Submitted by बेफ़िकीर on 15 March, 2013 - 01:44
एकाच कारणाचा करते तपास दुनिया
समजेचना कुणाला असते कशास दुनिया
कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया
आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया
राहून अर्धपोटी तृप्तीत पाठ टेके
माझ्या लहानपणची ती दिलखुलास दुनिया
जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया
गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया
येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया
धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया
मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया
येथे जिवंत असणे इतकेच फार झाले
ही 'बेफिकीर' आहे मुडदेफरास दुनिया
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकाच कारणाचा करते तपास
एकाच कारणाचा करते तपास दुनिया
समजेचना कुणाला असते कशास दुनिया >>> समजेचना कुणाला.. खूपच ठाम मत होते आहे. ऐवजी कळले कधी कुणाला? असा प्रश्न केल्यास अधिक पटावे.. पण पुढे तसे आलेलेच आहे.
कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया>>> सह्ही
जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया>>> चिंतनीय शेर आवडला
गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया ,
धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया... आणि
येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया>>>खूपच सुंदर
मदिरा, दारू.. सारख्याच मात्रा आहेत.. पण दारू प्रचलित आहे.
अगदी बारकाईने वाचून मत मांडलेले आहे.
पण एकूण गझल अप्रतिम म्हणावी अशीच
.................................................................शाम
क्र. ३ मधला विचार, क्र. ४
क्र. ३ मधला विचार, क्र. ४ मधला अनुभव, क्र. ७ मधल्या शेरातला भणंगपणा आणि सोबतची बेपर्वाई, क्र. ८ मधला सल्ला हे आवडले.
मतला भन्नाट!!! आपापल्या परीने
मतला भन्नाट!!!
आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया.... हम्न ! खरयं.
जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया....वा !
धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया...... ये ब्बात !
मक्ता क्या कहेने !
आवडली गझल बेफिजी,
धन्यवाद !
गझल आवडली.
गझल आवडली.
शेरांमधली सहजता आवडली...
शेरांमधली सहजता आवडली...
कष्टांवरी दिनांच्या ती राहते
कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया
व्व्व्वा ! ! !
जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया
गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया
हे आणि इतर काही खूप आवडले.
आवडली गझल.
सही !! संपूर्ण गझल आवडेश
सही !!
संपूर्ण गझल आवडेश
विकास, लयास, ग्लास, मक्ता...... हे विशेष आवडले.
सुंदर गझल.
सुंदर गझल.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
आपापल्या परीने जो तो जगून
आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया
फार सुंदर.
येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया
येथे जिवंत असणे इतकेच फार झाले
ही 'बेफिकीर' आहे मुडदेफरास दुनिया
सहज आलेत. आवडले.
गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया
हा शेर आवडता-आवडता राहिला. दुसरी ओळ फारच सुंदर.
गझल आवडली.
धन्यवाद.
छान. सगळेच आवडले शेर.
छान. सगळेच आवडले शेर.
>> येथेच थांब तू हे नाही
>> येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया
सुन्दर! फार आवडला हा. त्या 'की' मधल्या धडपडीवर तिच्या हृदयात कळ उठणार नक्कि
>> मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया
टाळीचा शेर.
technically एकूण गझल मस्तच.
सर्वच शेर आवडलेत. कष्टांवरी
सर्वच शेर आवडलेत.
कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया
.
राहून अर्धपोटी तृप्तीत पाठ टेके
माझ्या लहानपणची ती दिलखुलास दुनिया
.
येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया
.
मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया
.
येथे जिवंत असणे इतकेच फार झाले
ही 'बेफिकीर' आहे मुडदेफरास दुनिया
हे जास्तच आवडले.
आवडली
आवडली
काडीची किंमत नाही मावळत्यास
काडीची किंमत नाही मावळत्यास येथे
उगवत्यालाच वंदते ही मतलबी दुनिया...
*मला वृत्ताचे विशेष ञान नाही...
गोड मानून घ्या..
आवडली..
बहुत बडीया..
सुंदर,सखोल,सार्थ.
सुंदर,सखोल,सार्थ.
आवडली गझल.
आवडली गझल.
सही !! संपूर्ण गझल अप्रतिम!!!
सही !!
संपूर्ण गझल अप्रतिम!!!
मस्त
मस्त
सुंदर गझल !!!.... इतरांनी गझल
सुंदर गझल !!!.... इतरांनी गझल पाहून आपल्या काव्य'कळा' घ्याव्यात ही विनंती.
गझल आवडली !
गझल आवडली !
एकाच कारणाचा करते तपास
एकाच कारणाचा करते तपास दुनिया
समजेचना कुणाला असते कशास दुनिया
आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया
राहून अर्धपोटी तृप्तीत पाठ टेके
माझ्या लहानपणची ती दिलखुलास दुनिया
जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया
गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया
येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया
धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया
मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया
पूर्ण गझल अतिशय आवडली प्रत्येक शब्द जणू धाग्यात विणावा तसा आहे.
कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया
या शेरातील सर शंका म्हणून विचारतो "दिन" आणि दीन या दोन शब्दात फरक
आहे इथे "दीन" हा शब्द अभिप्रेत असावा.कारण "दिन" हा शब्द मी "दीन" असा लिहिल्याने मी आमच्या मेहेंदळे गुरुजींचा खूप मार खाल्ला होता. कृपया लोभ असावा.
खणखणीत !! गणेशजी आपण म्हणता
खणखणीत !!
गणेशजी आपण म्हणता त्याप्रमाणे 'दीन्'हा शब्द एकटाच लिहिल्यास 'द' दीर्घ बरोबर आहे.
पण इथे 'दिनांच्या' हा शब्द असल्याने त्यातला 'द' ह्रस्वच योग्य आहे असे मला वाटते.
कॄ. गैं. न.
बेफिकीर, खूप सुंदर आणि
बेफिकीर,
खूप सुंदर आणि समर्पक रचना आहे. (मला गझलेतलं काही कळत नाही म्हणून रचना म्हणतोय.) भकास शेराचं प्रयोजन कळलं नाही.
आ.न.,
-गा.पै.
आपापल्या परीने जो तो जगून
आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया
धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया
शेर आवडले!
आभारी आहे रसिक मित्रहो
आभारी आहे रसिक मित्रहो
आपापल्या परीने जो तो जगून
आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया
गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया
हे शेर सर्वात आवडले.
सुरेख गझल बेफिजी.. जितके तिला
सुरेख गझल बेफिजी..
जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया
आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया
Too Good
दिन बद्दल गणेशजींशी
दिन बद्दल गणेशजींशी सहमत
पहिले पाच-एक शेर मनापासून तितकेसे आवडले नाहीत
बाकीचे अप्रतीमच आहेत
मदिरा खराब आहे ....अशी सुरुवात असलेली एक कविता तुमच्या एका काव्य संग्रहात असल्याचे स्मरते आहे बेफीजी
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
Pages