पेस्टो केसेडिया

Submitted by सायो on 25 March, 2013 - 15:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टॉर्टिया (कॉर्न, होल व्हीट- जे आवडत असतील ते)
रंगीत भोपळी मिरची-१
झुकिनी- १/२
लसणीच्या पाकळ्या- २
श्रेडेड मॉझरेल्ला चीज- लागेल त्या प्रमाणात
पेस्टो सॉस- पाऊण वाटी- स्प्रेड करण्यापुरता
सिझनींगकरता- ड्राय बेसिलची पानं, पास्ता सिझनिंग, क्रश्ड पेपर,
ऑऑ- १ छोटा चमचा.
चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

भोपळी मिरची आणि झुकिनी अगदी बारीक चौकोनी चिरुन घ्यायची. लसूणही बारीक चिरुन घ्यायची. सॉसपॅनमध्ये ऑऑ घेऊन त्यात लसूण, बारीक चिरलेल्या भाज्य्या परतून वाफ काढायची. जरा मऊ वाटल्या की त्यात चवीप्रमाणे मीठ, सिझनिंग घालून घेऊन गार होऊ द्यावं.
गरम तव्यावर टॉर्टिया जरा शेकून घेऊन त्यावर पेस्टो सॉस पसरवून घ्यावा. त्यावर चीज आणि भाजीचं मिश्रण पसरुन घेऊन अर्ध्यात फोल्ड करुन चीज वितळेपर्यंत शेकून बाजूला ठेवावा. गार झाल्यावर मध्याभागी कापून घेतल्यावर मुलांना खायला सोपा होईल.

वाढणी/प्रमाण: 
साधारण दोन लहान टॉर्टिया प्रत्येकी.
अधिक टिपा: 

भाज्या नको असल्यास नुसता पेस्टो+ चीजही चांगलं लागेल चवीला. चिकन हवं असल्यास घालूनही चांगलं लागेल बहुतेक.

(इथे टाकायचा विचार नसल्याने फोटो काढलेला नाही)

माहितीचा स्रोत: 
बाहेरचं खाणं आणि स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृ माझी मैत्रीण रोटीसेरी चिकन घालते कसिडिया मधे. बरेचदा ती पुल्ड रोटिसेरी चिकन मॅरिनेट करून घेते. तिला विचारून सांगते तुला.

मृण, क्विझनोज सब मध्ये टर्की स्लाईसेस आणि पेस्टो बुलेट / टॉर्पिडो मिळायचं ते मला खूप आवडायचं. त्यावरुन माईल्ड चवीचं कुठलंही मीट चांगलं लागेल पेस्टोबरोबर असं वाटतं - चिकन, टर्की, टिलापिया वगैरे.

मस्त!

केसेडिया हे प्रकरण मुलांच्या पोटात भाज्या ढकलायला बेस्ट आहे Happy

मला रोस्टेड व्हेजिटेबल्स + मोझरेला + सन ड्राईड टोमेटो हे कॉम्बो पण आवडते Happy

सोया ग्रॅन्युल्स + चीज घालुन केलेला केसेडिया देखिल लेकीला चिकन आहे असे सांगुन खिलवला आहे Proud

श्रेडेड BBQ चिकन, स्लाईस्ड सॉसेजेस, खिमा सुद्धा चांगले लागते... इति कलिग (अत्ताच विअचारले कलिग ला)

मस्त आहे पेस्टो घालायची कल्पना
पेस्टो घालायचं डोक्यात आलं नाही कधी .>>>+११
ह्या २-३ दिवसातच करुन बघेन Happy

सायो, मेराभी 'केसादिया' फेव प्रकार आहे ..
मी याकरता फ्लोअर तॉर्तियाज घरीच बनवते. फेटा चीज, चेडर चीज,कॅप्सीकम,कोथिंबीर्,आलापीनो मिर्च्या,ब्लॅक ऑलिव्ज वापरते. रेडी केसादिया साल्सा बरोबर सर्व करते..
पण तुझी पेस्टो सॉस ची आयडिया खूप आवडली.. एक वेरिएशन मिळालं.. Happy

वा!! कसेडिया तर आमचा सगळ्यांचा फेव्हरेट...
केसेडिया हे प्रकरण मुलांच्या पोटात भाज्या ढकलायला बेस्ट आहे>>> +१
मी पनीर, बेबी-कॉर्न, सिमला मिर्ची ह्या भाज्या रोस्ट करून घालते..
पार्टी मध्ये हिट मेन्यु.. लहान मुलांना तर हे कॉम्बिनेशन फार आवडते...:)

सायो, आता पुढच्या वेळेस पेस्टो नक्की घालुन बघणार..

कृपया चित्र द्यावेत. बघायला आवडेल. काही इन्ग्रेडियन्ट्स माहीतच नसल्याने हा पदार्थ कसा असेल, दिसेल, लागेल हे समजलेच नाही, म्हणून चित्राची विनंती.

मी नेहमीप्रमाणे भाजी - पोळी करते. आधी भाजी करुन घेते मग पोळी भाजुन होत आली की अर्ध्या भागावर भाजी +चीज टाकुन मुडपते अन चीज वितळेपर्यंत दोन्ही बाजुंनी थोडी भाजते. सोप्पं अन वेगळं काही करत बसायची गरज नाही.