रंगपंचमी हा सण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे का?

Submitted by मानसी वैद्य on 27 March, 2013 - 03:15

आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेनुसार होळीला होलिकापूजन आणि रंगपंचमीला रंग खेळतात.... पण आजकाल सर्रास चक्क धुळवडीलाच सगळे मराठी लोक रंग खेळायला लागलेले आहेत.
गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत मुंबई सोडता बहुतांश ठिकाणी रंगपंचमीलाच रंग खेळायचे पण गेल्या ३-४ वर्षात अगदी कोअर पुणेकर म्हणवणारे पेठकरी सुद्धा धुळवडीला रंग खेळताना दिसतायत.
धुळवडीला असणारी सुट्टी हे एक कारण जरी ग्राह्य धरले तरी आपण किती पटकन आपली संस्कृती विसरतो याचे हे एक उदाहरण Sad

आम्ही पुण्यातले भाऊ-बहीण आणि मित्र वगैरे मात्र आवर्जुन रंगपंचमीलाच एकत्र जमून रंग खेळतो!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> रंगपंचमी हा सण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे का? <<<<
हो.
हिन्दू (केवळ महाराष्ट्रीय नव्हे) पद्धतीप्रमाणे नावाप्रमाणेच धुळवडीला होळीच्या राख व धुळीने तर रंगपंचमीला रन्गाने खेळतात.
यूपी/बिहारींच्या संख्यात्मक वाढीमुळे झालेल्या सांस्कृतिक/भाषिक आक्रमणान्चे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
अन कितीही आपण मारे म्हणत असलो की दगडान्च्या देशा राकट महाराष्ट्र देशा वगैरे, तरी असल्या आक्रमणान्करता महाराष्ट्राची भूमी फारच मऊसूत, कच्ची आहे.

लिंबु अनुमोदन,
युपी बिहारी लोंकानी काय जबरदस्ती केली होती काय आपल्यावर की धुळवडीलाच रंगपंचमी करा म्हणुन. असो पण अजुन आमच्याकडे (कराड, सातारा, सांगली इ.)तरी रंगपंचमीलाच रंग खेळतात. असो.

मंदार, हळूहळू हे लोण आता कराड कोल्हापुरापर्यंतही पोचेल.
यावर उपाय म्हणजे महाराष्ट्र सरकारने धुळवडीऐवजी रंगपंचमीला सुट्टी दिली पाहिजेल... तर थोडाफार फरक पडेल!

आज मी लेकीला तेच सांगत होते.

आपल्या लहानपणी शाळा आणि कॉलेजला रंगपंचमीला सुट्टी असायची का? कारण आम्ही भरपूर वेळ दिवसात २-३ वेळा रंगपंचमी खेळायचो

शाळेला तरी असायची.... आणि गंमत म्हणजे ऐन परीक्षेचे दिवस असायचे ते!
पण रंगपंचमीला कधीही आई-बाबांनी अभ्यासाचा आग्रह नाही केला, फुल्ल सूट मिळायची त्या दिवशी (फक्त १२वी सोडून,कारण दुसर्‍या दिवशी पेपर होता)

कॉलेजमध्ये तर काय एकदा सकाळी बाह्रेर पडल्यावर दिवेलागणीलाच ओळखू न येण्यासारख्या अवस्थेत परतायचो

आमच्याकडे सातार्‍याला रंगपंचमीलाच खेळतात रंग Happy

मानसी,
अगदी अगदी... ऐन परीक्षेत खेळलेल्या अनेक रंगपंचमी आठवून गेल्या!

