पोस्ट टाकली की एकच कमेंट म्हणत लॉगिन करायचे. मग लास्ट कमेंट म्हणता म्हणता काम रहायचं बाजुला.
मग एक दोन वेळा चांगलीच बोलणी बसली तेंव्हा ठरवलं प्लॅनिंग नुसार काम करायचं.एक आठवडा बराचं त्रास झाला. आणि माझ्या फायद्याची एक गोष्ट झाली ती म्हणजे ऑफिसात काही काळ माबो ब्लॉक झालं. माझी सवय सुटली. आता कितीही दंगा चालू असला तरी काम आलं की अपोआप विंडो बंद होते माझ्या कडून Happy
हे फक्त माबोलाच नाही तर प्रत्येक गोष्टीला लागू पडतं. Happy
पुर्वी मित्र सोबत असला की सकाळच्या चहाची वेळ १० मिनिटाची अर्धा तास सहज व्हायची. पण माझ्या टिममधल्या एका मित्राला सांगितल की १० मिनिट झाली की मला मी ओडीसी मध्ये पोहचे पर्यंत कॉल करत रहा. मी रिसिव्ह नाही करणार. आणि आता मग त्या कॉल्स ने मित्रच एवढा इरिटेट होईला लागला. आता पहिल्याच कॉल मध्ये म्हणतो जा बाई तू Proud आता तर टिममेटच्या कॉलची गरज पण पडत नाही :)... १० मिनिटाचा चहा १० मिनिटातच संपतो Happy

अर्थात आपण जे ठरवतो ते केलचं पाहिजे हे आपलं आपण आपल्या मनाशी ठरवून टाकून त्यानुसार वागणं महत्वाचं . तेवढं ठाम आपण असलंच पाहिजे

स्वयंशिस्तला आयुष्यामधे दुसरा कसलाही पर्याय नाही.
>>>>>>>>>>>>>

फ्रेम करून ठेवण्यासारखं वाक्य....!!!!! सोला आने सच.......... (तरी कधी कधी आळसआडब्वा येतोच) Sad

तुला माबोची इतकी सवय नाही लागली पण मी ऑलमोस्ट आहारी गेलेले
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

माऊली, ही टायपो आहे का??? तुला "गेले आहे" असं लिहायचय ना..... लब्बाड Wink

त्याहून जास्त वेळ लावला की स्वतःलाच पनिश करायचं!! एखादं काम वेळेत पूर्ण केलं की कॅडबरी खायची...
>>>>>>>>>>>>>>>>

आयला.. हे भारीच आहे....... कॅडबरी खाने का और एक बहाना मिल गया:स्मितः

थँक्स नंदिनी...... !

आयला.. हे भारीच आहे....... कॅडबरी खाने का और एक बहाना मिल गया:स्मितः

>>
मी पनिशमेंट म्हणुन खाईन कॅडबरी
म्हणजे (अजुन) वजन वाढण्याच्या भितीने पटकन काम पुर्ण करून टाकीन Proud
(हे योगुलीने वाचू नये आणि माझ्या वाटची चॉकलेट्स माझ्यापाशी पोहचवावीत Proud )

अरे डोंट स्वेट द स्मॉल स्ट्फ. किती फायलिन्ग पोस्टिन्ग मेलिन्ग करणार. खरं जीवन कधी जगणार.
जे खरे महत्त्वाचे आहे त्या दिवशी तेच करायचे.

पारिजाता,
खुप महत्वाचा विषय निवडलात तुम्ही ...धन्यवाद !

मला वाटतं आपण बर्‍याच वेळा झपाटल्या प्रमाणे काम करत असतो, तशी आवड असते, तसा स्टमेनाही असतो, अशात आपण खाणं -पिणं देखील कधी कधी विसरतो, हे कामावरील आणि कंपनीवरील प्रेमामुळे निष्ठेमुळे, प्रामाणिकपणामुळे होत असेल, पण यात वेळ कमीवाढतो,मनावरचा ताण ही वाढतो, ते इतर वयक्तिक कामान पुरेसा वेळ न दिल्यामुळे यासाठी कमी काम पण वेळेत करणं,स्वःतासाठी देखील वेळ राखुन ठेवणं हे महत्वांचं वाटतं

मध्यंतरी एक पुस्तक वाचलं होतं..
""गेटिंग थिंग्ज डन"...
त्या लेखकाची वेब्साईट पण आहे....
त्यात काही उप्युक्त टिप्स आहेत..एकदा जरूर नजरेखालून घाला..

मला माबोवर येणं खरच सोडून द्यायचय आहे. बरीच कामं तुंबतात अगदी... Sad

आता जाते तुबंलेली कामं करायला..

