रंगपंचमी हा सण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे का?

Submitted by मानसी वैद्य on 27 March, 2013 - 03:15

आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेनुसार होळीला होलिकापूजन आणि रंगपंचमीला रंग खेळतात.... पण आजकाल सर्रास चक्क धुळवडीलाच सगळे मराठी लोक रंग खेळायला लागलेले आहेत.
गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत मुंबई सोडता बहुतांश ठिकाणी रंगपंचमीलाच रंग खेळायचे पण गेल्या ३-४ वर्षात अगदी कोअर पुणेकर म्हणवणारे पेठकरी सुद्धा धुळवडीला रंग खेळताना दिसतायत.
धुळवडीला असणारी सुट्टी हे एक कारण जरी ग्राह्य धरले तरी आपण किती पटकन आपली संस्कृती विसरतो याचे हे एक उदाहरण Sad

आम्ही पुण्यातले भाऊ-बहीण आणि मित्र वगैरे मात्र आवर्जुन रंगपंचमीलाच एकत्र जमून रंग खेळतो!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विदर्भात कुठले परकीय होते? भोसले होते ना? आणि इंदोरला होळकर होते ना? अन इंग्रज तर सगळीकडेच होते.. अन खुद्द पुण्यात शिवाजीमहाराजांच्या आधी परकीयच राज्य करत होते ना?
कायच्या काय शेंड्या लावण्यात लिंबुचा हात कुणीही धरु शकत नाही. Lol

हा घाणेरडा सण जितका लवकर बन्द होईल तेवढे बरे...
<<
छे छे हूडा, अहो "हिंदू" सण आहे तो.
लिंबाजीराव हाणतील तुम्हाला असलं काही बोलले तर.
***
नताशा,
"आमच्यात अस्संच अस्तं" हे वाक्य तर लिंबाजींचा सुखनतकिया आहे. हाच लोकांनी वापरला तर मात्र ह्यांची जळजळ सुरू होते Wink ते सोयीनुसार ष्टेटमेंटे बदलत असतात. अन कामातून वेळ काढून माबोवर लिहीत असतात Wink

>>गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत मुंबई सोडता बहुतांश ठिकाणी रंगपंचमीलाच रंग खेळायचे>> माझ्या लहानपणी मुंबईत ते ही बांद्र्यात धुळवडीला फक्त होळी आणि रंगपंचमीला रंग खेळले जायचे. आताचं माहित नाही.

काय वळसंगीकर, ओळख आहे का?

रंगुनि रंगात सार्‍या रंग याचा वेगळा
पंचमीचा खेळ का धुळवडीला खेळला Wink

अहो, रंगपंचमीचे काय घेऊन बसलात, भारतातल्या शेकडो गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत, त्याच्या जागी दुसर्‍या येताहेत. रंगपंचमी, होळी, भांग याच्या ऐवजी रेव्ह पार्ट्या, दारू, इतर ड्रग्स, असे सगळे आले इतकेच. धर्म, संस्कृती तीच.
हुतुतू, आट्यापाट्या या ऐवजी क्रिकेट, गोल्फ, फुटबॉल, टेनिस आले.

कीर्तने, देवाचे उत्सव या ऐवजी सिनेमे आले. देवाचेहि येतात हो सिनेमे, त्यामुळे बर्‍याच जणांना खुल्लम खुल्ले अंगप्रदर्शन करता येते, नि इतर लोक मिटक्या मारत पहातात! कीर्तनापेक्षा जास्त मज्जा!

उद्या म्हणाल, यज्ञ होत नाहीत, रामाच्या काळी व्हायचे तसे!! बार्बेक्यू करतात ना लोक.

>>उद्या म्हणाल, यज्ञ होत नाह>><<
यज्ञ कसे करणार? यज्ञ करायचा म्हणजे घोडा लागणार... तो कुठून आणायचा? Proud
पुण्या/मुंबईत घोडे मिळणे मुश्किलच आहे. आता तुम्ही म्हणाल गाढव घ्याना चालवून... त्यात काय... काळ बदललाय? Proud

(घ्या, गाडी आता सुरळीत चाललीय विषय सोडून.. अमेरीक, पूना( परप्रांतीयांचे उच्चार) आणि बाँबे फिरून यज्ञ, संस्कृती, धर्म.. वगैरे चालू ठेवा.)

.>>>>> हा घाणेरडा सण जितका लवकर बन्द होईल तेवढे बरे...<<
म्हणजेच शिम्गा ना? होळी अन त्यापुढील दिवसास शिमगा साजरा करणे म्हणतात बरं. तूही विसरला असशील म्हणून सान्गतोय.