दोन्ही दिवस खेळतात पुण्यात .....
अजुन आमच्याकडे (कराड, सातारा, सांगली इ.)तरी रंगपंचमीलाच रंग खेळतात. >>> हे ही अहेच म्हणा .....
यंदा खेळूनका आश्या गर्जना होतायेत दुष्काळामुळ, लवासात अन सहारात आसल तर नक्की खेळा वर पाणी ल्यी दाबलय ....... Sad

धुळवड/ रंगपंचमीला सध्यां आलेलं स्वरूप पहातां, विशेषतः मुंबईत, मला नाही वाटत लोक फार हळहळतील त्याच्या लुप्त होण्याने ! आत्तांच टीव्ही वाहिनीवर सदाशिव अमरापुरकरांच्या सोसायटीत बाहेरच्या धुळवड-धुंद तरुणानी घुसून केलेल्या गलीच्छ प्रकाराबद्दल सांगण्यात आलं. हे प्रकार अपवादात्मक नसून सुसंस्कृतपणे रंगपंचमी खेळणंच खरं तर दुर्मिळ होत चाललं आहे. त्याचा दोष युपी-बिहारवाल्यांकडे,नवश्रीमंतांकडे व एकंदरीतच सांस्कृतिक वातावरणाकडे किती प्रमाणांत जातो, हें ठरवणे कठीणच !

तसेही आता १० वर्ष झाली होळी आणि रंगपंचमी खेळलो नाहीये. मुळात होळीची मजा संपली जेंव्हा १० वर्षांपूर्वी वाडा पडला गेला तेंव्हा. नविन इमारतीत होळीसाठी जागाच राहिली नाही. रंगपांची, धुळवड आणि होळी ह्यांच्यासाठीच्या सुट्ट्या कमी झाल्या. मग एकाच दिवस मिळत असेल तर काय करणार? बहुदा हेच महत्वाचे कारण असावे होळीला रंग खेळण्याचे

कोणता महाराष्ट्र? फक्त पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र म्हणता येईल का?

मराठवाड्यात तर सर्रास होळी नंतरचा दुसरा दिवशीच(धुळवडीला) रंग खेळला जातो. मी जेंव्हा पुण्यात शिकायला आलो तेंव्हा मलाच येथे रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळतात हे बघू आश्चर्य वाटले होते. आणि आम्हाला शाळेलाही धुळवडीच्या दिवशी सुटी असायची. रंगपंचमीच्या दिवशी नाही. विदर्भातही बहुदा असेच. (मी वैदर्भिय नाही त्यामुळे तिथे कधी धुळवडीला नव्हतो) पण मित्र आहेत आणि ते धुळवडीला खेळत असत.

सुसंस्कृतपणे रंगपंचमी खेळणंच खरं तर दुर्मिळ होत चाललं आहे >> ह्याला अनुमोदन. पण ते सोसायटीवर आणि कूठे रंग खेळतोय त्यावर डिपेंड. आमच्या सोसायटीत १२० घर आहेत. आणि आज आम्ही अ‍ॅटलिस्ट १५० जनांनी ड्राय रंग खेळला, एकमेकांना ड्राय रंगात भरविले आणि वर नंतर आमच्या पैकी काही जण डिजे होऊन नाचलो पण कुठेही हिडिस पणा नव्हता. उलट २ वाजेपर्यंत मजा आली. आणि नाचणार्‍या बहुतांशी स्त्रिया होत्या !

शेवटी महत्त्वाचे काय तर जे क्राउड जास्ती होणार त्याप्रमाणे संस्कृती पण बदलणार. पुणे तरे कसे अपवाद राहिल? आणि रंगपंचमीच कशी अपवाद असेल. बाकी पण अनेक गोष्टी बदलल्या आहेत. धुळवडीला रंग खेळायलाही तितकीच मजा येते, जितकी रंगपंचमीला येत असते. Happy

एक्झॅटली चिनूक्स. म्हणूनच लिहिले कोणता महाराष्ट्र?

हिन्दू (केवळ महाराष्ट्रीय नव्हे) पद्धतीप्रमाणे नावाप्रमाणेच धुळवडीला होळीच्या राख व धुळीने तर रंगपंचमीला रन्गाने खेळतात.
यूपी/बिहारींच्या संख्यात्मक वाढीमुळे झालेल्या सांस्कृतिक/भाषिक आक्रमणान्चे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. >>

लिम्बोबा हे राहिलेच होते लिहायचे. महाराष्ट्र तो म्हणजे केवळ पुणे-मुंबई आणि पश्चिम म. सोडून इतरत्र हिंदू नाहीत की काय?

