रुमालावरील भरतकाम..

Submitted by सुलेखा on 28 March, 2013 - 05:06

रंगपंचमीच्या सुमुहुर्तावर एक कौटुंबिक संम्मेलन करण्याचे ठरले आहे.जमतील तितके भाऊ-वहिनी,बहिणी-मेहुणे एकत्र जमणार आणि लहानपणाचे सगळे दिवस गंमती-जंमती,खोड्या आठवणार ,आठवणीत गेलेले खेळ पुन्हा एकदा खेळणार. दोन दिवस जागवलेल्या स्मृती बरोबर माघारी फिरताना इतर भेटवस्तुंबरोबर समस्त स्रीवर्गाला हे रुमाल भेट देणार आहे.
यातील काही दिझाइन्स मी माबो.कर सीमाकाकुंच्या परवानगीने त्यांनी केलेल्या रुमालावरील घेतले आहेंत.
माझ्याकडे आधी वापरुन उरलेले बरेच दोरे--गुंतवळा-होता.त्याचा सदुपयोग इथे केला आहे.त्यातील बरेचसे या निमित्ताने संपले.फक्त हिरवा रंग नवा वापरला आहे.
यात वापरलेले टाके --चेन स्टिच , काश्मिरी ,कच्छी ,कर्नाटकी.एकुण २ पदरी दोरा वापरला आहे.रुमाल करण्यासाठी मुद्दाम लहानशी रिंग विकत आणली.त्यामुळे सोयिस्कर झाले.डिझाईन अगदीच लहानसे नको होते.त्यामुळे रुमालाच्या १/४ भागात दिसेल अशा पद्धतीचे डिझाईन्स घेतले.एकुण २ डझन रुमाल केले आहेत्.प्रत्येकीसाठी रुमालांचे वेगवेगळे पॅकिंग करताना लहान लहान गिफ्ट पेपर मधे गुंडाळुन त्याला चॉकोलेट चा आकार दिला आहे.
rumal--1.JPGrumal--2.JPGrumal--333.JPGrumal-6666_2.JPGrumal-4.JPGrumal-5.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy
हे किती चिकाटीने करीत रहावे लागले असेल नै? आपल्याला नै बोवा इतका धीर धरवणार! Sad
एखाद काम सलग एखाद तास केला असही क्वचितच होते.

जागु,
दोन प्रकारचे मोराचे डिझाईन घेतले आहे.सगळ्यांनाच खूप आवडल्याने ,या रुमाला.मधे खूप वेळा रिपीट केले आहे.खरे तर हे डिझाईन असे आहे कि कशाच्याही वर --ड्रेस ,साडी,चादर्,दुपटे ,फ्रॉक,सोफा ,बॅग/पिशवी--छान दिसेल.फारच लौकर भरले जाते.भरीव दिसते,दिमाखदार दिसते आहे.

कसलं सुबक आहे गं तुझं भरतकाम.....मान गये !!
सगळ्या मुली खुश झाल्या असतील ना Happy

सुंदर... सर्वच डिझाईन्स , रंगसंगती छान आहेत्, पण मोर जास्त आवडला. असे गिफ्ट देण्याची कल्पना तर खुपच आवडली.

रंगसंगती.. डिझाईन..नाजुक कलाकुसर...पेशन्स !!!! मान गये उस्ताद ! बहोत खूब Happy
किती वेळ लागला एक रुमाल करायला ?

अजुन निकाल कळायचा आहे.
एक रुमाल २० ते २५ मिनिटात होतो.
या भरतकामासाठी वापरलेले टाके--चेन्,कच्छी,काश्मिरी.
एकुण सगळे रुमाल -२ डझन-रमतगमत ३ आठवड्यात केले.हिरवा रंग सोडुन बाकी माझ्याकडे उरलेले ब्रेशीम वापरले आहे.

सुंदर. बरयाच वर्षांनी असले रुमाल बघायला मिळाले. एकदम लहान असताना आईबरोबर हळदीकुंकुच्या कर्यक्रमात जायचो तेव्हा असले रुमाल बघायला मिळायचे Happy

मोर खूपच सुरेख जमले आहेत! मस्त रुमाल! माझ्याकडे असे 5-6 रुमाल आहेत, मी वापरायला काढू म्हणून हातात घेते आणि त्यावरच डिज़ाइन बघून इतके छान कशाला वापरायचे म्हणून परत ठेवून देते! Lol

Pages