हूडा, पण असा कसा बन्द होईल? तुझी इच्छा म्हण्जे काय घटनासुधारणेचा वट्टहुकुम आहे? Proud
सण तर बन्द होत नाहीच्चे, उलट वर्षातून एकच दिवस "शिम्गा" साजरा करायचा, ते सोडून वर्षाचे तिन्ही त्रिकाळ ३६५ दिवस "शिम्गा" साजरा करण्याची अहमहमिका चाललेली अस्ते हल्ली! दिग्गी वगैरे दिग्गज त्यात सर्वात पुढे .... Wink आता दिग्गीराजाच्या व तत्समांच्या रोजच्या शिमग्याच्या दिवटेपणामुळे तुम्ही म्हणत असाल की हा सण लौकर बन्द व्हावा, तर तुम्हाला अनुमोदन बर्का! Proud

>>>> छे छे हूडा, अहो "हिंदू" सण आहे तो.
लिंबाजीराव हाणतील तुम्हाला असलं काही बोलले तर. <<<<<
कित्ती तो विश्वास इब्लिसराव, मागले काही विसरला नै वाट्ट! इत्क मनाला लावुनधरुन ठेवू नये.... उगी उगी. तुम्हाला नै हो हाणण्णार, हात्तरेतो, कोणे रे आम्च्या इब्लिसाला हाण्ण्तोय? Lol

पश्चिम महाराष्ट्र-विदर्भ्/मराठवाडा या वादात मला पडायच नाहीये.... माझं म्हणणं इतकच आहे की जे पुर्वापार चालत आलेले आहे, जी आपली ओळख आहे, ते इतक चटकन हातातुन निसटुन जाऊ नये!

ओसरीवरचा भट आता त्याच्या रंगाने माजघर रंगवायला निघालाय.... या असल्या रंगरंगोटीत मातीच्या भिंतींचा दरवळ कुठेतरी हरपत चाललाय Sad

म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच आणि काळही सोकावत चाललाय!

याला मराठी कलाकार कारणीभूत असावेत ,तिकडे बच्चनच्या घरी 'फिल्मी होली' झाली कि, ईकडे हे मराठी कलाकार लगेच कॉपी मारायला बघतात .
सगळ्या मराठी मालिकांमध्ये 'होली के रंग' दाखवतात आजकाल. तिकडे हिंदीत कुत्रंपण विचारत नाही आणि जातात कॉपी मारायला. Proud

हेलबॉय,

>> तिकडे हिंदीत कुत्रंपण विचारत नाही आणि जातात कॉपी मारायला.

अगदी १००% अनुमोदन! बरोब्बर दुखर्‍या नसेवर बोट ठेवलंत. खरंतर मराठीने स्वत:चं स्थान निर्माण करायला पाहिजे. आज हिंदीची चित्रपटाची जी दुर्दश उडाली आहे तिच्या वाटेने जाण्यात काय अर्थ? बॉलीवूडात कणी स्पष्ट हिंदी बोलतो का? अर्धंमुर्धं हिंदी आणि उरलेलं इंग्लिश यावर कसाबसा गाडा रेटताहेत. कशाला त्यांची फुकटची कॉपी करायची? केवळ तिकडे पैसे आहेत म्हणून? का झगमगाट आहे म्हणून?

अशाने स्वत्व कसं उपजणार! जगात स्वत्वाला किंमत आहे. कॉपीला नाही.

आ.न.,
-गा.पै.

>>याला मराठी कलाकार कारणीभूत असावेत ....सगळ्या मराठी मालिकांमध्ये 'होली के रंग' दाखवतात आजकाल
धुळवडीला रंग खेळणारी तरुण पिढी, मनोरंजनाचे इतर अनेक पर्याय सोडून त्या फुटकळ मराठी मालिका बघत असतील आणि त्यातून चक्क प्रेरणा घेत असतील असे खरच वाटते का तुम्हाला?

खरंतर मराठीने स्वत:चं स्थान निर्माण करायला पाहिजे.
डोंबल!! दररोज एकेक मराठी शब्दा ऐवजी हिंदी, इंग्रजी शब्द, दररोज एकेक नवीन अमेरिकन, पंजाबी, बिहारी चालीरीती समाजात आणण्याची अहमहिका लागलेली आहे.

हंSSS!

वाईट काही नाही त्यात. बदल होणारच. पूर्वी, म्हणजे जेमतेम ६० -६५ वर्षांपूर्वी श्रावणी, संध्या, कीर्तने हे प्रकार फारच जोरात व्हायचे, मग ते बंद झाले.

