जरा दूर जाऊ

Submitted by जो_एस on 19 March, 2013 - 01:10

जरा दूर जाऊ जनां पासुनी
नशीबास ताडू दिवा घासुनी

चला हस्तरेषा नव्या काढुया
मिटाव्या कशा पण जुन्या घासुनी?

विरे आठवांचा मनोरा तशी
पुढे वाट लागे दिसाया सुनी

जगाचा कसा गूण छायेसही
मला टाळते ती तमी हासुनी

जरा सत्यवाचा कुणी बोलला
पहातात सारेच आवासुनी

कळे भांडणाऱ्यांस ना शेवटी
सुरूवात झाली कशा पासुनी

खरा तोच ठरतो जगाच्या मते
असत्यास सांगेल जो ठासुनी

असा दगड कोणी, न चिंता करा
बना देव, शेंदूर घ्या फासुनी

नसे देव होणे सुखाचे तसे
अधी लागते घ्यायला तासुनी

सुधीर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"खरा तोच ठरतो जगाच्या मते
असत्यास सांगेल जो ठासुनी" >>>> हा सर्वात आवडला.

छान Happy

नशीब अजमावू दिवा घासुनी >>> अक्षरगणात असा गुरू होत नाही

आणि ..सुरूवात होती शेवटा पासुनी >> असा लघु होत नाही.

उल्हास, कापो धंन्यवाद

शाम शेवटा... चा चुकून पोस्ट झाला होता काढून टाकला आहे.
नशीब अजमावू दिवा घासुनी >> या बद्दल शंका आहे, पहावं लागेल.

जमीन मस्तच ! पक्की बांधलीतही
सर्व खयाल फ्रेश वाटले
गझल आवडली