बहुसंख्य हिंदू जर धुळवडीला खेळत असतील तर उर्वरित हिंदूंनी संस्कृती लोपली जातेय अशी ओरड करण्यात काय हशील? Wink

अर्धा महाराष्ट्र जर धुळवडीला खेळत असेल तर उलट आता सर्व महाराष्ट्र एकाच दिवशी खेळून एक होतोय Happy

केदार +१

माझ्या लहानपणी अंबाजोगाईला आणि नंतर औरंगाबादेत आम्ही धुळवडीलाच रंग खेळायचो. औरंगाबादमध्ये मारवाडी मैत्रिणींकडून कळालं की त्यांच्याकडे पंचमीला पण रंग खेळतात. रंगपंचमीला कधीच सुट्टी नसायची. पण वर्गातल्या २-३ मारवाडी मुली त्या दिवशी शाळेत यायच्या नाहीत. दुसर्‍या दिवशी आम्हाला त्यांचे रंगलेले हात दिसायचे. Happy

हिडीसपणाबाबत म्हणायचं तर ते वस्तीवर, सोसायटीवर (लोकांवरच)जास्त अवलंबून आहे. अंबाजोगाईला आणि औरंगाबादेतल्या पण सुरवातीच्या घरांमध्ये एखाद्याला रंग खेळायचा नसला तर अगदी दरवाजे ठोठावून त्यांना जबरदस्तीने बाहेर काढलं जायचं. दरवाज्याच्या फटींमधून आत पाण्याच्या बादल्या ओतायचे लोक.

इथे दिल्लीमध्ये लोक आपापल्या अंगणात / ग्रूपमध्ये, गच्चीवर रंग खेळतात, सहसा कोरडेच. बळजबरीने एखाद्याला घराबाहेर काढून रंगवणं गेल्या ६ वर्षात कधीच दिसलं नाही.

रंगपंचमी हा सण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे या बद्द्ल मला मुळीच शंका नाही.आणि धुळवडीला साजरी होणारी रंगपंचमीही भयानक असते.आमच्या चौकात डोल्बी साऊंड आणि प्रचंड आरडाओरड ,वेडेवाकडे नाच .बहुतांश तरुण दारू व बिअर मारून आलेली.आवाजाने पत्येक बिल्डींग च्या काचा थरथरत होत्या .अन छातीत धडधडत होते.पोलीस स्टेशन ५ मिनिटांच्या अंतरावर ! सारेच बेपर्वा ,बेहोष ,बेधुंद ....काय करतोय ? का करतोय ?
माहित नाही .मेरा भारत महान.

रंगपंचमी हा सण लूप्त होण्याच्या मार्गावर नक्कीच आहे.

माझ्या माहितीप्रमाणे (महाराष्ट्राबाहेरही) माळव्यात वगैरे रंगपंचमी खेळली जाते.

विदर्भ, मराठवाड्यात रंगपंचमी माहितच नाहिये का म्हणजे? कमाल आहे!

आणि हे पुण्यात होळीला रंग खेळायचे जे लोण आलेय ते मला नाही वाटत की विदर्भ, मराठवाड्याच्या प्रभावामुळे आलेय.... तसे ते असते तर त्याला इतके दिवस नसते लागले!

पुण्यात वाढत जाणार्‍या परप्रांतीय विद्यार्थ्यांमुळे, आयटी मुळे आलेल्या उत्तर भारतीय लोकांमुळे हा बदल झालाय हे माझे निरीक्षण!

ग्रुपमधला एखादा मुलगा जरी अमराठी असला तरी त्याच्या सोयीसाठी समस्त जोशी-कुलकर्णी-पाटलांचा ग्रुप एकमेकांत सुद्धा हिंदी बोलायला लागतो.... ही जी मनोवृत्ती आहे तीच या बदलाला कारणीभूत आहे Sad

रंगपंचमीपेक्शा धुळवड हा सण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. धुळवडीलाच लोक रंग खेळायला लागलेले आहेत.धुळवड होळीच्या राख व धुळीने खेळतात. पण लोक धुळवडिऐवजी रंग खेळतात त्या दिवशी किंवा रंगपंचमी ला रंग खेळतात. खुप कमी लोक धुळवड खेळतात.