अग्गदी अमेरिकेसारखी परिस्थिती आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्र श्रीमंत नि लोक उदारमतवादी, मिळून मिसळून घेणारे. म्हणून बाहेरून सगळे लोक महाराष्ट्रात येऊ पहातात, नि महाराष्ट्राला बदलतात.

इथेहि हळू हळू लॅटिन अमेरिकन चालिरिती,भाषा, यहुदी सण, इ. गोष्टी मुळे मेरी ख्रिस्मस म्हणण्या ऐवजी हॅपी हॉलीडेज म्हणा, ख्रिस्मसला नेहेमीचे डेकोरेशन, निदान सरकारी इमारतींभोवती करायचे नाही, असे झालेच आहे.

त्यालाच अमेरिकेची स्वतःची संस्कृती म्हणवतात. महाराष्ट्राचेहि तसे होईल.

रंगपंचमी वस्तुतः होळी नंतर दुसर्या दिवशी नसावी. माझे वडील सांगतात त्याप्रमाणे खानदेशात रंगपंचमी होळीनंतर येणाऱ्या पंचमीला खेळली जात असे. होळी सतत १० दिवस धुमसत असे.

जाणकार अधिक खुलासा करू शकतील.

सान्गली / कोल्हापूर कडे धुलवडीच्या दिवशी होळिची राख आणि रन्गपन्चमिच्या दिवशी रन्ग खेळायची पद्धत आहे. धुळवडिच्या दिवशी होळिची राख लावुन सोन्ग काढले जाते. "धुळवडीचे पैसे २, २ रुपये" असे म्हणत घरोघरी जाउन पैसे गोळा करायचे (आता दर बदलला असेल) आणी सन्ध्याकाळी गल्लीत मोठ्ठी पर्टी... म्ह्णजे भेळ, मिसळ, आईस्क्रिम असे काही.. I miss those days.. आणि अजुनी हि तिच पद्दत सुरु आहे. काही ठिकाणी ढोल्-ताश्याच्या ऐवजी DJ असा फरक झाला असेल इतकेच. इति मातोश्री...

इकडे अमेरिकेत आम्ही weekend la होळी खेळ्तो.. अर्थात DJ बरोबर.. ह्यावर्शी आमचे अमेरिकन मित्र मैत्रिणि हि ह्यात सहभगी झाले होते. पुढच्या वर्षी हि नक्की बोलवा अशी फर्माइश केली आहे.

इकडे अमेरिकेत आम्ही weekend la होळी खेळ्तो.. अर्थात DJ बरोबर.. >>> होळी खेळायला डिज्जे तुमच्याकडे येते ? Proud Light 1

jokes apart, Indian Culture Asso. एखादे fair ground rent करते आणि आम्हि तिकडे होळी खेळतो..

>>>मला पुण्याला शिकण्यासाठी आल्यावरच कळ्ले होते की तिथे धुळवडीला रंग खेळत नाहीत आणि धक्का बसला होता.<<<
महाराष्ट्रात धुळ किंवा होळीच्या राखेने धुळवड खेळलि जायची व रंगपंचमीला रंग खेळला जात असे.
आज ही ब-याच ठिकाणी फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी खेळली जाते.
मला वाटतं होळी, किंवा धुळवडीला खेळली जाणारी होली रंगोत्सव हा जरी उत्तरेकडून आलेला प्रकार असला तरी त्याच्या प्रसाराला हिंदी सिनेमा मुख्य कारण आहे. आणि धमाल करता येते हे दुसरे कारण, मिडीया करत असलेल्या जाहिराती हे तिसरे कारण.
म्हणजे, " होलि है" म्हणत रंग उडवणं आणी " रंगपंचमी" असं ओरडून रंग उडवणं, तुम्हीच पहा.गंमत कशात आहे?
आज धमाल करणं हेच महत्वाच असल्यानं हे असं होत असावं.
महाराष्ट्राचा अभिमान, मराठीपणा हेच नाणं वापरुन पुढारीपण करणारेही होलिच खेळण्यात रमतात.
आपले सण, समारंभ ह्याची जपणूक करणं, पुढच्या पिढीला हे शिकवणं त्याचा वारसा अभिमानानं पुढे नेण्याकरता मिळेल तितकी माहीती संग्रहीत करायच काम आपण मायबोलीत करु शकतो का?

काल अनेक वृत्तवाहिन्यांवर महाराष्ट्रात ठीकठिकाणी रंगपंचमी (तीही अनेक ठिकाणी पाण्याचा वापर न करता) साजरी झाल्याच्या बातम्या होत्या की.

Pages