कदाचित

Submitted by आनंदयात्री on 1 April, 2013 - 05:57

मनी तिच्याही भाव कदाचित
तिला पाहिजे नाव कदाचित

ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!

चाल नेमकी अचूक झाली
हरेन आता डाव कदाचित

मिळाले तरी टिकले नाही
अखेर नडली हाव कदाचित

इथेच उरली आहे माती
इथेच होते गाव कदाचित

नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/03/blog-post_26.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाल नेमकी अचूक झाली
हरेन आता डाव कदाचित

ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!
>>
Happy
"माझं" मत तुला माहीत आहेच!
तेंव्हा परत नाही टाकत

ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!<<< मस्त

(असे म्हणतात की मतल्यात प्रस्थापित झालेल्या जमीनीत उर्वरीत गझल असावी, बाकी हे बिगिनर्ससाठीच) Happy

सही !!
ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!..
.............. क्या बात है रे...... !!

मिळाले तरी टिकले नाही
अखेर नडली हाव कदाचित
शेर आवडला!

इथे चौथरे दिसती काही....
इथेच होते गाव कदाचित!

घाव मस्तच !!!!

बाकी शेर नवख्या शायराचे वाटतात तुमचे नाहीत वाट्ले (वैयक्तिक जाणीव-नेंणीवेचा भाग Happy )

जमीन मला समजली
गागागागा गागागागा अशी असावी लय
-काफिये रदीफ पाळले गेलेत छान (माझे मत)

मिळाले री टिकले नाही>> इथे लयीत मला सहजता नाही जाणवली
माझे मत असे की अशा मात्रावृत्त्तात जी आपण अखंड-गा =गागागागा .....अशी वाचू शकतोय त्यात गा सहसा जवळजवळ्च्या अक्षरात ल-ल असा फोडावा......शब्द बदलला तरी चालू शकते / किमान दोहोतील अक्षराचे अंतर कमीत कमी असावे

मिळाले री ऐवजी जरी मिळाले असा एखादा बदल करता आला तर हे अंतर एका अक्षराचे उरते आधी हे दोन अक्षरांचे होते

धन्यवाद दोस्तहो! Happy

बेफिकीर, चूक झाली होती. आता तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे ना?

रिया, हम्म्म Happy

ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!

इथेच उरली आहे माती
इथेच होते गाव कदाचित .......... हे दोन शेर खुप आवडले