काम, आयुष्य आणि वेळ ह्यांचे योग्य नियोजन

Submitted by पारिजाता on 10 January, 2013 - 04:21

मी कामं लौकर करते पण मला organize करायला अवघड वाटते. एका वेळी खूप गोष्टी अंगावर घ्यायची सवय आहे आणि मला त्या करायला आवडत असतात पण मग organization becomes and issue! विसरणे, procrastinate करणे, काहीतरी dependency असेल तर सोडून देणे, कंटाळा येणे Happy अशा गोष्टी लक्षात आल्यात पण तुम्हाला माहीत असलेले, अनुभवातले, वाचलेले उपाय असतिल तर प्लिज सांगा. इथे ऑफिस आणि personal life दोन्हीसाठी उपयोगी येतील किम्वा general कुठल्याही गोष्टीचे organization करताना फायदा होईल अशा गोष्टी प्लिज शेयर करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"एका तासात पाच लोकांचा स्वयंपाक ( पोळ्या, भाजी, आमटी, भात, कोशींबीर, ताक) करुन, गाव भटकायला कसे जावे " हे शिकवायचा क्लास काढावा म्हणतेय....

मोकिमी, तुझं प्रोफेशनल जॉब प्रोफाईल काय आहे नक्की? तु जे फंडे लिहिले आहेत, मी एग्झॅटली तेच करते. माझ्या कामाशी साधर्म्य वाटतंय.

प्रोफेशनल आयुष्यात बर्‍याच लोकांना ऑफिस मेल आयडीवर आलेले मेल दिवसेंदिवस तसेच ठेवलेले पाहिले आहे मी. Sad त्यामुळे आपण कशाचा रेफरन्स द्यायला जावं तर हे लोक तो मेल शोधण्यात पुष्कळ वेळ खर्च करतात. Sad मग मीच सांगते, की थांबा मी तो मेल तुम्हाला परत फॉरवर्ड करते. मी माझ्या डॅस्क वर परत येऊन त्यांना हवा तो मेल पाठवून त्यांच्या डेस्क वर परत येईपर्यंतही हे बापडे त्यांचा इनबॉक्स च धुंडाळत राहतात. स्वतःबरोबरच दुसर्‍याच्या वेळेचाही अनादर! Sad

माझ्या इनबॉक्स मध्ये आलेले मेल लगच्या लगेच सॉर्ट करून आऊटलूक मध्ये मीच बनवलेल्या योग्य त्या फोल्डर मध्ये मी टाकलेले असतात. जेणेकरून एका प्रोजेक्ट शी एका विषया/मॉड्युलशी रीलीव्हट मेल्स एकाच ठिकाणी मिळतील. मी सेंड केलेले मेल्स जे बाय डीफॉल्ट सेंट आयटम्स मध्ये जातात, त्यांचीही मी लगच्या लगेच त्या त्या फोल्डर मध्ये रवानगी करते. जेणेकरून एकाच विषयाशी संबंधित सर्व मेल्स तारखेनुसार उलट्-सुलट अरेंज करून हवा तो डेटा/ मेल/ रेफरन्स मिळवायला अडचण पडत नाही. वेळही वाया जात नाही.

तीच बाबा हार्ड डिस्क ची ही. बर्‍याच जणांना मेल मधून डाऊनलोड केलेल्या अटॅचमेंट्स, एखाद्या अप्लिकेशन मधून डाऊनलोड केलेले रीपोर्ट्स इ. डेस्कटॉप वर सेव्ह करायची वाईट खोड असते. एक तर सी ड्राईव्ह अफेक्ट होतो ते वेगळेच. पण हवे तेव्हा हव्या त्या गोष्टी अनऑर्गनाईज्ड स्वरुपात असल्याने चटदिशी सापडतनही नाहीत. योग्य त्या फोल्डर मध्ये योग्य तो डेटा ही सवय पहिल्यापासूनच अंगी बाणवायला हवी.