पारिजाता
इतकं काम पडलयं पण आता लिहिते.
माझा स्वानुभवः
Expectation Management ही सुध्दा Time Management साठी महत्त्वाची गोष्ट आहे.
मी पण सगळ्या गोष्टी ओढुन घेते आणि त्या highest quality च्या झाल्या पाहिजेत असा माझा अट्टाहास असतो. पण मला एकदा जाणवले की लोकांच्या (म्हणजे ऑफिसमधे मॅनेजर आणि घरी नवरा आणि बाकी मंडळी) एवढ्या अपेक्षा नसतातचं आणि मी उगाच टेन्शन घेते आणि जीव तोडून त्या गोष्टींच्या मागे लागते.
मग म्हटलं ओक्के, सगळं काही होऊ शकतं कधी कधी काही गोष्टींसाठी वेळेनुसार Expectation सेट करायला पाहिजे मग सगळं जमतं! Happy
अजुनही लिहिन थोड्यावेळाने.

पारिजाता
माझ घरातल्या कामाच नियोजन मी अस करते
मला १ आनि ३ रा शनिवार सुट्टी असते...
मग मी घरातली सगळी सटरफटर काम .. जस कपडे आवरण.. पुढ्च्या आठवड्याचे लावुन कपाटात लावुन ठेवण...वाटण,भाज्या निवडण, बिलांच फायलिंग ,आजीने सांगितलेली स्वच्छतेची परत तीच सटरफटर काम ( ह्याला काहीच ऑप्श्न नाहीये Sad ) सकाळी ८ ते ११ ह्यावेळेत उरकुन टाकायची .
आनि हे सगळ करताना एफ.एम चालु ठेवायच..आनि आधी आवडनारा भरपेट नाश्ता करायचा Wink
परीक्षा जवळ असेल तर कंप्लसरी टी.व्ही ,पुस्तक वाचन बंद.. फक्त नोट्स आनि नोटस Sad

अजुन एक मी अनुभवावरुन शिकले आहे.. आपल्याला एखाद काम छान जमत ... किंवा चांगल ,. सोप्या पदधतीने करता येत म्हणुन उगीच स्वतः हुन कोणाच्या मदतीला ऑफीसमधे जाउ नये.. आपण त्याच कामात गुंततो आनि आपली काम बाजुला पडतात... फक्त कौतुकाशिवाय फारस काही पदरी पडत नाही..

अजुन एक मी अनुभवावरुन शिकले आहे.. आपल्याला एखाद काम छान जमत ... किंवा चांगल ,. सोप्या पदधतीने करता येत म्हणुन उगीच स्वतः हुन कोणाच्या मदतीला ऑफीसमधे जाउ नये.. आपण त्याच कामात गुंततो आनि आपली काम बाजुला पडतात... फक्त कौतुकाशिवाय फारस काही पदरी पडत नाही..>>++१११ हो कधि कधि ते आपल्याच अंगावर येते....

मलाही वेळ मॅनेज करायचा आहे. प्रायॉरिटीज सेट करायच्या आहेत. जो छंद / पोटापाण्याचा धंदा आहे त्याकडे दुर्लक्ष होईल अशा अ‍ॅक्टिव्हिटीज कमी किंवा बंद करायच्या आहेत. बघू कसं जमते ते.

मी सध्या ऑनलाईन पर्सनल कॅनबॅन बोर्ड वापरणे चालू केले आहे. सो फार गुड..उपयोग होतोय रोजच्या टास्क्स साठी.. पण लॉन्ग टर्म गोल्ससाठी ट्रॅकिन्ग कसे करावे? कोणाकडे काही आईडिया आहेत का? जसे जिरा टूल मधे एपिक स्टोरी बनवतात तसे काही?

धाग्याचा विषय नेमका लक्षात नाही आला. तरीही ही मेथड अथेना तैंना सांगतोय ती धागाकर्तीला उपयोगी पडतेय का पहावे.

लॉग टर्म गोल साठी प्रोसेसेसचे टप्पे लिहून काढायचे आणि शक्य असेल तर सीपीएम किंवा पर्ट चार्ट बनवायचा. फ्लो चार्ट सुद्धा चालेल. नेमके कशा स्वरूपाचे काम आहे हे लक्षात आले असते तर सांगता आले असते नेमके. प्रोजेक्ट / डिझाईन / बॅच प्रोडक्शन इत्यादी साठी उपयोग होतो. सीपीएम / पर्ट (पी ई आर टी) सर्च दिला तर माहिती मिळेल.