आम्हि ईन्दुर मधे धुळवडि ला रंग खेळतो कारण आज काल कोणिहि धुळ/रा़खे नि खेळत नाहित म्हणुन सगळेच रंग खेळतात.
पण रंगपंचमी हि धुळवडि पेक्षा जास्त जोरात खेळतात, शहरात सगळ्या शाला/कार्यालये/दुकाने बन्द असतात कारण पुर्ण शहरात कुठेहि बाहेर निघालात तर बिन रन्गलेले घरि जाउच शकत नाहि, तोफा आणि हत्ति नि रंग/गुलाल उधळला जातो जागो जागि मोठ्मोठे कढाव रंग भरुन ठेवलेले असतात,माणसाला उचलुन त्या कढाव मधे बुचकळुन काधतात.
बाकि प्रत्येक गोष्टिला कारणिभुत परप्रान्तिय कसे आसु शकतात्,स्थानिक काय फक्त बघ्याच्या भुमिकेत असतात काय? आणि ते येउन तुमच्या वर जबरदस्ति करतात काय? आणि ते करतात तुम्हि करवुन हि घेता? कोणिहि तुमचे विचार्/मानसिकता कशि बद्लु शकतो त्या करिता सर्वस्वि आपणच जबाबदार आहोत

ग्रुपमधला एखादा मुलगा जरी अमराठी असला तरी त्याच्या सोयीसाठी समस्त जोशी-कुलकर्णी-पाटलांचा ग्रुप एकमेकांत सुद्धा हिंदी बोलायला लागतो.... ही जी मनोवृत्ती आहे तीच या बदलाला कारणीभूत आहे
मग त्यात दु:खी चेहेरा कशाला?
अहो आपण अत्यंत उदारमतवादी, अत्यंत सोशिक, मिळून मिसळून वागणारे लोक. मराठीचे माहेरघर पूर्वी पुणे होते. आता इकडे अमेरिकेतच कुठेतरी आहे, म्हणजे मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्यपरिषद असे सगळे इकडेच होते.
तर त्या पुण्याबद्दल असे की पुणेकरांना माहित आहे की जगात त्यांच्याइतके हुषार कुणीच नाही. त्यातून अमराठी असेल तर विचारायलाच नको. त्यांच्यातल्या दहा लोकांचा मेंदू एकत्र केला तरी पुण्यातल्या कुणा शेंबड्या पोराइतकी सुद्धा अक्कल भरणार नाही!

मग सांगा. मराठी लोकच मराठी सोडून इतर भाषा बोलले नाहीत, तर संभाषण कसे होणार? लोकांना कसे कळणार की पुणेकर कित्ती हुषार! दुसर्‍या भाषा पण येतात त्यांना!

म्हणून असे आहे, बाकी काही नाही.

Light 1 Light 1 Wink Proud

रोज होळी खेळतात त्याचे काय ????????????????????? रोज तुम्ही एक - दोन बादली पाणी वापरतात..... ही होळी थांबवा आधी.................
.
.
.अमुक तमुक संघातर्फे....जनहित Happy

>>बाकि प्रत्येक गोष्टिला कारणिभुत परप्रान्तिय कसे आसु शकतात्,स्थानिक काय फक्त बघ्याच्या भुमिकेत असतात काय?
अहो स्थानिक फक्त बघ्याच्या भुमिकेत असते तर काही प्रश्नच नव्हता... ते पण धुळवडीच्या रंगात रंगतात हा मुद्दा आहे Proud

झक्की, अमेरिका हा शब्द वगळून एखादी पोस्ट लिहली तर फाऊल होतो का हो? Light 1

कोणता महाराष्ट्र? फक्त पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र म्हणता येईल का?.<<
++१
खानदेशातही फक्त धुळवडच.