>> चिमण माहिति आहे रे. पण.. अरेरे

माहिती आहे? कठीण आहे तुझं! तुला ते तंत्र वापरायची हिंमत नाहीये का मग? तसं असेल तर इथे लोक सांगितील ते ही तुला आचरणात आणता येणार नाहीये. उगाच लोकांचा वेळ तरी कशाला फुकट घालवतेस?

मोकिमी, तुझं प्रोफेशनल जॉब प्रोफाईल काय आहे नक्की? तु जे फंडे लिहिले आहेत, मी एग्झॅटली तेच करते. माझ्या कामाशी साधर्म्य वाटतंय.>>>>>

माझं प्रोफाईल वाच ना समजेल मी कोणत्या घरी भांडी घासते ते!!!!!

पारिजाता...

आता आम्ही जे जे लिहिलय त्या प्रमाणे एक आठवडा वागायचं... कंटाळा करायचा नाही... रागवायचं नाही... लिस्ट करुन प्रायॉरीटी नीट पाळायच्या... आणि एक आठवड्याने इथे स्वतःचा अनुभव लिहायचा!!!!!

शहाणी की नाही तु!!!!!

>> तुला ते तंत्र वापरायची हिंमत नाहीये का मग?
हिमतीचं काय Uhoh effectively वापरता येत नाहीये.
>> तसं असेल तर इथे लोक सांगितील ते ही तुला आचरणात आणता येणार नाहीये. उगाच लोकांचा वेळ तरी कशाला फुकट घालवतेस?
अरे प्रयत्न करते आहे आणि अगदी नाहीच जमलं तर दुसर्‍या कुणाला तरी उपयोगी पडेलच की.. का आधी याच्यावर कुठं चर्चा झाली असून खास माझ्यासाठी पुन्हा सगळा त्रास घ्यावा लागतोय?
मी पूर्वी करायचे बर्‍यापैकी organization पण आता घोळ होतात म्हणून हे genuinely विचारलं आहे रे बाबा.

पारिजाता,

अगं, तुम आगे बढो! हम तुम्हारे साथ है. तुम्हे दवा की नही दुवा और एक ट्रिगर की जरूरत है! घाबरू नको आम्ही माबोकर ट्रिगर देण्यात वाकबगार आहोत. Happy

एक आठवड्याने इथे स्वतःचा अनुभव लिहायचा!!!!! >>> +१

>> आता आम्ही जे जे लिहिलय त्या प्रमाणे एक आठवडा वागायचं... कंटाळा करायचा नाही... रागवायचं नाही... लिस्ट करुन प्रायॉरीटी नीट पाळायच्या... आणि एक आठवड्याने इथे स्वतःचा अनुभव लिहायचा!!!!!

नक्की Happy
खरंच गं मीरा खूप महत्वाचं लिहीलंत तुम्ही सगळ्या लोकांनी. माहीत असलेले फन्डे पण revise झाले. सल्ल्ले, समजावणं, चेष्टा, फटके Wink सगळं मिळालं त्यामुळं माझ्यातला काही वेळापुरता नाठाळ झालेला विद्यार्थी परत अभ्यासाला लागतोय का ते बघते आता. Happy
>> शहाणी की नाही तु!!!!!
ते थोड्या दिवसांनी ठरेल. तुम्हीच ठरवाल म्हन्जे Happy

पारिजाता,
मला उपयोगी ठरलेल्या गोष्टी :
१.प्रायॉरिटीज ठरवणे.
बर्याचदा आपल्याला आवडणारया अनेक गोष्टी सुरू करतो आपण, पण त्यातलीही महत्वाची आणि सर्वात आधी पूर्ण झाली पाहिजे अशी गोष्ट कोणती आहे ते ठरवून ती आधी पूर्ण करणे.
२. काही गोष्टी खूप कंटाळवाण्या पण अपरिहार्य असतात, आज ना उद्या त्या कराव्याच लागणार आहेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे करणे.
आणि एक आहे, सर्वात महत्वाची गोष्ट,
जर खरच कंटाळा आला असेल तर एखादी एका दिवसाची का होईना family trip काढावी. बर्याचदा all we need is just change!! कंटाळा लगेच छूमंतर होऊन जाईल आणि तुम्हाला मिळालेली सकारात्मक उर्जा तुमच्या कामांसाठी उपयोगात येईल Happy शुभेच्छा Happy