@पारंबीचा आत्मा, धन्यवाद! पर्सनल ग्रोथ ट्रॅक करण्यासाठी.. उदा- सर्टिफिकेशन, ज्यात multiple trainings and then final exam यासाठी टप्पे चेक करायला ऑर नेक्स्ट इयर समजा युरोप टूर प्लॅन करायची असेल तर स्टेप बाय स्टेप (व्हिजा, बुकिन्ग्स etc) मार्क करायला असे काहितरी शोधतेय..सीपीएम किंवा पर्ट चार्ट शोधून बघते फिट होतेय का..
व्हिज्युयल चार्ट्स चा उपयोग होईल असे वाटतेय इन जनरल सगळ्यासाठीच..जसे फ्रिजवर नोट्स लिहिल्या कि डोक्यात राहते काहि आणायचे असेल तर..तसेच काहितरी

Trello वापरून पाहिले आहे का? त्यात व्हिज्युयल कार्ड्स आहेत आणि अगदीच एपिक स्टोरी नसली तरी एक मुख्य काम आणि त्यातली उपकामे आहेत. शिवाय फुकट आहे आणि अ‍ॅप/वेब सगळीकडे चालते.

मी काही दिवस Todoist वापरायचो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जीमेल, आउट्लूक साठी प्लग इन होते त्यामुळे इमेलवरून पाठपुरावा करण्याची कामे सोपी होत असे. पण मधे सवय सुटली ती सुटलीच
माझा व्यक्तीशः अनुभव असा आहे की कुठलीही इलेक्ट्रॉनीक सुविधा वापरायचे लक्षात रहात नाही. त्यामुळे सरळ वही आणि पेन वापरून केलेली यादी जास्त उपयोगी पडते.

माझा व्यक्तीशः अनुभव असा आहे की कुठलीही इलेक्ट्रॉनीक सुविधा वापरायचे लक्षात रहात नाही. त्यामुळे सरळ वही आणि पेन वापरून केलेली यादी जास्त उपयोगी पडते.
>>>
+७८६ सेम हिअर
माझे सकाळचे पहिले काम हेच असते. डायरीत एकाखालोखाल एक नंबर लिहून आजची कामे लिहिणे.
दुपारी संध्याकाळी रात्री ती कामे होतील तशी टिक करणे वा नवीन अ‍ॅड करणे.
रात्रीपर्यंत पेंडींग राहिली तर ती दुसर्‍या दिवशीच्या पानावर लिहून मगच झोपायला जाणे Happy

याचा आणखी एक फायदा म्हणजे कोणी जागेवर आलाच तावातावाने चौकशी करत की माझे काम अजून झाले नाही तर त्याला डायरीतली नोंद दाखवली की तो जरा शांत होतो. खास डायरीत लिहून ठेवलेय आपले काम हे पाहून फरक पडतो, जे कुठल्या अ‍ॅप वा एक्सेल वगैरे मध्ये टाईप केलेले दाखवून नाही होत.

एक महिना , ४ महिने , ८महिने, १वर्ष , ३ वर्ष १० वर्ष यांसाठी ध्येय उद्दिष्ट ठरवणे
एका मोठ्या ध्येयाप्रत जाण्याची ती एक एक पायरी असावी.

आणि मग याच टप्प्यांवर आढावा घेत पुढे जायचे..उद्दिष्टां मधे योग्य ते बदल करत रहायचे.
रोजचा दिनक्रम या दृष्टी ने आखलेला असावा.

@अजय, Trello अ‍ॅप साठी धन्यवाद. सूट होईल असे वाटतेय.

माझा व्यक्तीशः अनुभव असा आहे की कुठलीही इलेक्ट्रॉनीक सुविधा वापरायचे लक्षात रहात नाही. त्यामुळे सरळ वही आणि पेन वापरून केलेली यादी जास्त उपयोगी पडते. -> सध्या ऑफिस साठी तेच यूझ करतेय पण pending कामे परत परत जाऊन चेक करायला लागतात म्हणून नवीन काहितरी शोधतेय. कदाचित मीच नीट ट्रॅक ठेऊ शकत नाहिये.

@पशुपत, अगदी खरे. आयुष्य जरा बेसिक बाबतीत ऑरगनाईझ करावे अशी इच्छा तर आहे, बघुयात कसे काय जमते.

आम्ही ऑफिसमध्ये ट्रेलो वापरतो. एकदम छान आहे. एस्पेशिअली टीम जर लहान साईज असेल तर उत्तम आहे ट्रॅक करायला.

त्यामुळे सरळ वही आणि पेन वापरून केलेली यादी जास्त उपयोगी पडते. -> सध्या ऑफिस साठी तेच यूझ करतेय>>
अथेना , एक्सेल वापरता का ? मी माझ्या पर्सनल नोट्स साठी एक्सेल आणि वन नोट वापरते. मीटिंग्ज ला वगैरे पटकन बघता येत रेफरंसला एक्सेल.

Pages