रुमालावरील भरतकाम..

Submitted by सुलेखा on 28 March, 2013 - 05:06

रंगपंचमीच्या सुमुहुर्तावर एक कौटुंबिक संम्मेलन करण्याचे ठरले आहे.जमतील तितके भाऊ-वहिनी,बहिणी-मेहुणे एकत्र जमणार आणि लहानपणाचे सगळे दिवस गंमती-जंमती,खोड्या आठवणार ,आठवणीत गेलेले खेळ पुन्हा एकदा खेळणार. दोन दिवस जागवलेल्या स्मृती बरोबर माघारी फिरताना इतर भेटवस्तुंबरोबर समस्त स्रीवर्गाला हे रुमाल भेट देणार आहे.
यातील काही दिझाइन्स मी माबो.कर सीमाकाकुंच्या परवानगीने त्यांनी केलेल्या रुमालावरील घेतले आहेंत.
माझ्याकडे आधी वापरुन उरलेले बरेच दोरे--गुंतवळा-होता.त्याचा सदुपयोग इथे केला आहे.त्यातील बरेचसे या निमित्ताने संपले.फक्त हिरवा रंग नवा वापरला आहे.
यात वापरलेले टाके --चेन स्टिच , काश्मिरी ,कच्छी ,कर्नाटकी.एकुण २ पदरी दोरा वापरला आहे.रुमाल करण्यासाठी मुद्दाम लहानशी रिंग विकत आणली.त्यामुळे सोयिस्कर झाले.डिझाईन अगदीच लहानसे नको होते.त्यामुळे रुमालाच्या १/४ भागात दिसेल अशा पद्धतीचे डिझाईन्स घेतले.एकुण २ डझन रुमाल केले आहेत्.प्रत्येकीसाठी रुमालांचे वेगवेगळे पॅकिंग करताना लहान लहान गिफ्ट पेपर मधे गुंडाळुन त्याला चॉकोलेट चा आकार दिला आहे.
rumal--1.JPGrumal--2.JPGrumal--333.JPGrumal-6666_2.JPGrumal-4.JPGrumal-5.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या भरकामासाठी वापरलेल्या टाक्यांची माहिती प्रचिं.च्या वर इतर मजकुराखालीच पुन्हा नव्याने लिहीली आहे.

सुंदर सुबक!! मस्त डिझाईन्स!!

डिझाईन्स आधी छापून घेतली आहेत का?

सुलेखातै, मलाही पुन्हा नव्याने रुमाल करावेसे वाटतायत... खुपच छान!!! कच्छी टाका मात्र आठवत नाहीये मला Sad रुखवतासाठी करुन दिले होते १/२ दा...

Pages