वन स्टेप अ‍ॅट अ टाईम - हा मंत्र जप पारे

जमेल तुलाही

एकाच वेळी फार जास्त दगडांवर पाय ठेवायची कसरत करत्येस बहुतेक. दगडं कमी कर Wink Proud जोक्स अपार्ट छोटी टार्गेट्स, नीट न्याय देता येतील इतकीच कामे एकावेळी हातात घेता येतात का बघ

आणि अधून मधून झाला सगळा पसारा तर टेक इट इझी पॉलिसी Proud एक एक करुन आवरायला घ्यायचा. एकदम सगळं साचलय म्हणून तुला वाटतय तू नीट ऑर्गनाईझ करु शकत नाहीयेस म्हणून मग त्यात फायनान्शिअल गोष्टीत लक्ष देत नाहीयेस ह्याची भर पडून अधीकच अपराधी/ श्या अशी कशी मी टाईप वाटायला लागलय. तर मस्त रहा खुष रहा Proud वन स्टेप अ‍ॅट अ टाईम पद्धतीने काम होतय का बघ.
----
यात्र्या, ते "वेळ पाळा" ला हजार मोदकं Proud वेळ पाळणं - मग ती वैयक्तिक गोष्टींमधली असो किंवा कार्यालयीन कामामधली, खुप महत्वाची गोष्ट वाटते मला.

वन स्टेप अ‍ॅट अ टाईम - हा मंत्र जप पारे >>> अगदी अगदी.
अजुन एक, मोठ्या गोष्टींचे लहान लहान टास्क मधे तुकडे पाड. म्हणजे मग सोपे जाते.

>> मी पूर्वी करायचे बर्‍यापैकी organization पण आता घोळ होतात म्हणून हे genuinely विचारलं आहे रे बाबा.
चालू दे तुझं! आम्ही इथे येऊन पोष्टी टाकतोय म्हणजे आम्हाला वेळच वेळ आहे. काळजी नसावी.

मला त्या निमित्ताने माय फेअर लेडी मधल्या एका गाण्याच्या ह्या ओळी आठवल्या.

Let a woman in your life,
and patience hasn't got a chance,
she will beg you for advice, your reply will be concise,
and she will listen very nicely, and then go out
and do exactly what she wants!!!

Lol

माबो वर येण सोडुन द्या सगळ organize होइल. चेष्टा नाही करत. बर्याचदा एखाद अवघड किंवा लांबलचक काम आल की मन दुसरी कडे रमायला बघत. ह्यावेळेस लगेच माबो, थोपु सार्ख्या साइट्स समोर येतात आणि काम तसच रहात. फक्त ५ दिवस ह्या साइट्स वर न येवुन बघा कीती फरक पडतो

दगडं कमी कर >>>
कवे, दगड चे अनेकवचन दगड च! दगडं नव्हे! Wink

एक दगड अनेक दगड Happy
हा दगड हे दगड (ही दगडं नव्हे!) Happy

अजून एक आठवलं. कागद चे अनेकवचन पण कागद च राहते. बरेच जण ती कागदं असं म्हणतात/ लिहितात. Happy इथे हे अवांतर आहे, पण जाऊदे, तसे पण कुणीतरी मास्तरीण हा किताब दिलाच आहे तर छडी उगारून आणि चष्मा (जाड भिंगाचा) लावून उभे रहावे, काय? Wink

Reduce Your Options - हेच सुत्र तुम्हाला साधे सरळ आणि शांत आयुष्य देऊ शकेल.

निंबुचा क्लास सुरु झाला !!!!
>>
छडी लागे छम छम! विद्या येई घम घम! Proud

अ‍ॅक्च्युली तास सुरू सकाळीच झाला होता. आता तास सुरू करायला ही काय रात्राशाळा नाय काय Proud

वा सगळ्यांनी मस्तच उपाय सांगितलेत. निंबे, मीरा, बाबु मस्तच.
पारे आता शहाण्यासारखी हे उपाय अंमलात आण आणि इथे रीपोर्ट दे.