आम्ही तर लहाणपणी धुळवड अन रंगपंचमी एकच आहेत असे समजत असू.
एकदा धुळ्याची धुळवड/रंगपंचमी नावाचा प्रकार डीट्टेलवार लिहिन. इथे युद्ध खेळल्यासारखे पाणी खेळतात. डोलची नामक 'हत्यारा'तून चाबकाचा फटका मारावा तसे पाणी मारता येते. पण ते नंतर. सध्या घाईत आहे.

ग्रुपमधला एखादा मुलगा जरी अमराठी असला तरी त्याच्या सोयीसाठी समस्त जोशी-कुलकर्णी-पाटलांचा ग्रुप एकमेकांत सुद्धा हिंदी बोलायला लागतो.... ही जी मनोवृत्ती आहे तीच या बदलाला कारणीभूत आहे अरेरे >> तसेच साऊथ इंडियन लोक जर हिंदि / इंग्रजी नाहि बोलले तर त्यांच्या नावाने सुद्धा लोक ओरडतात. काय म्हणावं याला. दिवा घ्या

झक्की, अमेरिका हा शब्द वगळून एखादी पोस्ट लिहली तर फाऊल होतो का

तसे काही नाही हो, पण आता आपली संस्कृती, महाराष्ट्रीय संस्कृती इ. गोष्टी आ़जकाल भारतात कुठे बघायला मिळणार? म्हणजे मराठी बोलणे, वगैरे गोष्टी आता फक्त अमेरिकेतच. पुणे मुंबई मधे कुठले आली महाराष्ट्रीय संस्कृती, मराठी बोलणे?
Wink

कोल्हापुरात रंगपंचमीलाच रंग खेळात असु.
धुळवड म्हणजे कोल्हापुरकराना होळीच्या (पुरण) पोळ्या खाउन जिभेला आलेली बाभळी घालवण्याचा महत्वाचा सण.
सकाळी सकाळी मटणाच्या दुकानाबाहेर रांग लावावी लागते.
Happy

>>>>विदर्भ, मराठवाड्यात रंगपंचमी माहितच नाहिये का म्हणजे? कमाल आहे! <<<<
स्वरुप, या आख्ख्या पोस्टीला अनुमोदन.
होळीच्या दुसर्‍या दिवशीची धुळवड, जी होळीची राख, माती (चक्क शेणही) यान्नी खेळतात, व पंचागात दिलेली रंगपंचमी नावाप्रमाणेच रंगपंचमी प्रमाणे खेळतात हा झाला "हिंदू" संस्कृतीचा भाग.
आता हा भाग विचारात न घेता, "आमच्या इथे अस्सेच चालते", तर ते का तस्सेच विपरीत का चालते याचा विचार न करता "महाराष्ट्र म्हणजे कोणता" अस्ला तत्कालिक कुचकामी विचारातच रमायचे असेल तर याला माझा नाईलाज आहे, पण माझे निरीक्षण असे आहे की जिथे जिथे परकीय आक्रमकांचा प्रभाव जास्त होता तिथे तिथे हिन्दू सणांच्या/रितिरिवाजांच्या पद्धतीमधे प्रचंड प्रमाणावर मोडतोड झाली आहे. त्यातुन विदर्भ व निजामाच्या अंमलाखालील मराठवाडाही वगळण्याची गरज नाही. सुदैवाने पश्चिम महाराष्ट्रावर ही गत फारशि ओढवली नाही/ओढवुन दिली नाही वा तत्सम.
आता परकीय नसले तरी परकीय अंमलाच्या प्रभावाखालील बदललेल्या संस्कृतीच्या परप्रांतियांच्या भरमारीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरे त्याच त्या मोडतोड केलेल्या प्रथा राबवू पहात आहे.
महाराष्ट्र म्हणजे कुठचा असे विचारणार्‍यान्नी वरील वस्तुस्थितीकडे डोळेझाक करू नये असे वाटते.

़केदार, अल्पना +१
मला पुण्याला शिकण्यासाठी आल्यावरच कळ्ले होते की तिथे धुळवडीला रंग खेळत नाहीत आणि धक्का बसला होता.

Pages