निंबे खरच मास्तरीण ग तु Happy

मोहन की मीरा आणि बागुलबुवा , फंडे आचरणात आणणे जमले म्हणजे ग्रेटच.
आमचं प्लानिंग आणि ऑर्गनायझेशन छान होतं. पण इम्प्लिमेंटेशन बोंबलतं.
आमाची यादी करून झालेल्या कामांवर फुल्या मारण्यात मजा येते.

एक वाचलेला आणि न पाळता आलेला फंडा :
कोणताही कागद एकदाच हाताळा. म्हणजे हातात घेतला त्याचा पूर्ण निकाल लावा.

कोणताही कागद एकदाच हाताळा. म्हणजे हातात घेतला त्याचा पूर्ण निकाल लावा>>>>> भरत आता माझ्या टेबलावर दोन बिलं (निंबे बिलं असतं ना अनेकवचन :-)) आहेत. सकाळ्पासुन किती तरी वेळा हाताळली आहेत आणि उद्या पण हातळणारे मी Lol

आम्हाला ट्रेनिंग टाईममध्ये एक छोटंसं सेमिनार दिलेलं
त्यात त्यांनी एक सोप्पा फंडा सांगितला होता
आणि तो बर्‍यापैकी ईफेक्टीव्ह आहे ( अनुभवावरून सांगतेय)

सकाळी चहा पितना एक वही आणि पेन्सिल घेऊन बसा
आज करायचीत ती सगळी कामं लिहून काढा
त्यांना "अतिमहत्वाची, महत्वाची, नेहमीची, आणि नाही केलं तरी चालेलं" अशा कॅटेगरीज मध्ये टाका. साधारण किती वेळ प्रत्येक कामाला द्यायचा ते ठरवून टाका
तो कागद सतत डोळ्यांना दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवा
आणि त्यानुसार कामं पुर्ण करा
( म्हणजे ईमेल चेक करायला आपण ५मिनिट ठरवतो पण कोणी तरी काही तरी टिपी ईमेल पाठवला असेल तर त्या भोवती रेंगाळत बसतो आणि ५ मिनिटाचं ते इवलसं काम चांगले १५ मिनिट घेतं. पण डोळ्यासमोर सतत वेळापत्रक दिसतं राहिलं की तिथे रेंगाळायची इच्छा होतं नाही.)
हा फंडा माझ्या बाबत १००% वर्क होतोय

माझ्या टीमचा ही तसा एक अलिखित रूल आहे.. प्रोजेक्टचं सगळं काम संध्याकाळी ४ च्या आत पुर्ण झालचं पाहिजे
त्यानंतर तुम्ही हवं ते करा. आणि चक्क हे असचं होतं
त्यानंतर बाकीचा टिपी आणि जीम वैगेरे केलं जातं.

माझ्या बाबतीत मायबोली चेक करणे (वर कोणी तरी माबो सोडा असा सल्ला दिलाय त्यावरून) महत्वाचं नाही, तरी केलंपाहिजे अशा कॅटेगरीत मोडतं.
कारण वाचन आणि गप्पा मारणे हा माझा छंद आहे आणि कुठल्याही परिस्थीतीत मी त्याशिवाय राहू शकत नाही.
आता वाचनासाठी माबोच हवी अस काही नाही हे खरं असलं तरी पुस्तक घेऊन बसलं की ते पुर्ण होईपर्यंत मला चैन पडत नाही आणि मग ठरवलेलं नियोजन चुकतं. त्यामुळे मी कादंबर्‍यांचं वाचन सुट्टीच्या दिवशीच करते.
त्यामुळे मी दिवसातले किमान ३ तास या कामासाठी बूक करून ठेवलेत.
इन्शॉर्ट मी ३ तास फुल्ल टिपी करूनही माझं काम वेळच्या वेळी पुर्ण होतं. थँक्स टू वरती सांगितलेला फंडा.

ट्राय करून बघ. Happy

Pages